नमस्कार मित्रांनो...
प्रतिलिपीने आपल्या सर्वांसाठी खुले केलेला हा व्यासपीठ खरंच खूप स्तुतीयोग्य आहे. त्यासाठी प्रतिलिपीचे मनापासून आभार.आणि मित्रांनो, माझ्या कथांना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल - अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
लहानपणापासून आईवडिलांकडून रामायण, महाभारत, छ. शिवाजी महाराज यांच्या कथा ऐकत वाचत आलो. त्यामुळे, साहजिकच ऐतिहासिक स्थळांना भेटी, ऐतिहासिक लेख, कथा चरित्र व कादम्बरी हे जीव कि प्राण. शिवाय वाचन, लेखन, स्केचिंग, कविताही करतो. कुठे नवीन ठिकाणी गेलं, काही छान वाचण्यात आलं, काही नवीन सुचलं कि लिहून काढतो. जास्तकरून गडकिल्यांवरच फिरायला आवडतं. या सह्याद्रीच्या कुशीत गेल्यावर मनाला जी शांतता लाभते ना ती कुठंच नाही मिळणार. असं वाटतं येथील एक एक दगड आपल्याशी काहीतरी बोलू पाहतोय, काहीतरी सांगू पाहतोय. त्यांच्याशी एक जन्मोजन्मीच नातं आहे असं वाटतं. आणि मग त्यातूनच लिखाणाला स्फूर्ती मिळते. बघूया, हे लेखन कुठपर्यंत साथ देतंय आणि आपला प्रतिसाद हि तेवढाच महत्वाचा.
मला काही आवडलेले विचार :-
"वस्तू ह्या वापरासाठी असतात तर माणसं प्रेम करण्यासाठी."
"जोडता आलं नाही तरी चालेल, पण आपली माणसं कधी तोडू नका." - छ. शिवाजी महाराज
"लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून देवळातल्या देवाला भेटायला जाताना कधी कळलंच नाही की, आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय."
"मातीसाठी कधीही अव्वल शर्थ माझ्या जीवाची व्हावी, बघावे मी परस्त्रीस जेव्हा नजर माझी शिवाजी व्हावी."
"जय शिवराय"
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा