pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
सारांश

सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित होणारे मराठीतील सोलापूर दिनांक हे बातमीपत्र

वाचक
author
पद्माकर कुलकर्णी

●मागे वळून पाहताना....…..● ------------------------------------------- जे पिढीजात लाभले ते आनंदाने सोसून पाहिले | वेदनेचे वरदान होते जगणे सोने करून पाहिले "|| जे मला पुस्तकातून शिकता आले नाही ते परिस्थितीने शिकवले त्यामुळेच मी आयुष्याकडे गांभीर्याने पहात गेलो व आपले जीवन समृद्ध करीत गेलो दुःख वेदना पीडा यातना हे माझ्या जीवनाचे अविभाज्य घटक होते. सर्वांनीच जर दुःखाला झिडकारले तर त्याने तरी कोठे जावे म्हणून माझं जगणं त्याच्यासोबत अनुभव विश्व संपन्न करीत राहिलो. सातत्याने सकारात्मक विचार मनात जोपासत गेलो सन १९७२ मधला मराठवाड्यातील तो भीषण दुष्काळ आम्ही पहिला त्यावेळी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवळगा पोमादेवी या गावी आम्ही राहत होतो. त्याठिकाणी माझे वडील केंद्र मुख्याध्यापक होते. त्यांचे शनिवार दि. १० मार्च १९७३ रोजी घरातून शाळेत जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आम्ही सातजण भावंडं, आई, आम्ही तीन भाऊ, आणि चार बहिणी असा मोठा परिवार, आम्ही सगळेच लहान होतो. वडील गेल्यानंतर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न 'आ',वासून उभा होता.त्यावेळी १९७३ ला दुष्काळाची कामे होती. मग आम्ही दुष्काळाच्या कामावर तळ्याचं खोदकाम करण्यासाठी जात असे आणि माझी आई मजुरांना पाणी देण्याचे काम करत होती. १९७३ च्या डिसेंबरनंतर आम्ही ते गाव सोडलं आणि सोलापूरला राहायला आलो, काही दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या भिमानगर येथे राहिलो, माझा एक भाऊ उजनी धरणावर तारकुंडे आणि कंपनी यांच्याकडे काम करायचा, एक भाऊ मधुकरराव गिरमे यांच्या पेट्रोल पंपावर काम करायचा, आणि मी लहान असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो. त्या ठिकाणीही आमचे काही जमले नाही, म्हणजे भागले नाही, म्हणून सन १९७४ साली. भीमानगर सोडून आम्ही सोलापूरला आलो. या ठिकाणी स्थायिक झालो. आठ जणांचा परिवार, घरात कोणीही कामाला नाही, आम्ही कसे जगायचे, हा सगळ्यात मोठा प्रश्न, माझी आई लोकांच्या घरी भाकरी पोळ्याचं स्वयंपाकाचं काम करायची. आईच्या साठ रुपयाच्या पेन्शनवर आमचे घर चालायचे, अशातच आमच्या आईने मला आणि माझ्या तीन बहिणींना सोलापूरच्या रिमांड होम मध्ये शिक्षणासाठी  ठेवले होते. त्या ठिकाणी शिक्षण घेऊन पुढची वाटचाल केली. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, रिमांड होम मधून मी बाहेर पडलो. त्यानंतर काय करायचे हा प्रश्न 'आ' वासून समोर उभा होता. मी.घराजवळच सायकल पंक्चरचे काम करत असे, त्यानंतर सकाळी शंभर घरी वर्तमानपत्र घरोघरी टाकण्याचे काम, तर काही दिवस पन्नास घरी दुधाच्या बाटल्यां देण्याचे काम केले, हे काम करत असतानाच सिद्धेश्वर हायस्कूल जवळ असलेल्या महानगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेत मी शिकत होतो. त्यानंतर माझ्या आईच्या मामी ताराबाई पोतदार या हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षका म्हणून कार्यरत होत्या, त्यांचा प्रयत्नाने आणि त्यावेळेच्या पर्यवेक्षिका इंदूताई अध्यापक यांनी मला इयत्ता सहावीला प्रवेश दिला, एवढ्या मोठ्या शाळेत आल्यानंतर या ठिकाणचे शिक्षण माझ्या डोक्यावरून गेले, सहावी ते आठवी या प्रत्येक वर्गात मी दोन-दोन वर्षे काढली पुढे-पुढे तर शाळेत लक्ष लागत नसल्याने आठवीला मी शाळा सोडली. आणि पुण्याला प्लबिंगच्या(नळ काम) प्रशिक्षणासाठी गेलो. तिथून आल्यानंतर काही ठिकाणी कामही केले . आमच्या ओळखीचे उत्तम दगडू कसबे नावाचे एक ट्रॅफिक पोलीस होते. त्यांच्या ओळखीने मी रिक्षा शिकलो. आणि मला काम मिळाले. रिक्षा चालवत असताना मी नेहमी हरिभाई शाळे वरून जायचो, आणि मला उगीचाच वाटायचं की माझ्या वडीलांसारखे आपण पण शिक्षक व्हायला पाहिजे, शाळेतल्या आठवणी माझ्यामनात घर करून होत्याच,एके दिवशी आमच्या शाळेचे मुख्ययाध्यापक नी. द .कुमठेकर सर भेटले, त्यांना पुण्याला जायचे होते.माझी रिक्षा त्यांनी थांबवली. आणि ते रिक्षात बसले. त्यांना एसटी स्टँडवर सोडायचे होते. रिक्षात बसल्यानंतर त्यांनी माझी चौकशी केली. आणि तुला कुठेतरी पाहिले आहे, असं ते मला म्हणाले, मग मी त्यांना हरीभाई देवकरण शाळेत शिकत होतो. आणि आठवीला शाळा सोडली,आणि रिक्षा चालवत असल्याचे सांगितले. मनातून त्यांना दुःख झालं त्यांनी मला दोन दिवसांनी शाळेत येऊन भेट असे म्हणाले, मग मी दोन दिवसांनी शाळेत गेलो.कुमठेकर सरांची भेट घेतली.त्यावेळी आमच्या शाळेमध्ये,चाटी नावाचे हेडक्लार्क होते.त्यांना बोलावून घेतले, आणि त्यांना माझा इयत्ता दहावीसाठी सतरा नंबरचा फॉर्म भरून घ्यायला सांगितला. फॉर्म फी सरांनीच भरली. आता सतरा नंबरचा फॉर्म भरून घेतल्यानंतर शाळेत वर्गात बसायला परवानगी नव्हती,परंतु कुमठेकर सरांनी त्यांच्या अधिकारात मला इयत्ता "दहावी ड "मध्ये शाळेत प्रवेश दिला.आठवी आणि नववी या वर्गातील विषयाचे ज्ञान नव्हते, खरं म्हणजे मी शिक्षणात तसा कच्चाच होतो. आणि त्यावर मी शिक्षक होण्याची स्वप्नही पाहत होतो.कुमठेकर सर त्यावेळी शाळेच्या आवारातच राहात होते. त्यांनी पुढे आम्हाला ग्रंथालय जवळच्या आणि जिन्या- खालच्या एका खोलीमध्ये अभ्यासिका करून दिली. मी आणि माझे त्यावेळेचे वर्ग मित्र प्रवीण आळेकर,शशिकांत भांबुरे,मनोहर कुरापाटी,अविनाश कुलकर्णी,हेमंत नागणे,नीलकंठ लोंढे असे अनेक मित्र आम्ही या अभ्यासिकेत रात्रभर अभ्यास करायचो. कधी-कधी कुमठेकर सर रात्री येऊन आम्हाला गणित शिकवायचे,अनेक विषयातील अडचणी समजावून सांगायचे,शाळेत वर्गात मी कधी कधी उशिरा येत असे पण मी बाहेर काम करून शिकतो आहे हे सर्वांना माहीत होते. त्यामुळे मला सर्व जण समजून घ्यायचे, शिक्षक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या मला दहावी पास व्हायला चार वेळा परीक्षा द्यावी लागली. आता तुमच्या लक्षात आलं असेल नापासांची परंपरा माझ्या आयुष्यात अशीच राहिली एकदाचा कसा तरी पास झालो.पण माझ्या आशा परिस्थितीतही मला माझे सर्व शिक्षक आणि मित्र -मंडळी सांभाळून घेत असत.त्यावेळी आमच्या वर्गशिक्षिका विनया ठोंबरे मॅडम,अस्मिता पाटणकर मॅडम, पु.रा.खांबेटे सर,उमर्जीकर सर,,अ.ल.मोहोळकर, सर,चं.रा. जेऊरकर, अ.गो.मंद्रूपकर सर, सहस्त

टिप्पण्या
  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.