pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रेमकथा | Romance Stories in Marathi

मराठी साहित्य श्रेणीमधलं मीठ म्हणजे प्रेमकथा (romance stories in marathi). मिठशिवाय अन्न म्हणजे बेचव. प्रेमकथा (romance stories in marathi) म्हणजे वाचक मंडळीचा अगदी जीवाभावाचा विषय. यात कुठल्याही वयाचं बंधन नाही. ऐन तारुण्यात पाऊल ठेवलेला युवक-युवती असो की गुडघेदुखीने त्रस्त असलेले वयोवृद्ध असो, प्रेमकथा (romance stories in marathi) सर्वांनाच भुरळ पाळतात.

प्रेमामध्ये अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद असते. प्यार किया तो डरना क्या? असं म्हणतं आपल्या कथेचे नायक-नायिका प्रेमात पडतात आणि मग सुरू होते त्यांची प्रेमकहाणी. कथेतील मुख्य पात्र म्हणजे प्रेमयुगूल; जे कुठल्याही प्रेमकथेचे (romance stories in marathi) हृदय असते. मग यासोबत असणारी इतर पात्रे एकतर त्या जोडप्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी किंवा त्यांच्या सुखी जीवनात अडचणी निर्माण करण्यासाठी असतात. अशा कथांमध्ये प्रेमी युगूलाची प्रेमकहाणी वाचकांच्या हृदयापर्यंत नेण्यावर लेखकांचा जास्त भर असतो आणि आपल्या कथेचा शेवट जेव्हा हॅप्पी एंडिंग मध्ये होतो तेव्हा तर वाचकांसाठी दुग्धशर्करा योगच!

प्रेमकथा (romance stories in marathi) श्रेणीच्या कादंबऱ्या, चित्रपट, नाटकं आपल्या पाहण्यात येतात. माध्यम कुठलंही असलं तरी प्रेमकथेचं आकर्षण तीळभरही कमी होत नाही आणि म्हणूनच या श्रेणीचे चित्रपट किंवा रोमँटिक कथा सुपर डुपर हिट होतात. लेखक आपल्या कल्पनेतून अनेक पात्र जीवंत करतात. मग ही पात्रे वर्षानुवर्षे वाचकांच्या मनात अगदी घर करून राहतात. शब्दांमधून पानावर आलेली आणि पानावरून मनात उतरलेली पात्रे आपण कधीच विसरू शकत नाही. मग अश्या प्रेमकथेमध्ये येणारे प्रेमयुगूल आपल्या मनात घर करून जातात आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये आपण स्वतः ला बघतो आणि तो प्रवास आपणही जगतो, अनुभवतो.

जर तुम्हीही प्रेमकथेचे (romance stories in marathi) वाचक आहात तर तुम्ही प्रतिलिपी ॲप डाउनलोड करू शकता. येथे तुम्हाला लाखो मराठी प्रेम कथा वाचायला मिळतील . आम्ही दर आठवड्याला नवनवीन कथांची भर इथे घालत असतो. या ॲपची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे इथे वाचनासोबत तुम्ही स्वतः कथा लिहून प्रकाशित करू शकता. तुमच्या कल्पनेतले पात्र उभारू शकता, त्यांचा संसार फुलवू शकता किंवा तुमची स्वतःची काही प्रेम कथा असेल तर तीसुद्धा तुम्ही लिहून प्रकाशित करू शकता. आहे ना सर्व मनोरंजक? चला तर मग तुमच्या लेखणीला मुक्त सैर करायला मदत करा आणि लिहते व्हा.

अधिक पहा