1. रिडींग चॅलेंज म्हणजे काय?
तुम्ही प्रतिलिपिच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर दररोज क्रमाने किमान एक कथा किंवा एक भाग वाचण्याचे रिडींग चॅलेंज स्वीकारल्यास, तुम्ही कॉईन्स जिंकू शकता.
2. रिडींग चॅलेंज कसे सुरू करावे?
रिडींग चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला रिडींग चॅलेंज सक्रिय करावे लागेल. तुमचे रिडींग चॅलेंज सक्रिय करण्यासाठी खालील माहितीचे अनुसरण करा.
-
माझे प्रोफाइल या पर्यायावर जा
-
रिडींग चॅलेंज पर्यायावर क्लिक करा
-
तुमचे रिडींग चॅलेंज सक्रिय करा
3. कॉईन्स जिंकण्यासाठी मला किती दिवस वाचावे लागेल?
दोन प्रकारची रिडींग चॅलेंज आहेत:
-
7 दिवसांचे रिडींग चॅलेंज - तुम्हाला दररोज 7 दिवस किमान एक कथा किंवा एक भाग पूर्ण वाचावा लागेल. तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केल्यास तुम्हाला क्लेम करण्यासाठी 5 कॉईन्स मिळतील.
-
21 रिडींग चॅलेंज- तुम्हाला दररोज 21 दिवस किमान एक कथा किंवा एक भाग पूर्ण वाचावा लागेल. तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केल्यास तुम्हाला क्लेम करण्यासाठी 20 कॉईन्स मिळतील.
एकदा तुम्ही रिडींग चॅलेंज पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला नवीन रिडींग चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे रिडींग चॅलेंज तुम्हाला पुन्हा सक्रिय करावे लागेल.
4. मी चॅलेंजदरम्यान एक दिवस वगळल्यास काय होईल?
अशावेळी, तुम्ही चॅलेंजमधून बाहेर व्हाल आणि तुम्हाला रिडींग चॅलेंज पेजवरून चॅलेंज पुन्हा सक्रिय करून पहिल्या दिवसापासून वाचन सुरू करावे लागेल.
5. मी 7 दिवसांचे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर एक दिवस वगळल्यास काय होईल, मी 21 दिवसांच्या चॅलेंजमधून बाहेर होईन का?
हो, तुम्ही २१ दिवसांच्या चॅलेंजमधून बाहेर व्हाल. तथापि, 7 दिवसांचे चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला क्लेम करण्यासाठी 5 कॉईन्स मिळतील.
6. मी प्रतिलिपि वेबसाइटवरून कथा वाचल्या तर रिडींग चॅलेंज प्रगतीसाठी दिवस मोजले जातील का?
नाही, या क्षणी आमच्याकडे वेबसाइट किंवा iOS ॲपवर कोणतेही रिडींग चॅलेंज उपलब्ध नाही. त्यामुळे, चॅलेंज जिंकण्यासाठी तुम्हाला दररोज फक्त आमच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर वाचावे लागेल.
7. रिडींग चॅलेंज एकदा पूर्ण केल्यानंतर मी पुन्हा त्यात सहभागी होऊ शकतो का?
हो, तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा रिडींग चॅलेंज सक्रिय करून त्यात सहभागी होऊ शकता.
8. रिडींग चॅलेंज जिंकून मी जिंकलेले सर्व कॉईन्स, कुठे पाहू शकतो?
तुमच्या ‘माझे कॉईन्स’ विभागात, कॉईन्स त्वरित प्रदर्शित केली जातील. पेजच्या शीर्षस्थानी असलेल्या कॉईन्स पर्यायावर क्लिक करून तुम्ही ‘माझे कॉईन्स' विभागात जाऊ शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही ‘माझे कॉईन्स’ विभागातील ‘ट्रान्ससॅक्शनची माहिती पहा’ मध्ये तुमच्या पूर्वी जिंकलेल्या कॉईन्सची माहिती पाहू शकता.
9. कोणत्या ठिकाणी मला रिडींग चॅलेंजचे पूर्ण जिंकलेले कॉईन्स पाहता येतील?
कॉईन्स हे लगेच तुमच्या बॅलेन्स मध्ये क्रेडिट होतील. कॉईन्स पाहण्यासाठी तुम्ही होम वर असताना वरती उजव्या बाजूला कॉईन्स च्या चिन्हावर क्लिक करून ‘माझे कॉईन्स’ वर पाहता येतील. ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्ससॅक्शन्स ची पूर्ण माहिती पाहायला मिळेल.
10. जर मी रिडींग चॅलेंज मध्ये बक्षिस मिळाले आणि तरीही माझ्या अकाउंट मध्ये कॉईन्स आले नाहीत तर काय करावे?
तुम्ही आमच्या प्रतिलिपि अॅपवरून कोणत्याही समस्यांबाबत थेट तक्रार करू शकता, आमची टीम तुम्हाला तुमच्या ईमेलवर 48 तासांच्या आत उत्तर देईल.