मी दैनिक मालिका विभागामध्ये माझी मालिका कशी दाखवू शकतो/शकते?

दैनिक मालिका वैशिष्ट्य केवळ मालिकेसाठीच आहे. एक समर्पित होमपेज विभाग आगामी सात दिवसांसाठी मालिकेचे नियोजित भाग दर्शवितो.

दैनिक मालिका विभागात दाखवल्या जाणार्‍या कोणत्याही मालिकेसाठी आठवड्याच्या कोणत्याही आगामी दिवसासाठी किमान एक भाग शेड्यूल केलेला असावा.

शेड्युलिंग वैशिष्ट्य फक्त अँड्रॉइड ॲपवर उपलब्ध आहे.

 

शेड्यूल कसे करावे?

शेड्युलिंग वैशिष्ट्य केवळ मालिका साहित्यासाठी उपलब्ध आहे.

मालिका भाग शेड्यूल करण्‍यासाठी, तुमच्याकडे ड्राफ्ट म्हणून किमान एक मालिका भाग असणे आवश्यक आहे.

  1. ॲपच्या खाली असलेल्या 'लिहा' बटणावर क्लिक करा.

  2. कथा ऑप्शनवर जा.

  3. पुढील भाग जोडा वर क्लिक करा.

  4. नवीन भाग लिहिल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा.

  5. मालिका ड्राफ्ट्समधून सेव्ह केलेल्या भागाच्या 'शेड्यूल प्रकाशन' बटणावर क्लिक करा.

  6. कॅलेंडर पर्यायातून प्रकाशित करण्यासाठी वेळ आणि तारीख निवडा.

  7. पुन्हा शेड्यूल बटणावर क्लिक करा.

 

कृपया नोंद घ्या:

  1. जर तुम्हाला पूर्वी ठरवलेली तारीख आणि वेळ बदलायची असेल तर तुम्ही शेड्यूल केलेली तारीख आणि वेळ कधीही बदलू शकता.

  2. नियोजित भागामध्ये कोणतेही बदल प्रकाशनाच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिटांपूर्वी केले पाहिजेत.

तुम्हाला मालिका भाग शेड्यूल करण्यात काही अडचणी येत असल्यास, आम्हाला ईमेल करून कळवा. आम्हाला तुमची मदत करण्यात आनंद होईल.

 

हा लेख उपयोगी होता का?