जे वापरकर्ते दरमहा २५ रुपये देऊन तुमची सदस्यता घेतात ते आपोआप तुमच्या सुपरफॅन चॅटरूमचा भाग होतील. जर तुम्हाला असे कोणतेही संदेश दिसले की ज्याची वारंवार तक्रार केली जात असेल किंवा एखाद्या लेखकाला विशिष्ट वापरकर्त्याने त्यांच्या सुपरफॅन चॅटरूमचा भाग बनवायचे नसेल तर लेखक वापरकर्त्याला चॅटरूममधून काढून टाकू शकतो. एकदा तुम्ही सुपरफॅन चॅटरूममधून वापरकर्त्याला काढून टाकल्यानंतर तुम्ही पुन्हा वापरकर्त्याला सुपरफॅन चॅटरूममध्ये जोडू शकणार नाही. तथापि, तो/ती सुपरफॅन असेल आणि चॅटरूम वगळता सुपरफॅन सदस्यत्वाचे सर्व फायदे मिळवू शकेल.
कृपया लक्षात ठेवा: वापरकर्त्याला तुमच्या सुपरफॅन चॅटरूममधून काढून टाकले जाईल परंतु तरीही तो तुमच्या साहित्यासाठी पुनरावलोकने वाचण्यास आणि लिहिण्यास सक्षम असेल. आपल्या साहित्याचे रेटिंग देखील देऊ शकतील. तुम्हाला तिथूनही व्यक्ती काढून टाकण्याची इच्छा असल्यास, कृपया युजरला प्रोफाईलमधून पूर्णपणे काढून टाकण्याचे कारण सांगून कृपया आमच्याशी संपर्क साधा