pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Read top Marathi stories

आपल्या जीवनात निरंतर काहीना काही गोष्टी (Marathi stories) घडत असतात. आपल्या सोबत घडलेली घटना मग ती हास्यास्पद असो, रोमांचक असो किंवा भीतीदायक असो, आपल्यासाठी ती एक ‘गोष्टच’ असते. मानवतेचा इतिहाससुद्धा गोष्टीतूनच उभा राहिला आहे यामध्ये दुमत नाही. म्हणूनच कि काय गोष्ट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे.

पण हल्लीच्या काळात आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके व्यस्त होऊन गेलो आहोत की, आपल्याकडे पूर्वीसारखा छान छान मराठी गोष्टी वाचून आपले मन रमवायला सुद्धा वेळ नाहीये याकडे आपले लक्षही जात नाही!

परंतु, काळजी करू नका! आमच्याकडे तुमच्यासाठी एक आनंददायी आणि तितकीच रंजक बातमी आहे. होय, आता तुम्ही अगदी सहजगत्या पुन्हा छान छान गोष्टींशी स्वतःला जोडू शकता! आम्ही तुम्हाला गोष्टींच्या त्या मनमोहक, रहस्यमय आणि जादुई जगात पुन्हा घेऊन जाऊ शकतो. "प्रतिलिपि" एक असे ऑनलाईन माध्यम आहे जे तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या गोष्टींशी (Marathi stories) जोडू शकते. ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला “प्रतिलिपि” ॲप विषयी माहिती करून देणार आहोत.

खालील यादीमध्ये आमच्या व्यासपीठावरील काही प्रसिद्ध मराठी गोष्टी (Marathi stories) देत आहोत. ज्या वाचताना तुम्हाला नक्कीच खूप मजा येईल. शिवाय, काहीवेळासाठी वास्तवापासून दूर कथेच्या एका अनोख्या विश्वात सहज एक सैर मारून येता येईल. तेव्हा, लगेच घरातला तुमचा आवडता कोपरा शोधा आणि या संधीचा पुरेपूर लाभ घ्या!

1 . सरोगेट मदर (Surrogate mother)

ही गोष्ट (Marathi stories ) मुख्य नायिका 'अवनी'च्या अवती भवती फिरते. अवनी एक सावळ्या रंगाची पण गोड मुलगी आहे जिला समाजाने तिच्या रंगामुळे आणि शरीरयष्टीमुळे नाकारले आहे. पण ती रोज ठामपणे या समाजाशी लढा देत आहे.

'अधिराज' एक फेमस रॉकस्टार आहे जो या गोष्टीचा नायक आहे. ज्याची स्वतःची एक गर्लफ्रेंड पण आहे. तरीही का त्याला सरोगेसीची गरज पडते? अवनीला काही कारणामुळे सरोगेसी करावं लागतं पण त्याला तिचा नाईलाज आहे.

अधिराज त्याच्या प्रेयसीला सोडून अवनीला जवळ घेईल कि अवनी स्वतःच्या पोटची मुलं देऊन कायमची अधिराजच्या आयुष्यातून निघून जाईल?

बघूया प्रेम, रोमांच आणि साधारण मुलीच्या जीवनाशी जोडलेली ही गोष्ट! जिच्या प्रत्येक भागाच्या शेवटी कथानक एक नवीन वळण घेते आणि गोष्ट वेगाने पुढे जाते. आम्हाला खात्री आहे कि, तुम्हाला हि गोष्ट वाचताना खूप आनंद येईल! तर वाचा सरोगेट मदर गोष्ट (Marathi stories ) फक्त प्रतिलिपि ॲप वर.

त्वरित वाचा

2. सुख म्हणजे काय (Sukh mhanje kay)

गोष्टीचा (Marathi stories) मुख्य नायक 'आरुष' ज्याने खूप कमी वयात प्रचंड यश मिळवले आहे. तो एका मोठया कंपनीचा मालक आहे, अगदी अय्याशी करणारा पण कामात तितकाच चपळ आणि जबाबदार! मुख्य नायिका आहे 'आरोही', ती एक सुंदर आणि सोज्वळ मुलगी आहे. पण वयाच्या १२व्या वर्षीच आई-वडिलांचा छत्र हिरावून गेलेली. अशा कठीण परिस्थितीत मामाने जवळ केलेली पण मामीकडून होणार असह्य छळ तिला चुकला नाही.

योगयोगाने आरुष आणि आरोहीची भेट होते जिथे आरोही आरुषचा अपमान करते. पण नेमके असे काय घडले कि तिला त्याचा अपमान करावा लागला? आरुष या अपमानाचा बदला घेईल का?

आरुष तिचा बदला घेऊन तिचे जीवन आणखी खराब करून टाकेल कि आरोहीच्या आयुष्यात आणखीन काही घडेल?? प्रेम, रहस्य आणि आटोकाट रोमांचाने भरलेली गोष्ट जिच्या प्रत्येक भागाच्या शेवटी गोष्ट एक नवीन वळण घेते आणि सुरु होतो एक खेळ! आम्हाला खात्री आहे कि तुम्हाला हि गोष्ट वाचायला नक्कीच आवडेल. तर, हेलावून सोडणारी गोष्ट (Marathi stories) 'सुख म्हणजे काय' वाचा फक्त प्रतिलिपि ॲप वर.

त्वरित वाचा

3. रक्षक (rakshak)

'रक्षक' ही गोष्ट (Marathi stories) सन 1468 पासून सुरु होते जिथे 'अक्रूर' हा एक भयंकर तामस वृत्तीचा माणूस ज्याने सगळ्या वाईट शक्तींना त्याच्या नियंत्रणात आणले आहे. त्याला संपवण्यासाठी राणी निकराचे प्रयत्न करते पण ते सर्व विफल होतात.

याउलट राणीलाच त्याच्या मंत्रांच्या ताकदीसमोर बंदी बनवावे लागते. अनेक वर्षांपासून चालू असणारे चांगल्या आणि वाईट शक्तींमधील युद्ध आज हि चालू आहे.

हि गोष्ट एक अशा मुलाची आहे जो साधारण दिसत असतानाही असाधारण शक्तींचा स्वामी आहे. नायक 'अजय' रक्षक आहे ज्याच्याकडे अनेक प्रकारच्या शक्ती आहेत ज्यांच्या वापराने तो सहज कोणत्याही वाईट शक्तीला धुळीस मिळवू शकतो. असे असतानाही त्याच्या जीवाला धोका का आहे? अजय ह्या भीषण अक्रूरला लढा देऊ शकेल कि या युद्धात स्वतःची आहुती देईल?

वाचा शरीर गोठवणारी भयकथा ज्यामध्ये परिपूर्ण रहस्य आणि रोमांच आहे. 'रक्षक' हि गोष्ट (Marathi stories) वाचकाला खिळवून ठेवते. जर तुम्हालाही अशी एखादी गोष्ट वाचायची असेल तर इथे तुमचा शोध संपला आहे. 'रक्षक' वाचा फक्त प्रतिलिपि ॲप वर.

त्वरित वाचा

4. बरसून आले रंग प्रीतीचे (barsuni aale rang pritiche )

समजा कधी असे झाले की, एका अनाथ मुलीला समजले की ती एक राजकुमारी आहे. तर? तुम्हाला जे वाटेल तेच तिलाही वाटले असेल ना? या गोष्टीची नायिका 'प्रणिती' आहे. जीसुद्धा एका अनाथाश्रमामध्ये वाढली आहे.

सगळे सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच अचानक 'ऋग्वेद' तिला किडनॅप करतो आणि तिच्याशी जबरदस्ती लग्न करतो. पण ऋग्वेद तिच्यासोबत असे का करतो? अणि जऱ ती राजकुमारी आहे तर, ती अनाथाश्रमामध्ये का राहत आहे? असे काय घडले असेल की, तिच्या सोबत इतके वाईट होत आहे?

जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा, 'बरसुनि आले रंग प्रीती चे'

गोष्ट वाचताना तुम्ही गोष्टीत पुरेपूर गुंतून जाल याची आम्हाला खात्री आहे. रोमांस, सस्पेंस अणि आणि आयुष्याची वेगळी बाजू दाखवणाऱ्या एक परिपूर्ण गोष्टीच्या (Marathi stories) तुम्ही शोधात असाल तर आजच प्रतिलिपि ॲप इनस्टॉल करा आणि वाचा 'बरसुनि आले रंग प्रीती चे'.

त्वरित वाचा

5. रिधिमा एक बेपणाह दिवाणगी (ridhima ek bepanah diwangi )

'रिधिमा' गोष्टीची (Marathi stories) नायिका जी कॉलेज मधे शिकत आहे. तिचा एक क्लासमेट तिच्या प्रेमात आहे जो नशेच्या भरात तिला प्रपोज़ करतो पण तिच्या नकारामुळे मित्रांसोबत मिळून तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो.

पण रिधिमा तिथुन पळून जाण्यात यशस्वी होते आणि इथेच आपल्याला भेटतो गोष्टीचा नायक 'आर्यन'. जो तिला वाचवतो पण विशेष ड्रग्सच्या प्रभावामुळे ती स्वतःला कंट्रोल करू शकली नाही आणि त्या दोघांमध्ये नकळत प्रणय होतो..यांनतर तो निघून जातो .

रिधिमाला आर्यन पुन्हा भेटेल की, तो परत कधीच येणार नाही? ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक भागामध्ये नविन आश्चर्यजनक वळणावर घेऊन जाईल..

तुम्हाला ही गोष्ट (Marathi stories) वाचायला नक्कीच आवडेल. या कथेचा रोमांस आणि सस्पेंस तुम्हाला खूप आनंद देईल आणि सोबतच एका सोज्वळ आणि निरागस प्रेमाच्या विश्वात घेऊन जाईल.

त्वरित वाचा

तर या आहेत आमच्या काही टॉप मराठी गोष्टी. अशाच आणखी मनोरंजक मराठी गोष्टी (Marathi stories ) वाचण्यासाठी आजच “प्रतिलिपि” ॲप इनस्टॉल करा आणि अनेक सुविधांसह गुंतवून टाकणाऱ्या कथांचा आनंद घ्या.