मी प्रतिलिपिमध्ये अकाउंट कसे तयार करू?

तुम्ही प्रतिलिपिमध्ये सहभागी होण्यास तयार आहात का?

 

तुम्ही प्रतिलिपि वर दोन प्रकारे खाते तयार करू शकता:

 

  1. अँड्रॉइड/आयओएस डिव्‍हाइसवरून लॉगिन करताना कृपया मोबाइलवरील गूगल  प्लेस्टोअर किंवा ॲप्पल स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा आणि साइन-इन वर क्लिक करा.

  2. संगणकावर, कृपया www.pratilipi.com येथे जा, तुमची आवडती भाषा निवडा आणि वरच्या उजव्या कोपर्यात साइन-इन वर क्लिक करा.

 

तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट किंवा गूगल अकाउंट वापरून वैध ईमेल आयडी सह प्रतिलिपि  मध्ये साइन-अप करू शकता. कृपया तुम्ही अधिकृत असलेला ईमेल आइडी वापरा. आम्ही ऑफिस ईमेल आयडी किंवा शाळेचे ईमेल आयडी वापरू नका असे सुचवितो कारण तुम्ही तुमचे कार्यस्थळ किंवा शाळा सोडल्यानंतर ते हटवले जाऊ शकतात.

 

साइन अप केल्यानंतर, तुमचे अकाउंटसेट करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. तुम्ही लेखक किंवा वाचक म्हणून साइन-अप करत असलात तरीही, तुम्हाला प्रतिलिपि ॲपवर वाचन आणि लेखन दोन्हीसाठी पर्याय सापडतील. साइन अप करताना तुम्ही निवडलेल्या श्रेण्या, आम्ही तुम्हाला दिलेल्या निवडीचा पहिला संच ठरवतील. त्यानंतर, तुमच्या वाचनाच्या सवयींवर आधारित होमपेजवरील निवडी बदलतील. परिणामी, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कथा अधिक वेळा वाचत असाल, तर तुमच्यासाठी निवडलेल्या कथा त्यानुसार बदलतील.

 

तुम्ही तुमचे मूळ तपशील जसे की नाव, आडनाव, वाढदिवस, सारांश, लिंग इ. तुमच्या प्रोफाइलमध्ये जोडू शकता, परंतु यातील बहुतांश माहिती इतर वापरकर्त्यांना दिसणार नाही. इतर वापरकर्ते काय पाहू शकतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, "अकाउंट गोपनीयता" पाहू शकता.

 

एकदा तुमचे खाते सेट झाले की, आम्ही तुमच्या ईमेलवर एक वेरिफिकेशन मेल पाठवतो. जर तुम्हाला प्रतिलिपिमध्ये काही अडचणी आल्या तर तुम्ही  तुमच्या ईमेलद्वारे आमच्याशी  संवाद साधू शकता. तुमचा पासवर्ड रीसेट करण्यासाठी, तुमचे प्रतिलिपि खाते पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी हे आवश्यक आहे. तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाय करणे ही एक जलद आणि सोपी प्रक्रिया आहे.

 

अकाउंट सेट-अप केल्यावर, तुम्ही खालील गोष्टी करण्यास सक्षम असाल:

 

  • इतर लोकांना फॉलो करू शकता

  • डायरेक्ट मॅसेज पाठवू शकता

  • तुम्ही कथा प्रकाशित करू शकता

  • कथांना रेटिंग देऊ शकता आणि संपादित करू शकता

  • ईमेल नोटिफिकेशन्स देखील प्राप्त होतील

 

आता तुम्ही वाचू शकता, लिहू शकता आणि प्रतिलिपि समुदायाशी कनेक्ट होऊ शकता. कृपिया आमच्या सेवा अटी नक्की लक्षात ठेवा: सर्व प्रतिलिपि वापरकर्त्यांकडून अपेक्षा आहे की आमचे कोड ऑफ कंडक्ट आणि कन्टेन्ट  गाइड्लाइन निर्देशानुसार पालन करावे.

 

प्रतिलिपिमध्ये आपले स्वागत आहे!

 

हा लेख उपयोगी होता का?