pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आमच्या लेखकांच्या यशोगाथा

13 సెప్టెంబరు 2024



शब्द आणि कर्मांद्वारे परिवर्तन!

 

सौ. गुजराथी यांना लहानपणापासूनच कल्पना/कथांच्या जगाची आवड होती. पुस्तके वाचणे, आवडत्या लेखकांना जाणून घेणे आणि त्यांच्या मुलाखती पाहणे, त्याबद्दल चर्चा करणे या प्रत्येक गोष्टीने त्यांना एक वेगळाच आनंद दिला. 

मयुरी या सुरुवातीला छंद म्हणून लिहायच्या पण हळूहळू त्यांनी आपल्या लिखाणाला त्यांची आवड म्हणून महत्व देण्यास सुरुवात केली ज्यावर त्यांचे कुटुंब थोडे नाखूष होते. कारण त्या फोन वापरण्यात पूर्वीपेक्षा जास्त वेळ घालवत होत्या. पण, जेव्हा त्यांनी प्रतिलिपिवर कमाई सुरू केली तेव्हा त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या या आवडीला मनापासून पाठिंबा देऊ लागले!

 

एक गोष्ट मयुरी नेहमी म्हणतात की, "मिळवलेल्या ज्ञानाने पैसे कमवणे, कष्टाने पैसे कमवणे हे कोणाचेही मोठे स्वप्न असेल पण... जर लोक तुमच्या प्रतिभेवर खूश असतील आणि त्यासाठी पैसे खर्च करत असतील, तर तुम्ही नक्कीच काहीतरी मोठे साध्य करत आहात! आणि बहुदा मला ते जमलं आहे!”

 

‘मधुमिता २’ साठी त्यांनी सेलेब्रेल पालसी (Cerebral palsy - CP) हा विषय जवळून हाताळला. सौ. गुजराथी यांनी कथानक अधिक संवेदनशीलपणे लिहिण्यासाठी त्यावर अधिक संशोधन करण्यास सुरुवात केली. मग त्यांनी विचार केला की, नुसते लिहून नाही तर अशा लोकांना काही मदत केली तरच त्या समाजामध्ये काही बदल आणू शकतील!

 

मग त्यांनी ठरवूनच ठाकले की, त्या महिन्यात ‘मधुमिता २’ कडून मानधनाची जी काही रक्कम मिळेल, त्यामधून त्या सेलेब्रेल पालसीशी झगडत असलेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत प्रदान करतील. मयुरी यांना त्या महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मानधनाचे पैसे मिळत नव्हते पण, “दैवी योग म्हणा किंवा योगायोगाने त्या महिन्यात मला सुमारे रु. 24000 इतकी मानधनाची रक्कम प्राप्त झाली! 

 

त्या महिन्याच्या त्यांच्या कमाईची रक्कम आणि त्यामध्ये पदरची काही रक्कम जोडून मयुरी यांनी ठरवल्याप्रमाणे सढळ हाताने आश्रमाला मदत पाठवली! 

 

 


 

 

आशा आणि आनंदाचे रंग

 

सौ. अमृता यांच्या वडील आणि आजी यांना वाचनाची आवड होती यामुळे लहानपणापासूनच त्यांनासुद्धा पुस्तके वाचण्याची विशेष आवड होती. परंतु, लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना त्यांची आवड जपायला वेळ मिळू शकला नाही. 

 

प्रतिलिपिने आयोजित केलेल्या भयकथा स्पर्धेची माहिती मिळाल्यावर लेखिकेच्या या स्पर्धेत शून्य अपेक्षा होत्या कारण अनेक सुप्रसिद्ध, प्रस्थापित लेखक सहभागी होत होते. पण पुढे जे घडले ते त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. त्यांच्या 'गंध' या कथेला उदंड प्रतिसाद मिळाला. वाचकांना ही कथा इतकी आवडली की त्यांनी लेखिकेला या भयकथेचे नवीन पर्व लिहिण्याची मागणी केली. त्यानंतर अमृता यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

सौ. अमृता सांगतात, "गृहिणी म्हणून घरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, त्यांची शाळा, अभ्यास आणि कोविडसारखे कठीण प्रसंगही प्रतिलिपिच्या मदतीने सोपे झाले. प्रतिलिपिमुळे लेखनाच्या वेडाचे हळूहळू व्यसनात रूपांतर झाले."

 

सौ.अमृता म्हणाल्या, "मित्र आणि कुटुंबीय मला विचारू लागले की, 'लिखाणातून तुला मिळतं काय?' परंतु, जेव्हा प्रतिलिपिमध्ये कमाईचे अनेक मार्ग खुले झाले तेव्हा मला स्टिकर्स आणि सुपरफॅन्सच्या माध्यमातून वाजवी रक्कम मिळू लागली आणि 'एक दिवस मी तुम्हाला माझ्या कमाईतून भेट देईन!' हे माझ्या पतीला मस्करीत केलेले एक अनौपचारिक विधान खरे ठरले!" 

 

 


 






प्रेमाची भेट

 

आपल्या आईसाठी खास भेटवस्तू मिळवण्यापेक्षा जगात कदाचित दुसरी चांगली भावना नाही. 

 

सुश्री तपती या मुळात लहानपणापासूनच पुस्तकी किडा होत्या. त्यांना कथेत हरवून जाणे आवडते आणि त्यांच्यासाठी जीवनातील कठोर वास्तवातून सुटण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग होता. 

2020 मध्ये जेव्हा देशाला कोविड-19 महामारीचा सर्वाधिक फटका बसला होता, तेव्हा तपती यांची नोकरी गेली. चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी लेखिकेने प्रतिलिपिमध्ये लेखन सुरू केले. 

           प्रतिलिपिकडून मिळणारी ही अतिरिक्त कमाई लेखिकेला त्यांच्या मासिक पगाराचा भार काही प्रमाणात कमी करण्यात मदत करते.

 

जुलै २०२२ हा महिना लेखिकेसाठी खूप खास होता. चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये त्यांच्या आईला सोन्याची बांगडी खरेदी करायची होती. त्यावेळी त्यांच्याकडे आईसाठी हे विकत घेण्यासाठी इतके पैसे नव्हते. सक्रिय लेखक झाल्यानंतर आणि वाचकांचे प्रचंड प्रेम मिळाल्यानंतर लेखिकेने कमावलेल्या पगारासह या पैशाच्या मदतीने त्यांना त्यांच्या आईसाठी सोन्याची बांगडी खरेदी करायला मदत केली!

 

तपती प्रतिलिपि आणि त्यांच्या वाचक-अनुयायांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, “माझ्या आईला ही छोटी भेट देऊन जिने एवढ्या वर्षात माझी काळजी घेण्याशिवाय स्वतःसाठी काहीही केले नाही, मला खूप समाधान मिळाले आहे. माझ्या पालकांशिवाय आणि माझ्या वाचक कुटुंबाशिवाय हे कधीही शक्य झाले नसते."

 

 


 

 

अभिमानाचे क्षण

 

सौ. संगीता यांना सुरुवातीपासूनच गोष्टींची पुस्तके वाचण्याची आवड आहे. प्रतिलिपिमध्ये त्यांचा प्रवास एक वाचक म्हणून सुरू झाला. पण होमपेजवर 'लिहा' बटन पाहिल्यावर लागलीच त्यांनी मोठ्या आवडीने लिहायला सुरुवात केली. 

संगीता यांचे वडील शेतकरी आहेत. प्रत्येक वडिलांप्रमाणे त्यांनाही त्यांच्या लाडक्या मुलीसाठी सुरक्षित आणि योग्य भविष्य हवे होते. वडिलांच्या इच्छेनुसार लग्न झालेले असले तरीही केवळ कुटुंबाप्रती कर्तव्ये पार पाडली तर आपली स्वतःची ओळख नष्ट होण्याची भीती लेखिकेला होती. 

संगीता यांची, ‘ऐन स्वास्थय मीत्ता एन्नावल नी’ नावाची कथा गजा चक्रीवादळावर आधारित होती. कथेतील मध्यवर्ती पात्र साकारण्यासाठी प्रेरणा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतली.

 

लेखिका परदेशात त्यांच्या पती आणि मुलासोबत स्थित होत्या. यादरम्यान, लेखनाद्वारे केलेली कमाई दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली. 

प्रतिलिपिच्या कमाईच्या मदतीने लेखिकेने त्यांच्या वडिलांना एक सुंदर आणि सुबक अंगठी भेट म्हणून दिली. लेखिका सांगतात, “मी माझ्या पतीकडून पैसे घेऊन भेटवस्तू विकत घेतली असती तर नक्कीच माझी इच्छा पूर्ण झाली असती पण यातून मला फारसे समाधान मिळाले नसते. मी दिलेल्या भेटवस्तूने माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर अपूर्व आनंदी भाव उमटला आहे. यामुळे त्यांना माझा कमालीचा अभिमान वाटला!”

 

आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी घेणे ही वडिलांची जबाबदारी असते. परंतु, मनात खोलवर हीच इच्छा असते की,आपल्या मुलीने तिच्या करिअरमध्ये यशस्वी व्हावे आणि स्वतःची अशी ओळख निर्माण करावी जेणेकरून तिने तिच्या छोट्याशा इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये. सौ. संगीता यांच्या कथेने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

 

 


 

 



स्वप्नांचा प्रवास

 

सिंग यांनी प्रतिलिपि प्रीमियम विभागातून कमावलेल्या कमाईतून एक नवीकोरी स्कूटी खरेदी केली! त्यांनी त्यांच्या कुटुंबातील या नवीन सदस्याचे स्वागत करत तिला ‘रामप्यारी’ हे नाव दिले आहे. श्रीमती सिंग म्हणतात, “मला मागच्या २-३ वर्षांपासून स्कूटी घ्यायची होती पण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या खर्चामुळे मला माझ्या स्कुटीसाठी बचत करणे अशक्य झाले होते. आणि अखेरीस काल मी सर्व अडथळे दूर केले आणि माझ्या 'रामप्यारीचे' माझ्या कुटुंबात स्वागत केले. जेव्हा मी माझ्या घरी रामप्यारीला पहिले तेव्हा मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.” 

 

श्रीमती सिंग पुढे म्हणाल्या,  “हे माझे पहिले कानातले नाहीत किंवा मी पहिल्यांदाच माझ्यासाठी काही खरेदी करत आहे असेही नाही. माझ्याकडे चांगली नोकरी आहे पण प्रतिलिपिद्वारे कमाईमधून मी जो आनंद अनुभवला तो अवर्णनीय आणि अद्भुत आहे. लहानपणीचा वाचन आणि लिहिण्याचा माझा छंद मला या उंचीवर घेऊन जाईल असे मला कधीच वाटले नव्हते. जिथे मी माझ्या शब्दांच्या आधारे एक वाहन खरेदी करू शकेन.” 

 

 


 

 

तुम्ही सुरुवात तर करा, रस्ते आपोआप उघडतील

 

गृहिणी असण्यासोबतच, श्रीमती श्री अनु यांनीही आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इतर गृहिणींप्रमाणेच लेखनाची त्यांची आवड नेहमी पूर्ण केली आहे. त्यांना येथे मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या या  छंदाचा एक सखोल उद्देश त्यांच्या मनात निर्माण झाला.

 

श्री अनु सांगतात, “जेव्हा मी पहिल्यांदा लिहायला बसले तेव्हा, माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी माझी भरपूर चेष्टा केली की मी माझ्या लिखाणातून काय साध्य करणार आहे? पण आज मी त्या सर्वांना अभिमानाने सांगू शकते की, आज माझ्या वाचकांच्या पाठिंब्यासोबतच मी शब्दांच्या बळावर महिन्याला चांगली कमाई करत आहे.”

 

मे 2021 मध्ये जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वजण प्रभावित झाले होते, तेव्हा श्री अनु यांच्या बाळाचा जन्म वेळेपूर्वी झाल्याने त्याला उपचारासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. अशा खडतर अवस्थेत त्यांना तातडीचा ​​उपचार खर्च भागवणे कठीण झाले होते. त्यावेळी, त्यांना मे 2021 मध्ये प्रतिलिपिकडून त्यांची पहिली कमाई मिळाली जिचे वर्णन त्या "अनपेक्षित ठिकाणाहून आलेले पैसे अशा वेळी एक मोठा आशीर्वाद ठरला!" असे करतात.

 

“प्रतिलिपिमध्ये, मला केवळ भरपूर वाचक आणि अनुयायीच मिळाले नाहीत तर, येथे सुंदर मैत्रीही करायला मिळाली असल्याचे श्री अनु सांगतात. 

 

 


 

 

आनंदाचे आकाश



श्री. हकीम यांच्यासाठी 'सायकल घेणे' हे त्याचे बालपणीचे सर्वात मोठे स्वप्न होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना ते स्वप्न कोणाला सांगताही येत नव्हते. ते सांगतात, “माझ्यासारखा माणूस, जो शालेय जीवनात कधीच सहलीला गेला नाही, कधी हॉटेलमध्ये गेला नाही, ऐनवेळी परीक्षेची फी भरू शकला नाही, ज्याने प्रत्येक विषय एका वहीच्या दोन्ही बाजूंनी लिहिला, त्याच्यासाठी सायकल विकत घेणे हे एकमेव स्वप्न होते." श्री. हकीम सायकल न चालवताच मोठे झाले, पण त्यांना त्यांच्या मुलीसाठीही सायकल विकत घेणे परवडत नाही हे जाणवल्यावर पालक म्हणून त्यांना वाईट वाटले.

 

अलीकडेच, त्यांनी प्रतिलिपि मधील त्यांच्या लेखनाद्वारे काही रक्कम मिळवण्यास सुरुवात केली. नुकतेच, त्यांच्या कथांवर वाचकांनी दाखवलेल्या प्रेम आणि पाठबळाच्या जोरावर त्यांनी जवळपास रु. ३००० कमावले. यामध्ये हकीम यांनी उरलेले पैसे जोडले आणि अभिमानाने आपल्या मुलीसाठी सायकल विकत घेत आपले स्वप्न पूर्ण केले आहे!

 

“ज्यांनी हे अनुभवले आहे, त्यांना माझा आनंद समजेल. लेखनातून मिळालेल्या उत्पन्नातून मी माझ्या मुलीचे आणि  माझे स्वप्न पूर्ण करू शकलो! माझे साहित्य वाचलेल्या माझ्या सर्व प्रियजनांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी  मला पुन्हा लिहिण्याची प्रेरणा दिली आणि आयुष्याच्या या निसरड्या टप्प्यावर मला आशेचा किरण दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नम्र माणसाला लेखक म्हणून मान्यता दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे!" हकीम म्हणाले.