pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
सुनिल प्रमोद देवकुळे
06 मे 2017

Displaying IMG_20170410_095637_01.jpg

 

नाव : सुनिल प्रमोद देवकुळे


जन्म तारीख : ३0 ऑक्टोबर

नाव : सुनिल प्रमोद देवकुळे

नागरिकतत्व : भारतीय

शिक्षण : बी. कॉम

स्वाभाव / आपणास काय वाटते आपण कसे आहात :

मला माणसे जोडायला आवडतात.मी पैशापेक्षा माणसाला जास्त किंमत आहे असे मानतो.

छंद, ज्याला आपण थांबवू शकत नाही :

लेखन,वाचन, गायन, फोटोग्राफी, पर्यटन व कलाकारांना प्रोत्साहन देणे.

आवडती व्यक्ति :

कै. वसंत गाला व वर्ग शिक्षिका - रजनी तायवाडे (विद्याभवन - घाटकोपर मुंबई)

आवडते व्यसन :

हाती घेलेलेले कोणतेही काम असो ते मनापासून पूर्ण करणे.

ह्या क्षेत्रात आपला आदर्श कोण आहे?

पदमश्री मधु मंगेश कर्णिक

आवडता पेहराव :

सर्व प्रकारचे पेहराव वापरून झालेत. सर्व प्रकार आवडतात. विशेष म्हणजे सर्व प्रकार मला शोभून दिसतात.शेरवानी वापरायची इच्छा बाकी आहे.

आवडते भोजन /जेवण :

वरण भात तूप बटाट्याची भाजी व आमरस

( पण ब्लड शुगर मुळे ते बंद आहे)

राजकीय मत:

नेत्यांनी सेवकांप्रमाणे जनतेशी व्यवहार केला पाहिजे. ही लोकशाही आहे राजेशाही नाही.

प्रचंड कामांमुळे आपण कधी तानावाखाली येता का ?:

नाही.

मी कामात बदल करतो त्याने थकवाही येत नाही. रोज तेच तेच काम करणे मी टाळतो. कामात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतो.

प्रेम काय आहे ?

प्रेम एक अद्भुत भावना आहे ती आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते व प्रेमामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली दिसू लागते.

तुम्ही सर्वात जास्त आनंदी कधी होता ?

दुसऱ्याला आनंदी पाहून.

तुमच्या बालपणातील अविस्मरणीय क्षण कोणता?

आत्महत्येच्या विचारापासून परत मागे फिरलो व दुस-यांसाठी जगण्याचा निर्णय घेतला तो क्षण.

तूमच्या स्वतःच्या संग्रहालयात किती पुस्तके आहेत?

मी लहानपना पासून पुस्तके विकत घेऊन वाचतो. मी पुस्तके मोजत नाही वाचतो व ज्ञान कुजवण्यापेक्षा वाटण्यावर माझा भर असतो.

तुमची एक चोरी क्षम्य केली तर तुम्हाला काय चोरायला आवडेल?

मला कोणत्याही प्रकारची चोरी आवडत नाही. मेहनतीने आपण प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो. मग चोरी करण्यापेक्षा मेहनत करणेच चांगले नाही का?

देवाला मानता का? केव्हा?

होय. रोज सकाळी उठल्यावर नवीन दिवस दाखवल्याबद्दल त्याचे आभार मानतो. रोजचा नवीन दिवस त्याच्या हाती सोपवतो व सांगतो की आज जे काही तुला योग्य वाटेल ते माझ्या हातून घडू दे.

आपणास कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते ?

मला कसलीही भीती वाटत नाही. चांगले काम केल्याचे समाधान वाटते.( मी मरणाच्या दारातून खूप वेळा परत आलो आहे. व बोनस जीवन जगत आहे. त्यामुळे मरणाचीही भीती वाटेनाशी झाली आहे.)

व मला वाटते मरणाची भीती माणसाला सर्वात जास्त असते नाही का?

आयुष्यात तुमच्या अपेक्षा काय आहेत?

एक चांगला माणूस म्हणून लोकांनी लक्षात ठेवावे.

आपण एखाद्या भावुक प्रसंगाला सामोरे गेल्यावर कधी रडला होता ?

खूप वेळा. मुलगी नसल्याचे दुःख आहे. मुलींबद्दलच्या कोणत्याही प्रसंगाच्यावेळी मी भावुक होतो. रडण्याला मी दुर्बलता न मानता संवेदनशीलता मानतो. माणसाला हसता व रडता आले पाहीजे व हसवता व रडवताही आले पाहिजे.

तुमची आवडती पाच पुस्तके ::

मृत्युंजय, राजा शहाजी, एक होता कार्व्हर, ययाती, श्यामची आई.

साहित्य क्षेत्रातील आपले स्वप्न काय आहे?

जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचणे व वाचकांच्या स्मरणात राहील असे साहित्य निर्माण करून समाजात वैचारिक क्रांती होण्यास आपलाही हातभार लागावा.

तुमच्या वाचकांना संदेश:

स्वतःवर कोणतेही बंधन न घालता जे वाचता येईल ते वाचा. साहित्यात काहीच कनिष्ठ व श्रेष्ठ नसते. जशा जेवणात सर्व चवी महत्वाच्या तशाच जीवनात सर्व विषयांवरील वाचन महत्वाचे असते. त्यामुळे जीवन प्रगल्भ होते व आपणास योग्य दिशेने विचार करण्यास प्रवृत्त करते. आपले विचारच आपणास तारु अथवा मारू शकतात.

प्रतिलिपी.कॉम बद्दल २ शब्द ... ?

प्रतिलिपी.कॉम ही वाचक व लेखकांना मिळालेली आलिबाबाची गुहाच आहे. याच्या खजिन्यात दिवसेंदिवस भर पडतच असते. तेव्हा जितका साहित्यरुपी खजिना लुटता येईल तितका लुटावा. आपल्या मित्रांना व जीवलगांना वाटावा व आपले जीवन आनंदी बनवावे. प्रतिलिपीची ही भेट मोबाईलच्या युगात वाचनसंस्कृती जगवायला व वाढवायला नक्कीच मदतनीस म्हणून पुढे आली आहे व प्रतिलिपीची ही वाटचाल अशीच चालू राहावी ही सदिच्छा!

सोबत मी माझी एक कविता पाठवीत आहे.

पुस्तक हेच गुरु!

पुस्तक हेच माझे गुरु
त्यानेच झाले जीवन हे सुरु
लहानपणी चाले तूरुतूरु
व बोले मात्र चुरुचुरु

पुस्तक घेई चित्र पाही
उलटे सुलटे करत राही
समाधान न होई काही
त्याच्याशीच खेळत राही

शाळेत गेलो बाराखडी
अक्षर झाले सवंगडी
वाचन मग मला आवडी
विचारांनी घेतली उडी

वाचन वाढले विचार रुजले
बघता बघता वृक्ष झाले
त्याच वाचनाच्या मूळे
संस्कारी विनयशील मन लाभले

सुनिल देवकुळे

मला ही संधी दिल्याबद्दल प्रतिलिपी.कॉम चे मनःपूर्वक आभार!