प्रिय लेखक,
आज आम्हाला 'सुपर लेखक अवॉर्ड्स - 6' च्या निकाल श्रेणीतील यशस्वी पदार्पण अवॉर्ड्स जाहीर करताना आनंद होत आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला, आम्ही जाहीर केले होते की जे लेखक प्रोफाइलवर प्रथमच किमान 60 भागांची कथामालिका प्रकाशित करतील त्यांना “यशस्वी पदार्पण हा दर्जा” मिळेल. लेखनाची आवड असल्याशिवाय हे आव्हान पूर्ण करणे जवळपास अशक्य आहे.
तुमच्या लेखनाच्या आवडीमुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्हाला आशा आहे की इतर लेखकांनाही तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. तुमची ही विशेष कामगिरी आमच्या संपूर्ण प्रतिलिपि कुटुंबासोबत शेअर करताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो.
आपल्या प्रतिलिपि प्रोफाइलमध्ये प्रथमच ६० भागांची कथामालिका प्रकाशित करणार्या सर्व लेखकांसाठी हा विशेष सन्मान आहे.
या प्रतिभावान उदयोन्मुख लेखकांना प्रतिलिपिच्या एका विशेष संपादकीय सदरामध्ये फिचर केले जाईल जेथे त्यांच्या मुलाखती प्रकाशित केल्या जातील आणि संपूर्ण प्रतिलिपि कुटुंबासह सामायिक केल्या जातील. ही केवळ मुलाखत नाही; हे तुमच्याबद्दल, तुमचे सर्जनशील विश्व आणि तुमच्या कथाकथनाच्या प्रवासाबद्दल आहे. हे तुमचा फोटो, कथेचा सारांश आणि तुमची प्रतिलिपि प्रोफाइल यांना प्रतिलिपि कुटुंबामध्ये अविश्वसनीय दृश्यमानता प्राप्त करेल.
वरील सर्व विजेत्यांना लवकरच मुलाखतीसाठी इतर तपशीलांसह ईमेल प्राप्त होईल
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!