pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Copyright

सेवेचे नियम 

 ह्या लिंकवर क्लिक करून पूर्ण माहिती मिळवू शकता -https://marathi.pratilipi.com/terms-of-service

गोपनीयता 

तुम्ही ह्यावर क्लिक करून पूर्ण माहिती मिळवू शकता -https://marathi.pratilipi.com/privacy-policy


प्रतिलिपि वापरण्यासाठी सामान्य नियम

 प्रतिलिपीवरती साहित्य प्रकाशित करताना खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या. तुमची प्रोफाइल इमेज, कव्हर इमेज, कथा, कविता, मेसेज, समीक्षा, यूजरनाव ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत ना! त्याची खात्री करून घ्यावी.  

i. वैयक्तिक टीका, तिरस्कारयुक्त समीक्षा, लेखकाचा किंवा वाचकचा अपमान निषिद्ध आहे, असे कृत्य केल्यास त्वरित कारवाई होईल. 

ii. तिरस्कारयुक्त लिखाण, समीक्षा, कमेंट जसे की, लिंगाविषयी, जातीविषयी, धर्माविषयी, व्यंगाविषयी, वयाविषयी, लैंगिक छळवणूक ह्या सर्व बाबी सहन केल्या जाणार नाहीत प्रतिलिपिवरती ह्या सर्व गोष्टी निषिद्ध आहेत. त्वरित कारवाई केली जाईल.  

iii. यूजर ने दुसऱ्या व्यक्तीच्याबाबतीत त्याची परवानगी न घेता काहीही पोस्ट करू नये. 

iv. साहित्य हे स्वतःच लिहलेले असावे दुसऱ्या लेखकाचे साहित्य स्वतःच्या नावावर प्रकाशित करू नये त्यावर कायदेशीर कारवाई होईल. 

v. अश्लील व त्याला चालना देणारे साहित्य बिलकुल प्रकाशित करू नये. ह्यावर लगेच कायदेशीर कारवाई करू. 

vi. जे काही बेकायदेशीर असेल ते प्रतिलिपिवरती प्रकाशित करायला मनाई आहे. 

vii. जाहिरात, प्रोमोशनल लिखाण, डुप्लिकेट पोस्ट, बॅकलिंक्स असे काही निषिद्ध आहे. 

Viii ऑटोमॅटिकरित्या पोस्ट करणे किंवा ऑटोमॅटिक प्रोग्रॅम प्रतिलिपिवर निषिद्ध आहे. 

ix. पैसे देऊन वाचक वाढवणे आणि लिखाण वाचण्यासाठी वाचकांकडून पैसे मागणे निषिद्ध आहे. 

x. फेक अकाउंट्स तयार करून इतरांना त्रास देणे अशा गोष्टी निषिद्ध आहेत. 


दिलेल्या कोणत्याही आचारसहिंतेचा भंग केल्यास खाली दिलेल्या बाबींवर परिणाम होईल :


i. तुमच्या साहित्याचा पोहोच कमी होऊन तुमचे वाचक कमी होतील. 

ii. तुमचे अकाउंट कायमचे ब्लॉक करण्यात येऊन कायमचे सस्पेंड सुद्धा होऊ शकते. 

iii. इतर वाचक व लेखक अशा प्रोफाईलवर कायदेशीर तक्रार करू शकतात. आणि ते तुमच्याविरुद्ध कारवाई सुद्धा करतील. 

प्रतिलिपिकडे वरच्या आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकार सुरक्षित आणि अंतिम आहे. 

कॉपीराईट नीती

I. स्वतःचे व स्वतः लिहलेल्या लिखाणावर व ते लिखाण प्रतिलिपिवर प्रकाशित केल्यावर संबंधित व्यक्तीचा कॉपीराईट हक्क असणार आहे. जर कोणी संबंधित व्यक्तीचे लिखाण कॉपी करून स्वतःचे नावे आणि मूळ लेखकाची परवानगी न घेता प्रकाशित केल्यास ते कॉपीराइटचे उल्लंघन असेल. 

ii. लेखकांनी स्वतःचेच साहित्य प्रतिलिपि वर प्रकाशित करावे. लेखकाला स्वतः लिहलेल्या साहित्याचे कॉपीराइटचे हक्क मिळतील. यूजर ने दुसऱ्याचे साहित्य स्वतः च्या नावाने प्रकाशित केले तर ते कॉपीराइटचे उल्लंघन असेल, त्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रतिलिपि कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे अकाउंट ब्लॉक करू शकते, व हा अधिकार प्रतिलिपिकडे आहे. 

iii. प्रतिलिपिवर ज्यांनी स्वतःचे साहित्य प्रकाशित केले आहे त्यांचा कॉपीराइटचा हक्क त्यांचाच असेल. प्रतिलिपि कुणाचेही साहित्याचे हक्क स्वतः घेत नाही. 

iv. लेखकांशिवाय इतर यूजरने प्रतिलिपिवरचे कोणतेही साहित्य दुसरीकडे प्रकाशित केले तर त्या लेखकाच्या कॉपीराइटचा तो भंग असेल. 

युजरला रिपोर्ट करण्याविषयी

जर तुम्हाला प्रतिलिपिवर कुणीही अश्लील भाषा, तिरस्कारयुक्त टीका, जातीवादी कमेंट, वैयक्तिक द्वेषात्मक टीका, साहित्य कॉपी करून स्वतःच्या प्रोफाईलवर पोस्ट करत असल्यास, अश्लील साहित्य असल्यास त्वरित आम्हाला रिपोर्ट करा. रिपोर्ट करण्यासाठी पोस्ट, कमेंट, समीक्षा च्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला ३ डॉट दिसतील त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला रिपोर्ट नाव मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला संबंधित रिपोर्ट करू शकता, आम्ही २४ तासांच्या आता संबंधित प्रोफाइलला ब्लॉक करू.  

वेबसाईटवर रिपोर्ट करण्यासाठी, कृपया संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईलवर जाऊन उजव्या बाजूला रिपोर्ट पर्याय आहे त्यावर क्लिक करून तुम्ही रिपोर्ट करू शकता. 

पोस्ट रिपोर्ट करण्याविषयी  

जर तुम्हाला प्रतिलिपीवरच्या लिखाणात अश्लीलता, जातीवादी, तिरस्कारयुक्त आणि कॉपी केलेले असेल तर लगेच आम्हाला तुम्ही रिपोर्ट करू शकता. त्या साहित्याला रिपोर्ट करण्यासाठी अँपमध्ये ती कथा, कविता उघडल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला ३ डॉट दिसतील त्यावर क्लिक करून तुम्ही रिपोर्ट करू शकता. त्या ३ डॉट वर क्लिक केल्यावर तुम्हाला रिपोर्ट नाव मिळेल. रिपोर्ट केल्यावर आम्ही चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर ७२ तासांच्या आत कारवाई करू. 

समीक्षेवर रिपोर्ट करण्यासाठी समीक्षाच्या उजव्या बाजूला ३ डॉट असतील त्यावर क्लिक करून रिपोर्ट करू शकता. 

यूजरच्या माहितीची गोपनीयता

तुमची माहिती प्रतिलिपिकडे सुरक्षित आहे. तुमची वैयक्तिक माहिती प्रतिलिपि खूप दुर्मिळवेळा वापरेल ते पण तुमच्या संमती असेल तेव्हाच. अधिक माहितीसाठी आमच्या गोपनीयता नीती च्या विभागाला भेट द्या.  

माझा प्रश्न येथे नमूद केलेला नाही 

कृपया आम्हाला [email protected] ह्यावर मेल करू शकता. 9999745841 (11am - 8pm Mon-Fri) ह्या आमच्या ऑफिशिअल नंबर वरती कॉल करू शकता. आम्ही २४ ते ४८ तासांमध्ये तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.