pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Marathi Story | Marathi Katha | Marathi Goshti

मराठी कथा वाचा

Marathi Story: मराठी कथा म्हणजे एखाद्या मराठी अष्टपैलू लेखकाला वाचकांशी जोडणारा दुवा. लेखक आणि वाचकांमध्ये असणारं एक कम्युनिकेशन चॅनल म्हणजे Marathi Katha असं म्हणता येईल. कथा म्हंटलं ना की पहिले आठवतात त्या बालकथा. लहानपणी ऐकलेल्या आणि वाचलेल्या परीकथा, पंचतंत्रातील कथा, अकबर -बिरबलच्या गोष्टी आणि बरंच काही. गुरु-शिष्यांच्या गोष्टी भारतीय परंपरेबद्दल सांगतात. बालकथांपासून वाचनाची खरी सुरुवात असते आणि मग Marathi Goshti वाचनाची सवयच लागते. काल्पनिक जीवन ते रिअल लाईफ स्टोरीज पर्यंतचा प्रवास हा फक्त मराठी कथेच्या माध्यमातून घडू शकतो. कल्पकता, सर्जनशीलता आणि संवाद-कौशल्य यासारख्या गोष्टी कथेच्या माध्यमातून शिकायला मिळतात.“माझ्या मराठीची बोलू कौतुके| परी अमृतातेही पैजा जिंके| ऐसी अक्षरे रसिके| मेळविन ||”अशा शब्दात ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे वर्णन केलेलं आहे. अशा प्रगल्भ मराठी भाषेचे साहित्यही तितकेच प्रगल्भ आणि सर्वोत्कृष्ट आहे की त्याचे वर्णन करताना सर्वांगावरुन मोरपीस फिरवल्याचा आभास होतो. मराठी साहित्याचा गोडवा जितका चाखावा तितका कमीच वाटतो. मराठी साहित्याचे विविध प्रकार म्हणजेच कथा, कादंबरी, ललित लेख, प्रवास वर्णनं, समीक्षा लेखन, नाटक वगैरे. यातील सर्वात जवळचा वाटणारा साहित्यप्रकार म्हणजे मराठी कथा. धकाधकीच्या जीवनात थोडा मोकळा वेळ मिळाला की आवडत्या लेखकाचा एखादा छानसा कथासंग्रह हाती घ्यावा आणि वाचन करावे हा चोखंदळ वाचकाचा आवडीचा छंद. ते विरंगुळ्याचे क्षण मनाला आनंद देतात, रिफ्रेश करतात. मूड एकदम छान होतो.जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांचे , भावनिक छटांचे उत्कट प्रकटीकरण करणाऱ्या मराठी कथांचा आस्वाद घ्यायला नेहमीच छान वाटतं. कधी कल्पेनेपलीकडच्या विश्वात घेऊन जातात, तर कधी नात्यांचे भावबंध जपायला शिकवतात, तर कधी काही थ्रिलिंग एक्सपिरियन्स देतात जे रियल लाईफपेक्षा वेगळे असल्याने एक्सायटिंग वाटतात.अशा या मराठी कथा वाचकांच्या पसंतीस पडतात. काही ऐतिहासिक कथा वाचताना अक्षरशः इतिहास जिवंत होतो. नव्याने इतिहासाची ओळख होते. शौर्यकथांची भाषा इतकी प्रभावी असते की वाचकांना स्फुरण चढते. अध्यात्मिककथांचा आणि आख्यायिका यांचा बाजच न्यारा. मराठी ट्रॅव्हलस्टोरीज, निसर्गसौंदर्याचे वर्णन करणारे साहित्य वाचल्यावर ट्रॅव्हल डेस्टिनेशनला प्रत्यक्ष जाऊन तो अनुभव घेतलाय असं वाटू लागतं. एखाद्या चांगल्या मित्राच्या सहवासात ज्याप्रकारे छान वेळ जातो त्याचप्रमाणे मराठी कथा आणि गोष्टी एखाद्या कम्पॅनियनची भूमिका सांभाळतात. Marathi Books are our best friend and best way to know the world. 

शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत अशा नवरसांचा अनुभव पुस्तकातील मराठी कथांद्वारे घेता येतो. त्यातील शृंगार रस म्हणजेच रोमँटिक स्टोरीज तर तरुणाईचे मन मोहून टाकतात. तर काही मराठी कथा रिअल आयुष्यावर आधारित असतात अशा कथा जगण्याचा मंत्र शिकवून जातात. अशा मराठी कथांमधून वाचकांना मेंटल आणि इमोशनल सपोर्ट मिळत असतो. मानवी जीवनातील असंख्य पैलू दाखवणाऱ्या कथा मराठी वाचन-संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. हॉरर स्टोरीज, सस्पेन्स स्टोरीज, फिक्शन स्टोरीज अतिशय रंजक असतात आणि त्या वेगळ्याच दुनियेची सफर घडवतात. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" असं कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेत लिहिलं आहे. "जाहलो खरेच धन्य वाचतो मराठी कथा" असंही म्हणायला हरकत नाही. मराठी भाषेला लाभले आहेत उत्तमोत्तम आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे लेखक आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीला भरभरून प्रतिसाद देणारा वाचकवर्ग. Katha Lekhan in Marathi (मराठी कथालेखन) केलेल्या साहित्यिकांमुळे मराठी भाषेने वेगळीच उंची गाठली आहे. मराठी भाषेला लाभलेले असंख्य लेखक आहेत ज्यांनी त्यांच्या लेखनशैलीने (Story Writing in Marathi) वाचकांच्या मनावर वेगळाच ठसा उमटवला. सानेगुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकातील छोट्या-छोट्या गोष्टी मुलांना संस्कारक्षम बनण्यास मदत करतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके राष्ट्रप्रेमाचे धडे देतात, पु.ल. देशपांडेंच्या 'अपूर्वाई' सारख्या प्रवास कथा देशोदेशीचे अनुभव सांगतात. त्यांच्या 'खिल्ली, गणगोत, गोळाबेरीज' अशा पुस्तकांमधील विनोदी मराठी कथा खळखळून हसवतात. पु .ल.देशपांडे यांनी 'व्यक्ती आणि वल्ली' यात वर्णन केलेल्या कॅरेक्टर्सबद्दल वाचताना असं वाटतं की ती कॅरेक्टर्स जिवंत होऊन वावरत आहेत. रोजच्या आयुष्यातील गमती-जमती सांगत चि.वि.जोशी यांच्या मराठी कथा रंगतात. हास्य-चिंतामण, चिमणरावांचे चऱ्हाट, हापूस-पायरी,पाल्हाळ हे काही चि. वि .जोशी यांचे विनोदी कथासंग्रह. याउलट नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा रोचक ठरतात. 'चेटकीण, अनोळखी दिशा,ग्रहण, परिसस्पर्श' हे काही नारायण धारप यांचे कथासंग्रह. 'गहिरेपाणी' हा रत्नाकर मतकरींचा कथासंग्रह. यातील कथांवर आधारित सिरिअल पण प्रदर्शित झाली होती. अशा मराठी रहस्यकथा वाचता-वाचता उत्सुकता वाढत जाते आणि खूपच थ्रिल जाणवतं. मराठी रहस्यकथांचा आस्वाद घेणे म्हणजे एक रोलर-कोस्टर राईडच आहे. जयंत नारळीकरांच्या 'प्रेषित, यक्षांची देणगी यांसारख्या विज्ञानकथा मनोरंजन करतात. ग्रामीण ढंगातील शंकर पाटील, द.मा.मिरासदार, माडगूळकर यांच्या मराठी कथा आजही आवडीने वाचल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रदेशातील मराठी बोली भाषेची ओळख करुन देतात. रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, अरुणा ढेरे आणि आशा बगे, माधवी देसाई ,सुमती क्षेत्रमाडे, मंगला गोडबोले यांसारख्या लेखिका स्त्रीप्रधान कथांचे लेखन करतात. त्यांच्या कथा कधी कधी सामाजिक प्रश्न आणि महिलांचे प्रश्न यावर भाष्य करणाऱ्या ठरतात. काही महान व्यक्तींच्या मोटिवेशनल स्टोरीज तरुणाईला दिशादर्शक असतात. एखादी स्टोरी-लाईन घेऊन त्या विषयावर नाट्यनिर्मिती करणारे अनेक लेखक आहेत. अशाप्रकारचे विविध शैलीचे Story Writing in Marathi म्हणजे मराठी कथेची खासियत आहे.

मराठी वाचक हा नेहमीच नवनवीन कथांची मेजवानी चाखायला उत्सुक असतो मराठी वाचन संस्कृतीची गरज ओळखून प्रतिलिपि घेऊन आलंय उत्तम आणि दर्जेदार मराठी कथांची मेजवानी लाडक्या वाचकांसाठी. विविधता हा आयुष्याचा इंटरेस्टींग आणि महत्वाचा भाग आहे. नवोदित लेखक आणि त्यांच्या विविध विषयांवरील मराठी रोचक आणि मनोरंजक कथा पुस्तक स्वरुपात नव्हे, तर त्या कथा प्रतिलिपिच्या माध्यमातून ऑनलाईन वाचायला सहज उपलब्ध आहेत. ऑडिओ-व्हिजुअल माध्यमातून या कथा वाचताना वेगळाच अनुभव घेता येईल. ऑडिओ बुक्स आणि कॉमिक्स बुक्स असोत त्यात नवोदित लेखकांची प्रतिभा दिसून येते. कॉमेडी स्टोरी असो की फँटसी असो. किंवा फिक्शन स्टोरी असो की हॉरर स्टोरी असो. प्रत्येक मराठी कथेमध्ये उत्तम थीम, स्टोरीलाईन, मांडणी, शब्दांची निवड,कॅरेक्टरची निवड इतकी छान आहे की लहान-मोठे सारेच जण स्टोरी वाचण्यात दंग होऊन जातील. समाज जीवनात बदल घडवून आणणाऱ्या काही प्रबोधनात्मक मराठी कथा, महान लोकांच्या जीवन-चरित्र कथा ज्या वाचकांना इन्स्पायर करतील.अशा अनेकविध विषयांच्या मराठी कथा प्रतिलिपि ॲपवर उपलब्ध आहेत.काही कथा सत्यघटनांशी इतक्या जुळतात की, जणू कथाही सत्य असल्याचा भास होऊ लागतो. विषयांतील वेगळेपणा आणि कॉमिक बुक्समध्ये केलेला चलचित्रांचा वापर हे प्रतिलिपिचे आणखी एक वैशिष्ट्य. ऑडिओ-बुक्समधील स्टोरीज ऐकताना तर डोळ्यासमोर अक्षरशः ती सिरीयल चालू आहे असं वाटतं. प्रतिलिपि या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालेल्या मराठी कथांचे टायटल्स खूप आकर्षक आहेत. वाचकांच्या अंतर्मनाचा आरसा असणाऱ्या या अनेक मराठी कथा प्रतिलिपिच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून त्यांना मिळणारं रेटिंग ४.२ ते ४.९ इतके उत्कृष्ट आहे. उत्तम लेखनाचा दर्जा राखत प्रतिलिपिने नेहमीच कथामालिकांद्वारे वाचकांशी नाळ जोडली आहे. २४ जॉनर्समध्ये मराठी स्टोरीज प्रेझेंट करणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वाचकांसाठी कुठेही कधीही उपलब्ध आहे.

अधिक पहा
pcp2challengemarathi