pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नवरस कथास्पर्धा निकाल

15 ऑक्टोबर 2018

नमस्कार लेखकवर्ग,
प्रतिलिपि आयोजित "नवरस कथालेखन स्पर्धेसाठी" आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! सादर केलेल्या साहित्यातून सर्व लेखकांनी साहित्यातील सर्व रसांचे वर्णन अतिशय सुरेख केले आहे. या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदरी प्रतिलिपिने औरंगाबाद येथील अंबिका टाकळकर यांना दिली होती. आपलं मूल ऑटिस्टिक अर्थात स्वमग्न आहे हे कळल्यावर अंबिका टाकळकर यांनी जिद्दीने या परिस्थितीवर मात केली. आपल्या मुलाला अधिकाधिक स्वावलंबी बनवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्याकरता त्यांनी वेगळे शिक्षणही घेतले. समाजातील इतर अशाच मुलांकरता त्यांनी "आरंभ" नावाची संस्थाही स्थापन केली. आता त्याच माध्यमातून त्यांनी बऱ्याच स्वमग्न मुलांना आणि त्यांच्या पालकांना आशेचे नवे किरण दिले आहेत! अंबिका टाकळकर या एक उत्तम लेखिकाही आहेत. आयुष्याने त्यांची परीक्षा पहिली खरी, पण त्या मात्र जिद्दीने उत्तीर्ण झाल्या! अशा या स्त्रीशक्तीला सलाम!

परीक्षकांचे बोल:

नमस्कार 
 
प्रतिलीपी तर्फे घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेच परिक्षण करतालं का  म्हणुन विचारण्यात आलं. खर तर सुरवातीला वाटलं पटकन हो म्हणाले. नंतर विचारलं किती कथा?  तर उत्तर आलं, 148.  बापरे इतक्या कथांच वाचन कधी करायचं हा प्रश्न पडलां. पण खरच सगळ्या कथा एकसे एक होत्या.  खर तप नवरस ही संकल्पनांच खूप सुदंर. रोजचे आयुष्य जगतानां हे सगळे रस आपण  जगत असतो, अनुभवतं असतो पण त्याच महत्व किंवा ते जाणवतं नाही. 
 काहिंचे वेगळे विषय होते. तर काही त्याच साच्यातल्या होत्या पण लिखाणांचा प्रयत्न चांगला होता. 
काहिंनी अर्धवट कथा पाठवल्यातं तर काहींच्या कथेतुन नेमक काय सांगायच हेच समजलं नाही. 
काही कथा वेगळ्या हटके विषय घेवून लिहलेल्या होत्या. 
एक आवर्जुन सांगावस वाटतयं ते म्हणजे कथा वाचायलां 9 ऑक्टोबर रोजी रात्री, मागच सगऴ आवरून बसले. सुरवातीलाच भिती रसाची कथा वाचनातं आली. ती वाचतानां लक्षात आलं आज नेमकी आमावस आहे. पुढच्या सगळ्या कथा त्या दिवशी,  भिती, भयानक, रौद्र,  भुत, प्रेत, सावली,  थरारक,  रोमांचकारक अश्या एक से एक थरथराट देणा-या होत्या. त्यादिवशी रात्री 2.30 वाजता लॅपटॉप बंद करून झोपायला गेल्यावर, कथेतले सगळे पात्र आसपास फिरल्याचा भास होत होता. मला वाटतं ह्यातच लेखकाची पोचपावती आहे. 
परत एकदा प्रतिलीपीची,  तेजश्रीचे मनपूर्वक मानते. 
सगळ्या विजेत्या स्पर्धाकांचे  अभिनंदन. 
अंबिका टाकळकर

प्रतिलिपिद्वारा आयोजीत नवरस कथालेखन स्पर्धेचा परीक्षकांच्या पसंतीनुसार निकाल पुढीलप्रमाणे:

प्रथम क्रमांक
दिल है छोटासा

विद्या बालवाडकर 

द्वितीय क्रमांक
मधुनील
पल्लवी वांगीकर


तृतीय क्रमांक
आधार कार्ड
रश्मी तामाणेकर- कोरगांवकर

प्रतिलिपिद्वारा आयोजीत नवरस कथालेखन स्पर्धेचा वाचकांच्या पसंतीनुसार निकाल पुढीलप्रमाणे:


प्रथम क्रमांक
सहवास: शृंगार कथा

धनश्री साळुंखे

 

द्वितीय क्रमांक
टर्न

संजय कांबळे


तृतीय क्रमांक
वृद्धाश्रम: एक घाव
विष्णू प्रमोद

ऑनलाईन टॉप २० चा चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग:

Title of the Content Author Read count Ratings count Avg Rating Reading time taken (sec) Actual  reading Time (sec) Time Factor Reader Points Rating Count points Avg Rating points Time points Final mark Rank
सहवास : शृंगार कथा धनश्री साळुंके 6164 183 4.69 304 1460 6356.00 1.000 1.000 0.938 1.000 0.935 1
टर्न sanjay kamble 4438 180 4.39 225 0 4738.00 0.720 0.984 0.878 0.745 0.794 2
वृद्धाश्रम ....एक घाव ! Vaishnu Pramod 4803 14 4.14 39 151 6081.00 0.779 0.077 0.828 0.957 0.612 3
तुझं माझं जमेना सुमेधा आदवडे 3989 41 4.59 67 280 4880.00 0.647 0.224 0.918 0.768 0.601 4
सासू प्रेम मिलिंद अष्टपुत्रे 2499 45 4.33 129 305 3074.00 0.405 0.246 0.866 0.484 0.476 5
तुझ्यात जीव गुंतला संगीता देशपांडे 2834 22 4.36 60 471 3478.00 0.460 0.120 0.872 0.547 0.472 6
ती रात्र... रुपेश सैंदाणे 2128 47 4.74 217 797 2326.00 0.345 0.257 0.948 0.366 0.461 7
उतारा अभिषेक बुचके 1417 77 4.91 255 2702 1478.00 0.230 0.421 0.982 0.233 0.455 8
सिरीयल किलर तन्वी k. 2433 38 4.42 114 436 2570.00 0.395 0.208 0.884 0.404 0.452 9
'ती' कोण? Sanika Sawant 1887 36 4.5 85 859 2192.00 0.306 0.197 0.900 0.345 0.420 10
प्रेमा तुझा रंग कोणता Shilpa Desai 1678 35 4.57 133 460 2238.00 0.272 0.191 0.914 0.352 0.415 11
रखमा प्रणाली देशमुख 1648 40 4 88 243 2787.00 0.267 0.219 0.800 0.438 0.409 12
मृगजळ अक्षय भिंगारदिवे 767 75 4.72 254 739 1024.00 0.124 0.410 0.944 0.161 0.402 13
चौकटीबाहेरच नातं तेजल अपाले 1318 49 4.73 71 244 1380.00 0.214 0.268 0.946 0.217 0.400 14
फर्स्ट फ्लोअर Sagar Raut 1544 33 4.48 138 551 1920.00 0.250 0.180 0.896 0.302 0.392 15
युअर कॉल इज ऑन  वेट मीनल चौधरी 1653 21 4.48 65 178 1943.00 0.268 0.115 0.896 0.306 0.381 16
थरार रसिका शेखर लोके 806 58 4.79 194 1032 871.00 0.131 0.317 0.958 0.137 0.379 17
मधुनिल पल्लवी वांगीकर 1104 42 4.6 133 1450 1468.00 0.179 0.230 0.920 0.231 0.378 18
स्वप्नं सुमेधा आदवडे 1458 27 4.33 74 359 1977.00 0.237 0.148 0.866 0.311 0.375 19
विरहांत.........एक वाट चुकलेला प्रवास प्रितम गाडगीळ "प्रित" 1278 37 4.43 161 978 1440.00 0.207 0.202 0.886 0.227 0.369 20


How we select Top 20 winners:

The column headings in green are the absolute values of parameters, which we take into consideration -

j) Read count - Total read count of the content in the date range
ii) Ratings count - Number of ratings
iii) Avg Rating - Average rating
iv) Reading time taken ( in seconds) - Actual average time spent on the content, by the readers
v) Actual reading Time (sec) - How much time does it generally take for anyone to read the content fully
vi) Time factor - ratio of iv) and v) - The higher, this parameter is, it means that readers are actually spending the right amount of time to finish the content fully. In other words, content completion rate is more.
The column headings in blue are normalization factors - ie) Trying to bring each of the previously mentioned parameters (Read count, Avg rating, Rating count, Time factor), into a single linear scale.

Final mark - Weighted average of the normalized factors

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा