pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Writing

प्रतिलिपि वर कोण साहित्य प्रकाशीत करू शकतो/शकते ?

 कोणीही प्रतिलिपि वर लिहू शकतो/शकते. तुमचे विचार, कल्पना, मत मांडू शकता. तुम्हाला कथा, कविता शायरी लिहून प्रकाशित करा. एकदा तुम्हाला तुमच्या मेल आयडीने साइन अप करून घ्यावे लागेल अँप व वेबसाईटवरती.          

स्वतः प्रतिलिपिवर कसे प्रकाशित करायचे ?

     लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रकाशित करण्याविषयी मार्गदर्शन घेऊ शकता : 

https://marathi.pratilipi.com/story/प्रतिलिपि-सेल्फ़-पब्लिशिंग-गाईड-6VeBZzqpmZK0

 मोबाईलचा वापर प्रकाशित करण्यासाठी : - 

 i. कृपया प्रतिलिपि अँप प्ले स्टोरमधून डाउनलोड करून घ्या.(तुम्हाला मोबाईलच्या ब्राऊजर लिखाण करता येणार नाही) iOS वर प्रतिलिपी सद्या अस्तित्वात नाहीये, लवकरच येईल. तुम्ही प्रतिलिपिच्या डेस्कटॉप वेबसाइटवरून सुद्धा प्रकशित करू शकतात. 

ii.  जर तुम्ही प्रतिलिपि मध्ये नवीन असाल तर मेल आयडीने साइनअप करू शकतात. आणि जुने वाचक/ लेखक असाल तर मेल आयडीने साइन इन करून प्रतिलिपिवर येऊ शकतात.

iii. तुम्ही जेव्हा प्रतिलिपिच्या होमपेज वर याल त्यावेळी उजव्या बाजूला असलेल्या लिहिण्याच्या पेन च्या आयकन वर क्लिक करू शकता.

iv. आता तुम्ही ज्याविषयी लिहायचे जसे, कथा/कविता/कथामालिका त्यावर क्लिक करून लिहू शकतात. 

 लॅपटॉप/डेस्कटॉप वरून प्रकाशित करण्यासाठी: 

 i. कृपया भेट द्या येथे http://www.pratilipi.com आणि तुमची भाषा निवडून घ्या.

ii.  जर तुम्ही प्रतिलिपि मध्ये नवीन असाल तर मेल आयडीने साइनअप करू शकतात. आणि जुने वाचक/ लेखक असाल तर मेल आयडीने साइन इन करून प्रतिलिपिवर येऊ शकतात. - 

iiii. तुम्ही जेव्हा प्रतिलिपिच्या होमपेज वर याल त्यावेळी उजव्या बाजूला असलेल्या लिहिण्याच्या पेन च्या आयकन वर क्लिक करू शकता. 

iv. येणाऱ्या पॉप-अप बॉक्स मध्ये लिखाणाचा प्रकार, शीर्षक ही माहिती पूर्ण भरून जमा करा. 

v.  तुम्ही लिखाणाच्या पॅनलच्या पेज मध्ये याल, आता येथे तुमचे लिखाण लिहा आणि त्यानंतर जतन करा येथे जाऊन सेव्ह करा आणि नंतर प्रकाशित करून घ्या. 

ह्या विभागामध्ये तुम्हाला प्रकाशित करण्याचे मार्गदर्शन, ब्लॉग्स, मुलाखती प्रतिलिपिचे ऑनलाईन इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळतील.  

 अँपवरती - अँपच्या होमपेज मध्ये ‘लिहा’ (पेन आयकन) बटन खालच्या बाजूला तुम्हाला मिळेल. 

वेबसाईटवरती - होमपेज वर ‘लिहा’(पेन आयकन) बटन वरच्या-उजव्या तुम्हाला मिळेल. 

 संग्रह 

ह्यामध्ये असे लिखाण असेल जे तुम्ही प्रकाशित केले नाहीये आणि हे लिखाण फक्त तुम्हालाच दिसेल. 

 मराठी भाषेमध्ये टाईप करताना 

 1) आमच्या वेबसाईटवरती - आम्ही टाईप करण्यासाठी टूल विकसित केले आहे, उदा. तुम्ही जर nav असे टाईप केले तर ते नाव’ ते असं टाईप होईल. म्हणजे ते आपोपाप मराठीत येईल. 

2) अँपवरती - तुमच्याकडे जर मराठी भाषेला सपोर्ट करणारे कीबोर्ड असेल तर उत्तमच. आणि जर तुमच्याकडे असे कीबोर्ड नसेल तर ‘google indic keyboard’ हे अँप प्ले स्टोर वरून डाउनलोड करून मराठी भाषेत लिहू शकता. आणि https://www.youtube.com/watch?v=3MDmSs63n1Y  ह्यावर जाऊन हे अँप कसे वापरता येईल ते पाहू शकता. 

कविता लिहणे/कथा/सामाजिक-वैचारिक  

सेल्फ-पब्लिशिंग गाईडचा वापर करा - https://marathi.pratilipi.com/story/प्रतिलिपि-सेल्फ़-पब्लिशिंग-गाईड-6VeBZzqpmZK0

 कथामालिका लिहण्याविषयी 

कथामालिका सेल्फ-पब्लिशिंग गाईड वापरा आणि त्याची व्हिडीओ ट्युटोरिअल पाहू शकता 

समस्या/ एरर 

 लिखाण गायब होणे 

i. जर तुम्ही डिलीट ह्यावर क्लिक केले तर तुमचे लिखाण कायमचे डिलीट होऊ शकते. अशावेळी प्रतिलिपि टीम सुद्धा तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. 

ii. खूप अशा दुर्मिळ वेळेस, काही टेक्निकल एरर मध्ये जर तुमचे लिखाण गायब झालेच तेव्हा तुम्ही प्रतिलिपिला मेल करू शकता. आम्ही त्यावेळी तुम्हाला मदत करू. 

  प्रकाशित होत नसेल 

जर साहित्य प्रकाशित होत नसेल तर आम्हाला येथे मेल करा [email protected] किंवा 8296929192 (11 AM to 8 PM Mon-Fri) ह्या दरम्यान कॉल करू शकता.  

 संपादित करणे 

अँपवरती - लिखाणाचा कोपरा’ ह्या विभागात तुम्हाला तुमचे सर्व अप्रकाशित साहित्य, प्रकाशित साहित्य दिसेल. तुम्हाला तुमचे साहित्य एडिट/संपादित करायचे असेल तेव्हा संपादित करा’ ह्यावर क्लिक करून तुम्हाला हवे असलेले बदल करून सेव्ह करू शकता. 

वेबसाईटवरती - संपादित/एडिट करण्यासाठी लिहा’ ह्या विभागात जाऊन तुम्ही प्रकाशित साहित्यात एडिट करू शकता. आणि त्याचवेळी तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तुमच्या सर्व साहित्यात बदल करू शकता. एडिट/संपादित किंवा तुम्हाला जो बदल हवा असेल तो करू शकता. 

 साहित्याचे प्रमोशन 

 प्रतिलिपिची रिकमन्डेशन सिस्टम तुमच्या लिखाणाला जास्तीस्त जास्त वाचकांपर्यंत नेण्यासाठी मदत करेल. ह्यामध्ये तुमचे साहित्य योग्य वाचकांपर्यंत पोहोचून तुम्हाला जास्त वाचक मिळतील ह्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी तुम्हाला मदत करतील : 

i. लिखाण तुमचे स्वतःचे असायला हवे, व्याकरण थोडे फार चुकीचे असायला हवे, कव्हर इमेज हे कथेला पूरक असायला हवे आणि महत्वाचे श्रेणीची/कॅटेगरी योग्य निवड. ह्या गोष्टी असल्यास तुमचे साहित्य हे तुम्हाला हे साहित्यदेखील वाचावयास आवडेल ह्यामध्ये येईल. 

ii. तुमचे साहित्य सोशल मीडियावरती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. 

इव्हेंट्स 

 इव्हेन्ट/स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी 

आम्ही दर आठवड्याला नवनवीन ऑनलाईन लिहण्याची स्पर्धा घेत असतो. तुम्हाला ह्या विषयी जास्त माहिती मिळवायची असेल तर, ‘ऑनलाईन स्पर्धा’ (श्रेणी वर क्लिक करून खालच्या बाजूला स्क्रोल करून तुम्हाला मिळेल) ह्या ठिकाणी क्लिक करून पूर्ण माहिती मिळेल.  

 

 ऑनलाईन स्पर्धेचे विजेते

 प्रतिलिपिचा स्पर्धेचा निकाल हा प्रतिलिपिने जे नियम ठरवले आहेत त्यानुसार लागत असतो. पण त्यात आम्ही बदल करत असतो. खाली दिलेल्या गोष्टींवरून लक्षात येईल. 

i)परीक्षण समिती - निकाल ह्या समितीचा माध्यमातून दिला जाईल, त्यासाठी स्पर्धेची थीम, व्याकरण ह्या गोष्टी पाहिल्या जातील. (प्रतिलिपि टीम कडे निकालाबाबत सर्वाधिकार सुरक्षित आहेत) 

ii)  वाचकांच्या आवडीने निकाल - स्पर्धेचा निकाल हा ठरविण्यासाठी आम्ही रीड काउंट, वाचन कालावधी, समीक्षा ह्यांचे गणितीय पद्धतीने निकाल ठरविला जातो. आम्ही एकदम कुणालाही विजेते घोषित करत नाहीत. आणि जर विजेता असलेल्या व्यक्तीने कॉपी, अश्लील असेल तर विजेत्याला रद्द केले जाईल. 

ऑडिओ

ऑडिओ साहित्याविषयी

 तुम्ही स्वतः ऑडिओ तयार केले असेल तर आम्हाला [email protected] वर पाठवा.आणि ज्या साहित्याचे तुम्हाला ऑडिओ करायचे असेल ते साहित्याची लिंक आम्हाला वरच्या मेलवर पाठवू शकता. जो ऑडिओ तुम्ही पाठवाल तो नॉइजफ्री असावा.

कॉपीराईटचे हस्तांतरण म्हणजे काय?

प्रत्येक लेखकास प्रकाशित करताना त्याच्या मूळ कार्याचा कॉपीराइट असतो. कॉपीराइट ऑनरला (मालकाला) कोणत्याही प्रकारे त्याचा वापर करण्याचा आणि त्याच्या परवानगीशिवाय इतरांना असे करण्यापासून रोखण्याचा अधिकार आहे.

एक कॉपीराइट ऑनर (मालक) अटी व शर्तींशी सहमत होऊन त्याचा संपूर्ण कॉपीराइट हक्क हा काही प्रमाणात दुसर्‍या व्यक्तीकडे (तृतीय पक्षाकडे) हस्तांतरित करू शकतो.

  1. पूर्ण अधिकार सोपवण्याबाबत - या स्थितीमध्ये, लेखक आणि मालक त्यांचे सर्व अधिकार दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्थेकडे हस्तांतरित करतात. इतर व्यक्ती किंवा संस्था त्यांना पाहिजे त्या मार्गाने या हक्कांचा वापर त्यांना करता येतो.
  2. मर्यादीत अधिकार सोपवण्याबाबत - ह्यामध्ये लेखक मूळ स्वमालकीची काही (संपूर्ण नाही) अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो जसे की, ऑडिओ साठी. आणि काही भुप्रादेशिक भागात जसे की, फक्त भारतात. किंवा ह्यामध्ये फक्त काही अल्पशा गोष्टींबाबत जसे की, अनुवाद करण्याबाबत, प्रसारित करण्याबाबत. लेखक विविध अधिकार / व्यक्तींकडे विविध हक्क हस्तांतरित करू शकतात.

खालील बाबींमध्ये, आम्ही अंशतः कॉपीराइट केलेल्या हस्तांतरण करारामध्ये सहसा आढळणार्‍या निर्बंधांचे तपशीलवार वर्णन केले आहे :)

  • एक्टिविटी वरती निर्बंध

असाईनमेंटमध्ये लेखक कोणता अधिकार हस्तांतरित करू इच्छित आहे ते ठरवू शकतो - उदाहरणार्थ ऑडिओ रूपांतरण, पुस्तक प्रकाशन इत्यादी आणि कोणत्या भाषेसाठी त्याला हक्क हस्तांतरित करायचे आहेत.

  1. कोणास हस्तांतरित करता येईल यावर निर्बंध (अपवर्जन)

पक्षांनी असा निर्णय घेतला पाहिजे की लेखकाने आपला हक्क दुसर्‍या पक्षाला पूर्णपणे द्यावा किंवा त्यावर कोणतेही बंधन नसावे.

  1. विशिष्ट देश किंवा प्रदेशासाठी असाइनमेंट करता येतात का?

असाइनमेंट कराराचे पक्ष हे ठरवू शकतात की करारा अंतर्गत रचना विशिष्ट प्रदेशात मर्यादित आहे किंवा ती जगभर वापरली जाऊ शकते.

  • असाइनमेंट विशिष्ट कालावधीसाठी वैध आहे का?

असाइनमेंट करार हा विशिष्ट कालावधीसाठी किंवा कायमचा करार करायचे हे ठरवू शकतात मध्यभागी हा करार सोडण्याचा अधिकार त्यांनी तपासला पाहिजे हे लेखकाने लक्षात घ्यावे.

हक्क मिळवल्यानंतर त्यांचा वापर केला गेला नाही तर?

1 वर्षासाठी अधिकार मंजूर झाल्यानंतर ते वापरण्यात आले नसल्यास असाइनमेंट करार अस्तित्त्वात नसू शकतो.

परंतु करारामधील पक्ष सहमत होऊ शकतात की हक्कांचा उपयोग न केल्यानेही असाइनमेंट बर्‍याच काळासाठी चालू राहील की नाही.

 

  1. पेमेंट कशी ठरवली जाऊ शकते ?

देयक विनामूल्य आहे की पैसे वर आधारित यावर पक्ष निर्णय घेऊ शकतात.

जर पैसे असतील तर ते एकाच वेळी दिले जाईल किंवा ते कोणत्या ना कोणत्या रॉयल्टी / रेव्हेन्यू वा अन्य कोणत्या पद्धतीने दिले जाईल.

 

  1. लेखक कोणत्याही पक्षाच्या सहमतीने केलेल्या असाइनमेंटची निवड रद्द करू शकतो?

स्वाक्षरी केलेला करार त्यांना परवानगी देत असल्यास किंवा करार विशिष्ट कालावधीसाठीच वैध असेल तर लेखक निवड रद्द करू शकतात.

एका पक्षाला ऑडिओ वितरित करण्याचे अधिकार दिल्यानंतर आपण हा हक्क दुसर्‍या पक्षाला देऊ शकता?

तुम्ही तुमचा करार तपासून घ्यायला हवा कारण पक्षकाराने ऑडिओ हक्क फक्त त्यांच्या प्लॅटफॉर्मपर्यंतच मर्यादित ठेवले आहेत की नाही. विशेषत: दिले असल्यास, कृपया कोणत्या कालावधीसाठी ते वैध आहे ते पहा. त्या कालावधीची मुदत संपल्यानंतर आपण ऑडिओचे वितरण अन्य पक्षास अधिकृत करू शकता.

कोणत्याही पक्षाला कोणत्याही प्रकारचे विशेषाधिकार द्यावे?

हे तुम्ही घेत असलेल्या डीलवर पूर्णपणे अवलंबून आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कामासाठी मोबदला घेत असाल तर आपण ठराविक काळासाठी विशेष अधिकार देऊ शकता. परंतु जर आपल्याला पैसे दिले जात नाहीत तर आपण हे सुनिश्चित केले पाहिजे, जेणेकरून आपण आपले कार्य अन्य प्लॅटफॉर्मवर / मंचांवर देखील वितरित करू शकता.

कृपया आपल्या निर्मितीस हक्क देताना वरील बाबी लक्षात ठेवा.

तुमची निर्मिती शक्य तितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि कोणत्याही पक्षासह केलेल्या अटी व शर्ती आपल्याला असे करण्यास प्रतिबंधित करत नाहीत हे देखील सुनिश्चित कर

माझा प्रश्न येथे नमूद केलेला नाही 

कृपया आमच्याशी संपर्क साधा