‘प्रतिलिपि उदयोन्मुख लेखक अवॉर्ड्स’ स्पर्धेचा बहुप्रतिक्षित निकाल आता आला आहे!
आम्ही ही लेखन स्पर्धा फक्त नवीन प्रतिलिपि लेखकांसाठी आयोजित केली होती. हे अशा प्रकारे आखले गेले आहे की, या नवीन लेखकांनी एक लहान कथामालिका प्रकाशित केली आणि प्रतिलिपिमध्ये त्यांचा गोल्डन बॅज मिळविण्याच्या एक पाऊल जवळ पोहोचले. प्रतिलिपिमध्ये गोल्डन बॅजला इतके महत्त्व का आहे, याचा विचार केला पाहिजे! सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रतिलिपि ॲपमधील कोणत्याही लेखकासाठी गोल्डन बॅज ही पहिली पायरी आहे ज्यांना त्यांच्या लेखनातून दर महिन्याला मोठी कमाई करायची आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन गोल्डन बॅज मिळवणाऱ्या १७६ नवीन लेखकांचे विशेष अभिनंदन करताना आम्हाला खरोखरच आनंद होत आहे.
वाचकांसाठी साहित्य लॉक ठेवण्याचा विशेष लाभ आता या लेखकांना प्राप्त होईल. यापुढे, जेव्हा जेव्हा ते नवीन कथामालिका प्रकाशित करतील तेव्हा 16व्या भागानंतर संपूर्ण कथामालिका वाचकांसाठी लॉक केली जाईल आणि कथामालिका प्रतिलिपि प्रीमियम मालिका होईल. वाचकांना सब्सक्रिप्शन खरेदी करून, कॉईन्स देऊन किंवा प्रत्येक भाग अनलॉक करण्यासाठी दुसर्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करून कथेचे भाग अनलॉक करता येतील. त्यांना हजारो प्रतिलिपि लेखकांच्या समुदायात सामील होण्याची संधी मिळेल जे प्रतिलिपि ॲपमध्ये नियमितपणे अनेक भागांची दीर्घ कथामालिका प्रकाशित करून आणि मालिका लॉक करून प्रतिमहिना पाच-दहा हजार रुपयांहून अधिक कमाई करत आहेत.
शिवाय, हे गोल्डन बॅज लेखक ‘प्रतिलिपि सुपर लेखक अवॉर्ड्स - 7’ मध्ये सहभागी होण्यासाठी आणि आकर्षक रोख बक्षिसे, विशेष प्रमाणपत्रे आणि इतर अनेक पुरस्कार आणि फायदे जिंकण्यासाठी देखील पात्र होतील.
‘प्रतिलिपि उदयोन्मुख लेखक अवॉर्ड्स’ स्पर्धेमध्ये कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व सहभागींचे आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्हाला माहित आहे की, तुमच्या सर्वांमध्ये सुवर्ण शब्द लिहिण्याची प्रतिभा आणि क्षमता आहे जी भविष्यात लाखो वाचकांच्या मनाला स्पर्श करेल. तुम्ही प्रतिलिपि ॲपवर नियमितपणे दीर्घ कथामालिका लिहित राहिल्यास आम्ही तुम्हाला यशस्वी लेखन करिअर तयार करण्यात मदत करण्याचे वचन देतो.
‘प्रतिलिपि उदयोन्मुख लेखक अवॉर्ड्स’ मधील सर्व विजेत्या लेखकांचे अभिनंदन करूया -
रँक |
नाव |
कथामालिका |
बक्षिसे |
1 |
डॉ. किमया मुळावकर |
marathi.pratilipi.com/series/fssf1klamfna |
कुरिअरद्वारे लेखन किटचा एक विशेष संच || डिजिटल विजेता प्रमाणपत्र |
2 |
Sonali Karmarkar |
marathi.pratilipi.com/series/u6bpigdeiajd |
कुरिअरद्वारे लेखन किटचा एक विशेष संच || डिजिटल विजेता प्रमाणपत्र |
3 |
Archana Sonagre |
marathi.pratilipi.com/series/lndudkj5ep40 |
कुरिअरद्वारे लेखन किटचा एक विशेष संच || डिजिटल विजेता प्रमाणपत्र |
4 |
मितवा |
marathi.pratilipi.com/series/jmehcjkb1zjq |
कुरिअरद्वारे लेखन किटचा एक विशेष संच || डिजिटल विजेता प्रमाणपत्र |
5 |
प्राची करंदीकर |
marathi.pratilipi.com/series/ydctgjblzybu |
कुरिअरद्वारे लेखन किटचा एक विशेष संच || डिजिटल विजेता प्रमाणपत्र |
6 |
वनिता शिंदे |
marathi.pratilipi.com/series/p1ukektfvnmz |
कुरिअरद्वारे लेखन किटचा एक विशेष संच || डिजिटल विजेता प्रमाणपत्र |
वरील विजेत्या सर्व लेखकांनी त्यांचे डिटेल्स आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.
या [email protected] ई-मेलवर माहिती पाठवावी. कृपया दुसऱ्या कोणत्या ही ई-मेलवर ही माहिती पाठवू नये.
ई-मेल मध्ये विजेत्या कथामालिकेचं नाव आणि तुमच्या प्रतिलिपि प्रोफाईलवरचं नाव नमूद करावे आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.
Full Name in Marathi & English (for certificate)-
Address-
Phone number-
खाली दिलेल्या कथांचा विशेष उल्लेख न केल्यास अन्याय होईल. आम्ही या लेखकांना पुढच्या वेळी वरील यादीत पाहण्याची आशा करतो. काही उत्तम कथामालिका इथे नमूद करत आहोत-
आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event/
अनेक शुभेच्छा,
प्रतिलिपि इव्हेंट्स टीम