pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
विश्वनाथ शिरढोणकर - मुलाखत
19 जुलै 2016

-: मुलाखत :-


विश्वनाथ शिरढोणकर


 

१)   नाव 
      विश्वनाथ शिरढोणकर

२)   जन्म तारीख 
      ०१-१२-१९४७

३)   नागरिकतत्व 
      भारतीय

४)   शिक्षण 
      बी.कॉम .

५)   स्वभाव
      बहुदा शांत पण कधी कधी राग येतो पण लगेच मावळतो आणि हे अगदी स्वाभाविकच आहे .

६)   आपणास काय वाटते आपण कसे आहात ? 
      स्वत:चे मूल्यमापन / मोजमाप स्वत: नाही करता येत . ते इतरांनी करायचं असतं .

७)   छंद, ज्याला आपण थांबवू शकत नाही 
      वाचन / लेखन /संगीत / संसार चक्र .

८)   आवडती व्यक्ति 
      माझे वडील  . 

९)   आवडते व्यसन 
      कठीण आणि रहस्यमय प्रश्न .

१०)  ह्या क्षेत्रात आपला आदर्श कोण आहे ?
      साहित्य , संगीत , आणि कला क्षेत्रात त्यांच्या चांगल्या गुणांसाठी अनेक आहेत .

११)  आवडता पेहराव 
      अगदी साधा . विशिष्ट आवड नाही .

१२)  आवडते भोजन /जेवण
      साधे पोष्टिक वरण ,भात ,भाजी, पोळी . मिष्ठान आवडतात .

१३)  राजकीय मत
      राष्ट्राच्या भवितव्यासाठी आणि राष्ट्रकल्याणासाठी जे पक्ष कार्यरत असतील त्यांची विचारधारा मान्य . तसे ही पुंजीवाद , साम्यवाद , समाजवाद . हुकुमशाहीसकट सर्व वाद आज कालबाह्य       ठरलेले आहे .   

१४)  आपण तनावाखाली येता का ?
       माणूस म्हटलं की ताणतणाव आलाच . पण मी स्वत: फारकाळ तणावात राहत नसतो . संकटांना अगदी स्वाभाविक पणे घेता आलं पाहिजे . तितकी सावधता बाळगतो . अर्थात सर्व            संपायच्या अगोदर नेहमीच जागा झालेलो आहे मी .  

१५)  प्रेम काय आहे ?
       प्रेम हे ठराविक काळासाठी आणि ठराविक उद्देश्यासाठी असते . निस्वार्थ प्रेम कुठे ही नसतं . पण ते तुम्हाला जर का निस्वार्थ दाखविता आले , आणि त्याची निस्वार्थ तळमळ प्रदर्शित          करता आली तर तेच प्रेम जगात खरे प्रेम म्हणविले जाते .

१६)  तुम्ही सर्वात जास्त आनंदी कधी होता ?
       ' किसी रोते को हसाया जाय ' अर्थात रडणं संपल्यावरचे क्षण आनंदाचेच असतात. आणि असे क्षण अनेकदा येतात . मला जसं जास्त दु:ख होत नाही तसं जास्त आनंद देखील कधी             होत नाही . पण आपण म्हणू शकतो आनंदाचे देवाण घेवाणचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे असतात आणि त्याचे कारणं देखील वेगवेगळे असतात . जो दिवस सर्वात जास्त             सुखाचा तोच दिवस सगळ्यात जास्त आनंदाचा आणि समाधानाचा .

१७)  तुमच्या बालपणातील अविस्मरणीय क्षण कोणता ? 
       माझं सगळं बालपण मी माझ्या कादंबरी - ' मी होतो मी नव्हतो ' यात वर्णन केलेलं आहे . ' मी होतो मी नव्हतो ' ही माझीच कथा आहे .

१८)  तुमच्या स्वतःच्या संग्रहालयात किती पुस्तके आहेत ?
       हिंदी मराठी मिळून ४०० पेक्षा जास्त . आता हे विचारू नये यात किती वाचलेली आहे .  

१९)  जर तुमची एक चोरी क्षम्य केली तर तुम्हाला काय चोरायला आवडेल ?
      प्रत्येक माणसाचं मन .

२०)  देवाला मानता का ? केव्हा ?
       माझ्या मते या जगात कोणीच नास्तिक नाही . आणि एक ढोबळ समज असा आहे की जो पूजाअर्चना , उपासतापास , देवदर्शन , नित्य नेमाने करतो तोच धार्मिक असतो . मुळात हे            सर्व सनातनी कर्मकांड आहेत . आणि हे देवाने बनिविलेले नाही आणि सांगितलेलेही नाही . हे सर्व आता कालबाह्य झालेले आहे . मानवीय मुल्यांची जोपासना मानवतेसाठी गरजेची आहे .      मी त्या सर्वशक्तिमान शक्तीलाच देव मानतो . पण तो कोणत्याही मंदिरात आजतागायत कोणालाही सापडलेला नाही . मी पण फार दुर्बल माणूस आहे अर्थात भीती वाटते तेव्हा देव              आठवतोच . पण कोणता ? तो नेहमीच बदलत राहतो .  
 
२१)  आपण आत्ता पर्यंत शेवटचे कधी भावुक झाला होतात ?
      अनेकदा . दर वेळेस जेव्हा जेव्हा प्रसंग येतात तेव्हा भावना ओथंबून वाहतात . शेवटच विचारलं तर माझा मुलगा जेव्हा एका मुलाचा पिता बनला . तेव्हा असं वाटलं की आता एक पिढी          घडविण्याची आपली जवाबदारी संपली .

२२)  आपणास कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते ?
       मी अद्याप या सत्तर वर्षाच्या आयुष्यात उल्लेखनीय असे काहीच करू शकलेलो नाही . तेव्हा जन्म व्यर्थ गमावला असं वाटतं . म्हणून अजून बरचं काही करायचं आहे  , पण आता              आयुष्य संपण्याचीच भीती सर्वात जास्त वाटते .  .

२३)  आयुष्यात तुमच्या अपेक्षा काय आहेत ?
      आता कसल्या अपेक्षा ? सर्व पोरं व्यवस्थित आहे . त्यांच्या संसाराचा गाडा खूप मार्गी आहे . बस माझ्या हातून साहित्याची सेवा शेवट पर्यंत होत राहावी हीच माझ्या श्वांसाकडून माझी             अपेक्षा आहे .

२४)  तुमची आवडती पाच पुस्तके
       मराठीत वि. स.खांडेकरांचे- ययाति आणि अश्रू . लोकमान्य टिळकांचे - गीता रहस्य . रणजीत देसाई यांची - राधेय आणि श्रीमान योगी .  मराठीप्रमाणे हिंदी भाषेत देखील मी जवळपास        सहा हजारपेक्षा जास्त पुस्तकं वाचली आहेत . यात शरदचंद्र चॅटर्जी यांचे - श्रीकांत - हे माझे आवडते पुस्तक आहे .   

२५)  साहित्य क्षेत्रातील आपले स्वप्न काय आहे ?
       मला अद्याप काही विषयांवर कादंबरी आणि नाटक लिहावयाचे  आहे . पाहू केव्हा जमते ?

२६)  तुमच्या वाचकांना संदेश: प्रतिलिपी.कॉम बद्दल २ शब्द ... ?
       प्रतिलिपी मराठी , हिंदी , इंग्रेजी आणि गुजराती सकट अनेक भाषांच्या साहित्यकारांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे . आणि पाठ्कांसाठी विविध विषयांच्या साहित्याचा एक अद्भुत          खजिनाच म्हणवा लागेल . माझे विचाराल तर माझे ४० पेक्षा जास्त कथा / लेख / कादंबरी त्यांनी प्रतिलिपी मराठीवर देऊन मला एक व्यासपीठच उपलब्ध करवून दिलेले आहे . आणि            त्यांच्या आकड्यांप्रमाणे माझ्या साहित्याला ६१००० पेक्षा जास्त पाठकांनी वाचलेले असून , ६१०० / पेक्षा जास्त वाचकांनी त्यावर प्रतिसाद देऊन आपले मत मांडले आहे . याने मी                भारावून गेलो आहे आणि  माझ्या उत्साहात भारच पडला आहे . मी प्रतिलिपी मराठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे .   


खालील लिंक पण करून पहिली की त्या मध्ये लेखकाचे सर्व प्रकाशित साहित्य / रचना आपल्याला पाहण्यास मिळतील. 

http://marathi.pratilipi.com/vishwanath-shirdhonkar