प्रतिलिपिमध्ये आम्ही नेहमीच लेखकांना चांगल्या आणि न्याय्य संधी देण्याचा प्रयत्न करतो. अनेक लेखकांना आता प्रीमियम, पुस्तके, ऑडिओबुक, कॉमिक्स, वेबसिरीज, चित्रपट, ॲनिमेशन इत्यादी प्रकल्पांवर अनेक ऑफर्स मिळत आहेत हे पाहून आम्हाला खरोखर आनंद होत आहे.
परंतु अलीकडे, आम्हाला फसव्या कंपन्या आणि प्रतिलिपि लेखकांशी डील करणार्या व्यक्तींबद्दल अनेक तक्रारी देखील प्राप्त होऊ लागल्या आहेत. बर्याच प्रकरणांमध्ये, ऑफर देणारी व्यक्ती किंवा कंपनी अपूर्ण माहिती देतात, बनावट ऑफर देतात आणि अशा ऍग्रीमेंटवर लेखक स्वाक्षरी करतात ज्यात बऱ्याच कायदेशीर कलमे आणि मुद्द्यांचा समावेश असतो ज्यांची लेखकांना माहिती नसते. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला डील ऑफर करेल आणि तुमच्या कथांचे कोणतेही 'हक्क' विकत घेऊ इच्छित असेल तेव्हा तुम्ही कशावर स्वाक्षरी करत आहात याची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे.
म्हणून, प्रतिलिपिने लेखकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी खालील महत्त्वाचे प्रश्न आणि माहिती तयार केली आहे. तुमच्या कथांचे कोणतेही ‘हक्क’ मिळवण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधणाऱ्या कंपनी/व्यक्तीला खालील माहिती आणि प्रश्न लेखकाने विचारले पाहिजेत.
पुढे जाण्यापूर्वी, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की 'कॉपीराइट' किंवा 'अधिकार' म्हणजे नेमके काय? एक लेखक म्हणून, जेव्हा तुम्ही मूळतः एखादी नवीन कथा किंवा साहित्यकृतीचा कोणताही भाग तयार करता तेव्हा त्या कथेचा (किंवा साहित्यिक कार्याचा) कॉपीराइट तुमच्याकडे असतो. जेव्हा जेव्हा एखाद्याला तुमची कथा कोणत्याही प्रकारे वापरायची असते, तेव्हा त्यांना तुमच्याकडून म्हणजेच कॉपीराइट मालकाची परवानगी घ्यावी लागते. या परवानग्या तुम्ही त्यांना देत असलेले ‘अधिकार’ तुमच्याकडे आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या कथेवर आधारित ऑडिओबुक बनवण्याचा ‘अधिकार’ कंपनी/व्यक्तीला देता, तेव्हा तुम्ही त्यांना मुळतः ऑडिओबुक बनवण्याची आणि ते वापरण्याची परवानगी देता.
कृपया नोंद घ्या: जर तुम्ही प्रतिलिपिवर साहित्य प्रकाशित केले असेल तर त्या साहित्याशी संबंधित सर्व कॉपीराइट तुमचे आहेत. प्रतिलिपिला कोणत्याही अधिकारांवर तुमची परवानगी हवी असल्यास, आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल, तुमच्याशी ऍग्रीमेंट करेल आणि टर्म स्पष्ट करेल. जेणेकरून आपसातील विश्वासहर्ता टिकविण्यास मदत होईल.
खालील महत्त्वाचे प्रश्न लेखकाने विचारले पाहिजेत, जेव्हा एखादी व्यक्ती/कंपनी कथांचे हक्क मिळवण्यासाठी लेखकाकडे जाते:
हक्क विकत घेऊ इच्छिणाऱ्या कंपनी/व्यक्तीबद्दलच्या प्रश्न:
हक्क खरेदी करण्यात स्वारस्य असलेली संस्था किंवा व्यक्ती कोण आहे?
कथेमध्ये आवश्यक असलेल्या अधिकारांबद्दल प्रश्न:
कोणती कथा निवडली जात आहे आणि हक्काचे नेमके प्रकार कोणते आहेत?
-
खरेदीदाराला सर्व उपलब्ध अधिकार हवे आहेत का? (तुम्ही सर्व उपलब्ध अधिकार एखाद्याला दिल्यास, ते तुमची कथा कोणत्याही प्रकारे वापरू शकतात.)
उदाहरणार्थ: सर्व उपलब्ध अधिकारांमध्ये प्रकाशन अधिकार, ऑडिओ अधिकार, ईबुक प्रकाशन हक्क, व्हिडिओ उत्पादन हक्क, कॉमिक अधिकार इत्यादींचा समावेश होतो.
-
खरेदीदाराला तुमचे साहित्य काही विशिष्ट स्वरूपांमध्ये रूपांतरित करण्यासाठी काही आंशिक अधिकार हवे आहेत का? (तुम्ही एखाद्याला काही विशिष्ट अधिकार दिल्यास, ते तुमच्या कथेचा विशिष्ट पद्धतीने वापर करू शकतात.)
उदाहरणार्थ: खरेदीदारांना त्या कथेचे फक्त ऑडिओ अधिकार हवे आहेत का? मग ते पुस्तक म्हणून प्रकाशित करू शकत नाहीत. त्याच प्रकारे आपण कोणते आंशिक अधिकार देत आहात याची जाणीव तुम्हाला असणे आवश्यक आहे.
-
खरेदीदाराला सध्याच्या साहित्यिक स्वरूपातील कथा वितरणासाठी वापरण्याचे अधिकार हवे आहेत का?
उदाहरणार्थ: समजा, तुम्ही ती कथा ईबुक म्हणून प्रकाशित केली आहे. त्यामुळे खरेदीदारांना ती कथा समान स्वरूपात वापरण्यासाठी आणि इतर चॅनेलमध्ये वितरित करण्याचे अधिकार हवे आहेत का?
-
ते एक विशेष (एक्सक्लुसिव्ह) ऍग्रीमेंट आहे का? तोच अधिकार इतर कोणालाही देता येईल का?
एक्सक्लुसिव्ह ऍग्रीमेंटचा अर्थ असा आहे की, एकदा तुम्ही खरेदीदाराला हक्क (सर्व उपलब्ध अधिकार किंवा आंशिक अधिकार) दिले तर, तुम्ही दुसऱ्या खरेदीदाराला समान अधिकार देऊ शकत नाही.
उदाहरणार्थ: जर तुम्ही 'XYZ' कंपनीला ऑडिओसाठी कथेचे विशेष (एक्सक्लुसिव्ह) अधिकार दिले असतील तर त्याच कथेचे ऑडिओ अधिकार तुम्ही ‘ABC’ कंपनीला देऊ शकत नाही.
-
अधिकार देण्यासाठी ऍग्रीमेंटवर स्वाक्षरी केल्यानंतर, कथेचा (बेस स्टोरी) कॉपीराइट कोणाचा असेल. तसेच, अधिकार वापरून उत्पादित केलेल्या साहित्याचे कॉपीराइट कोणाकडे असेल?
उदाहरणार्थ: तुम्ही तुमच्या कादंबरीचे चित्रपट निर्मिती हक्क खरेदीदाराला दिले आहेत? मग ‘बेस स्टोरी’ (या प्रकरणात तुमची कादंबरी) कॉपीराइट तुमच्या मालकीची असेल का? किंवा ते? तुमच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या हक्कांसाठीही तेच, त्या चित्रपटाचे हक्क तुमच्याकडे असतील की खरेदीदाराकडे?
-
तुम्ही दिलेल्या अधिकारांचा 'कालावधी' काय आहे आणि दुसर्या फॉरमॅटमध्ये तयार केलेले साहित्य कधीपर्यंत वापरले जाईल?
उदाहरणार्थ: तुम्ही तुमच्या कथेवरून व्हिडिओ जाहिरात करण्याचे अधिकार दिले आहेत किंवा तुमची कथा प्रिंटेड पुस्तक म्हणून प्रकाशित करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मग ते ती जाहिरात किती दिवस वापरू शकतात किंवा ते पुस्तक छापू शकतात का?
कथेवर आधारित भविष्यातील कलाकृतींच्या निर्मितीबाबत प्रश्न.
-
ऍग्रीमेंटवर स्वाक्षरी केल्यानंतर कथेमध्ये कोणतीही भर किंवा संपादन केले असल्यास, अद्यतनित कथेच्या अधिकारांचे काय होईल?
उदाहरणार्थ: समजा, तुमची कथा १४व्या शतकातील राजे आणि राण्यांवर आधारित होती. आता खरेदीदाराने त्यात बदल केला आणि कथेचा काळ बदलून आजच्या शब्दांमध्ये लिहिले आणि काही पात्र जोडले. मग त्या अद्ययावत कथेचे अधिकार कोणाकडे असतील?
-
जर मूळ कथेशी जोडलेली प्रीक्वल (मूळ कथेवर आधारित आधीचे पर्व), सिक्वेल (मूळ कथेवर आधारित नवीन पर्व) किंवा कोणतीही पात्रबदल करून कथा तयार केली तर या नवीन संबंधित कामांच्या अधिकारांचे काय होईल?
लेखकाच्या इतर कथांबद्दल प्रश्न.
-
या ऍग्रीमेंटमुळे माझ्या इतर कोणत्याही कथांच्या वापरावर, कोणत्याही संभाव्य मार्गाने परिणाम होईल का?
आर्थिक लाभ आणि शीर्षक क्रेडिट्स संबंधित प्रश्न.
-
पेमेंट स्ट्रक्चर काय आहे?
-
शेअरची रक्कम कशी मोजली जाते?
-
शेअरची रक्कम आणि आगाऊ पेमेंट कधी आणि कसे केले जाईल?
-
शेअरची रक्कम पेमेंट्सच्या विरूद्ध आगाऊ पेमेंटचे समायोजन केले जाईल का?
-
कथेचे अधिकार वापरून तयार केलेल्या कोणत्याही साहित्यामधील शीर्षकाचे श्रेय लेखकाला कसे दिले जातील?
कॉन्ट्रॅक्ट आधारित ऍग्रीमेंटबद्दल प्रश्न.
-
जर कथेचा वापर परवानगी नसलेल्या मार्गाने केला गेला किंवा पैसे वेळेत मिळाले नाहीत तर लेखकाकडे कोणते उपाय आहेत?
हे प्रश्न सामायिक करून लेखकांना त्यांच्या कथांच्या अधिकारांबद्दल माहिती देणे आणि याविषीयी कोणाशीही संभाषण करण्यास सक्षम करणे हा आमचा हेतू आहे. आम्हाला आशा आहे की वरील माहिती लेखकांना ते स्वाक्षरी करत असलेल्या डील आणि ऍग्रीमेंटबद्दल अधिक जागरूक राहण्यास मदत करेल. कोणत्याही ऍग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्यापूर्वी या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारा आणि मिळवा. कथेसाठी तुम्ही केलेली मेहनत आणि कल्पकता सुरक्षित करा.
तुम्हाला अजूनही काही शंका असल्यास,[email protected] वर मोकळ्या मनाने आमच्याशी संपर्क साधा.
पुढील कोणत्याही मदतीसाठी, अशा अधिक माहितीसाठी Pratilipi IP मराठी - प्रतिलिपि मराठी प्रोफाईलचे अनुसरण करावे.