मी कथा किंवा मालिका कशी हटवू?

तुम्ही चुकून नवीन कथेचा भाग तयार केला असल्यास किंवा तुम्हाला यापुढे कथेचा भाग नको असल्याची खात्री असल्यास, तुमच्याकडे तो हटवण्याचा पर्याय आहे. तुम्ही दोन्ही ड्राफ्ट आणि प्रकाशित भाग तसेच संपूर्ण कथा हटवू शकता.

तुम्हाला कथेचा भाग हटवायचा आहे याची पूर्ण खात्री करा, कारण तो हटवल्यानंतर तो परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही. तुम्ही कथेचा भाग हटवल्यास, हे तुमच्या एकूण वाचन/रेटिंगमधून या भागाचे सर्व वाचन आणि रेटिंग देखील हटवेल.

 

अँड्रॉइड वरून:

कथेचा भाग हटवण्यासाठी:

  1. मुख्यपृष्ठावर खालील 'लिहा' बटणावर क्लिक करा.

  2. कथा विभागात जा.

  3. कथेच्या भागापुढील अधिक पर्याय बटणावर क्लिक करा.

  4. अप्रकाशित करा वर क्लिक करा.

 

आता अप्रकाशित भाग मालिकेतच मालिका ड्राफ्ट म्हणून स्वतंत्रपणे दाखवला जाईल. एखादा भाग हटवण्याऐवजी, तुमच्याकडे तो अप्रकाशित करण्याचा पर्याय देखील आहे आणि कथेचा भाग पुन्हा ड्राफ्टमध्ये परत केला जाईल, जेणेकरून तो फक्त तुम्हीच पाहू शकता.

 

तरीही तुम्हाला तो भाग हटवायचा असल्यास,

  1. अप्रकाशित भागाच्या पुढील अधिक पर्याय बटणावर क्लिक करा.

  2. भाग हटवण्यासाठी क्लिक करा.

  3. हा भाग हटविण्याची पुष्टी करण्यासाठी हटवा निवडा.

संपूर्ण मालिका हटवण्यासाठी, मालिकेतील प्रत्येक भाग निवडा आणि वरील चरणांचे अनुसरण करा.



वेबसाइटवरून:

कथेचा भाग हटवण्यासाठी:

  1. पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या प्रोफाइल वर क्लिक करा.

  2. एक कथा निवडा.

  3. ड्राफ्टमध्ये टाका वर क्लिक करा.

  4. हटवा पर्याय निवडा.

  5. ठीक आहे वर क्लिक करून हटविण्याची पुष्टी करा.

संपूर्ण मालिका हटवण्यासाठी, मालिकेतील प्रत्येक भाग निवडा आणि वरील 3 ते 5 पायऱ्या फॉलो करा.

 

हा लेख उपयोगी होता का?