मी माझे प्रोफाइल फोटो कसे सेट करू?

प्रोफाइल सेट करताना

एकदा तुम्ही तुमचे अकाउंट तयार केले आणि ईमेल व्हेरिफाय केल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रोफाइलचा सारांश आणि त्यासोबत प्रोफाइल फोटो जोडू शकता. प्रोफाइल सारांश 5000 शब्दांपर्यंत लांब असू शकतो ज्याद्वारे तुम्ही इतर वापरकर्त्यांना तुमच्या आवडीच्या श्रेणी, तुमचे छंद, तुमचे लेखन प्रोफाइल आणि बरेच काही सांगू शकता.

कृपया तुमच्या प्रोफाइल सारांशात लिंक जोडण्यापासून टाळा. सुरक्षिततेच्या कारणास्तव, तुमच्या प्रोफाइल सारांशात जोडलेल्या कोणत्याही लिंक्स आपोआप स्पॅम म्हणून गणल्या जातील आणि अशा प्रकारे लिंक्स फक्त सामान्य वाक्य म्हणून दाखवल्या जातील.

सुरुवातीला तुमचे खाते आमच्या डीफॉल्ट प्रोफाइल फोटोसह जोडले जाईल. तुमचे प्रोफाइल वैयक्तिकृत करण्यासाठी आणि ते अद्यतनित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे प्रोफाइल चित्र कधीही बदलू शकता.

 

तुमचे फोटो बदलण्यापूर्वी, कृपया खालील गोष्टींची खात्री करा:

  1. तुम्ही ॲप वापरत असाल तर प्रतिलिपिकडे तुमच्या फोटोंचा ऍक्सेस असेल. हे तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये सत्यापित केले जाऊ शकते.

  2. तुम्ही अपलोड करत असलेली फाइल .jpg किंवा gif फाइल असावी आणि ती 1MB पेक्षा जास्त नसावी.

  3. निवडलेले फोटो कोणतेही प्रतिबंधित साहित्य नसावे. तुम्ही आमच्या कन्टेन्ट  गाइड्लाइनमध्ये प्रतिबंधित साहित्यबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

हा लेख उपयोगी होता का?