माझी अकाउंटची माहिती प्रतिलिपि कडे सुरक्षित आहे का?

तुम्ही कधी विचार केला आहे की तुमच्या खात्याचे कोणते भाग इतर वापरकर्ते पाहू शकतात आणि कोणते भाग फक्त तुम्हीच पाहू शकतात?

विभाग खाजगी आहे की सार्वजनिक आहे हे पाहण्यासाठी खालील विभाग निवडा.

 

प्रोफाइल:

तुमच्या प्रोफाइलमध्ये तुमच्याबद्दल बरीच माहिती असू शकते.

तुमचे प्रोफाइल चित्र, नाव आणि आडनाव डीफॉल्टनुसार सार्वजनिक आहे. तुमच्या प्रोफाइलमध्ये जोडलेला कोणताही सारांश सार्वजनिक आहे.

तुमच्या अकाउंट सेटिंग्जमध्ये, तुमच्याकडे तुमची जन्मतारीख जोडण्याचा पर्याय आहे जो डीफॉल्ट खाजगी आहे.

 

वाचनालय:

वाचनालयमधील तुमचे कन्टेन्ट खाजगी असते. तथापि, तुमच्या वाचनालयतील कथा तुमच्या मुख्यपृष्ठावर रेकंमेंडेशन स्वरूपात दिसू शकतात.

तुम्ही तुमच्या रेकंमेंडेशनमधून कथा डिसमिस किंवा हटवू शकत नाही.

 

कलेक्शन:

तुमचे सर्व कलेक्शन सार्वजनिक आहेत. त्यांना खाजगी करता येत नाही.

ते रेकंमेंडेशन म्हणून दिसू शकतात आणि तुमच्या प्रोफाइलवर प्रदर्शित केले जातात.

 

कथा:

तुम्ही प्रकाशित केलेल्या कथा, डीफॉल्टनुसार सार्वजनिक आहेत. त्या कथा खाजगी करण्याचा पर्याय नाही.

पण तुम्ही ड्राफ्ट केलेली कथा खाजगी आहे. 

 

शोधा:

तुमचे शोध परिणाम तुमच्या खात्यामध्ये खाजगी आहेत. तुम्ही एक शोध परिणाम हटवू शकता, परंतु आजपर्यंत तुमचा संपूर्ण शोध एकाच वेळी हटवण्याचा पर्याय नाही.

 

अँड्रॉइड वर: शोध परिणाम हटवण्यासाठी त्या शोधापुढील 'x' चिन्ह दाबा

iOS वर: आम्ही 'सुचवलेले शोध' तुम्ही हटवू शकत नाही.

 

हा लेख उपयोगी होता का?