मी प्रतिलिपिमध्ये कथा कशी लिहू?

तुम्‍ही तुमच्‍या कथा प्रतिलिपि ॲपवर कुठेही, कधीही शेअर करू शकता! कथा सुरू करण्यासाठी आणि नंतर ती जतन करण्यासाठी येथे काही सोप्या माहिती आहेत.

कृपया लक्षात घ्या की, सध्या पीडीएफ किंवा वर्ड फाइल्स प्रतिलिपि ॲपवर अपलोड करणे शक्य नाही.

  • होमपेजवर खालील 'लिहा' बटणावर क्लिक करा.

  • नवीन ड्राफ्ट जोडा निवडा.

 

तुम्हाला संपादन पेजवर आणले जाईल. येथे तुम्ही कथेच्या भागाला शीर्षक देऊ शकता आणि लेखन सुरू करू शकता.

तुम्ही फोटो जोडू शकता परंतु त्या आधी आमचे महत्वाची मार्गदर्शक नक्की वाचा: तुमच्या कथेमध्ये फोटो जोडण्यासाठी

एकदा तुम्ही लेखन पूर्ण केल्यानंतर आणि तुमच्या भागाला शीर्षक दिल्यावर, तुमच्याकडे खालील पर्याय असतील:

भाग प्रकाशित करण्यासाठी-

  • 'प्रकाशित करा' वर क्लिक करा.

  • किमान एक शीर्षक भरा आणि श्रेणी निवडा.

  • साहित्य कॉपी केलेली नाही हे दाखवणारा बॉक्स चेक करून पुष्टी करा.

  • पुन्हा 'प्रकाशित करा' वर क्लिक करा.

  • भाग जतन करण्यासाठी

    • वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या 'जतन करा' बटणावर क्लिक करा

  • भाग पूर्वावलोकन करण्यासाठी

    • वरच्या उजव्या कोपर्यात 'अधिक पर्याय' बटणावर टॅप करा

    • 'पूर्वावलोकन' पर्याय निवडा.

 

कृपया लक्षात ठेवा: तुम्ही भाग प्रकाशित केल्यास, तो तुमच्या प्रोफाइलवर दिसेल.

तुम्ही परत जाऊन तुमच्या कथेचा कोणताही भाग कधीही जोडू किंवा सुधारू शकता.

 

हा लेख उपयोगी होता का?