pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
श्री सतीश सोळांकूरकर : मुलाखत
18 जुलै 2016

 

१)   नाव       

     श्री सतीश विनायक सोळांकूरकर

२)   जन्म तारीख                

      1 जून, 1962

३)   नागरिकत्व                 

      भारतीय

४)   शिक्षण              

      बीए मुंबई विद्यापीठ – मानसशास्त्र 

५)   स्‍वभाव

      समजून घेणारा, करारी, स्वाभिमानी

६)   छंद                  

      लेखन – वाचन, संगीत

८)   आवडती व्यक्ति           

      आई

९)   आवडते व्यसन             

      माणसे जोडणे, संगीत ऐकणे, वाचणे

१०)  आवडता पेहराव             

      आखूड बाह्याचा शर्ट आणि फूल पँट

११)  आवडते भोजन          

      वरण भारत, तूप आणि कोणतीही पालेभाजी, लिंबाचं लोणचं.

१२)  राजकीय मत          

      काहीही नाही सध्यापतरी.

१३)  प्रचंड कामांमुळे आपण कधी तनावाखाली येता का ?  

      हो. 

१४)  प्रेम काय आहे ?          

      प्रेम ही माणसाला  चांगला माणूस बनविते.

१५)  तुम्ही सर्वात जास्त आनंदी कधी होता. 

      जेव्हा एखादी मनासारखी ओळ लिहून होते किंवा वाचून होते तेव्हाल, खूप जुना मित्र किंवा मैत्रिण अचानक भेटते तेव्हान.

१६)  तुमच्या बालपणातील अविस्मरणीय क्षण कोणता ? 

       मला “ श्री ” हे अक्षर काढता आले तो क्षण कारण मला “ श्री ” हे अक्षर सोडून सगळी अक्षरं अतिशय नीट काढता येत असत.

१७)  तुमच्या स्वतःच्या संग्रहालयात किती पुस्तके आहेत?  

       तीन हजाराहून अधिक

१८)  जर तुमची एक चोरी क्षम्य केली तर तुम्हाला काय चोरायला आवडेल?

      बालपण

१९)  देवाला मानता का ? केव्हा?

      हो. अहोरात्र 

२०)  आपणास कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते?

       कोणीतरी दुखावले जाईल याची...

२१)  आयुष्यात तुमच्या अपेक्षा काय आहेत? 

       एक सरळ, साधं आणि सोप्पंढ आयुष्य

२२)  आपण एखाद्या भावुक प्रसंगाला सामोरे गेल्यावर कधी रडला होता ?

        हो.

२३)  तुमची आवडती पाच पुस्तके.

      मितवा, वनवास, जिप्सीण, विशाखा, ययाति

२४)  साहित्य क्षेत्रातील आपले स्वप्न काय आहे? 

       ज्या,चा शोध सुरु आहे ते शब्दाषत पकडता यावे

२५)  तुमच्या वाचकांना संदेश ...

      चांगले वाचन आणि मनन करावे. माणसे जोडत जावे.

२६)  प्रतिलिपी.कॉम बद्दल २ शब्द ... ?  

   प्रतिलिपी.कॉम ही एक अतिशय चांगली संकल्पिना आहे जी अल्पा वधितच लोकप्रिय झाली आहे. चांगले आणि सकस साहित्यप जगभर पाठवावे हा उद्देश्यच घेऊन तयार झालेली. प्रतिलिपी आपल्यास या कामामध्ये यशस्वी झाली आहे असे मला वाटते. अनेक नव-नवे प्रयोग करुन कसदार लेखन करणा-यांची एक चांगली टिम तयार करण्या मध्ये प्रतिलिपी यशस्वी झाली आहे. ब-याच अंशी याचे श्रेय मराठी भाषेसाठी प्रमुख म्हणून काम करणा-या सौ. वृषाली शिंदे यांना जाते असे मला वाटते कारण यासाठी त्या् खूप मेहनत घेतात आणि वेळही देतात.