प्रिय लेखक, नमस्कार!
✨ महत्त्वाची सूचना: प्रतिलिपिमध्ये साहित्य प्रकाशन करताना खालील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे 📚
तुमच्या कथेतील पात्रे लिहिताना कोणत्या बाबी टाळाव्यात याबद्दल ही सामान्य मार्गदर्शक माहिती आहे. बहुधा खालील प्रकरणांमध्ये प्रतिलिपि टीम लेखकाचे साहित्य हटवते आणि प्रोफाइल ब्लॉक करते.
🚫 हिंसा, बलात्कार किंवा पात्रांमधील संमती नसलेल्या लैंगिक संबंधांचे वर्णन लिहिणे प्रकर्षाने टाळा.
📸 वाचकांना आकर्षित करण्यासाठी संवेदनशील कव्हर इमेज अपलोड करणे टाळा. कृपया लक्षात ठेवा, प्रतिलिपि टीम संवेदनशील कव्हर इमेजेस आणि संपूर्ण साहित्य कोणत्याही पूर्व चेतावणीशिवाय ब्लॉक करते.
⚠️ तुमच्या पत्रांच्या संवादांमध्ये असभ्य भाषा, शरीराच्या अवयवांची नावे आणि अयोग्य, वाईट आणि निषिद्ध शब्द कधीही वापरू नका.
🔞 प्रौढ साहित्य शैलीचे कोणतेहे इशारे, सूचना, 18+ इमोजी इत्यादी शीर्षक आणि साहित्यामध्ये नमूद करू नका. त्याऐवजी, मुळात कृपया तुमच्या साहित्यामध्ये संवेदनशील मजकूर लिहिणे पूर्णपणे टाळा.
⚡तुमच्या अगोदरच प्रकाशित साहित्यामध्ये तुम्ही अतिशय संवेदनशील मजकूर लिहिला असल्यास त्वरित तो संपादित करा. अतिशय संवेदनशील दृश्ये त्वरित काढून टाका आणि तुमचे साहित्य अपडेट करून पुन्हा जतन करा. तुमच्या साहित्य संपादनाचा ॲक्सेस लॉक केलेला असल्यास तुम्ही आमच्या टीमला संपादनासाठी विनंती करू शकता.
❌ जर तुम्हाला इरोटिका/शृंगार लेखन शैली प्रकाराबाबत अचूक माहिती नसेल तर कृपया या शैलीमध्ये लिहिणे टाळा.
🛑 तुमच्या वाचकांना उत्तेजित करण्यासाठी पात्रांमधील कोणतेही रोमँटिक किंवा प्रणय दृश्य उगाच अतिरंजित करून आणि मसालेदार करून लिहिणे टाळा. साहित्याच्या नैतिक मर्यादेत राहा.
⛔ कृपया हे समजून घ्या, कारण साहित्याच्या मर्यादेत राहून लिहिलेले इरोटिका/शृंगार आणि साहित्याच्या मर्यादा ओलांडून लिहिलेले इरोटिका/शृंगार यातील फरक समजून घेणे हे वेगवेगळ्या लोकांसाठी व्यक्तिनिष्ठ आहे. तसेच कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ नये यावर दोन पक्ष कधीही सहमत होऊ शकत नाहीत. यामुळे, जेव्हा जेव्हा अतिसंवेदनशील साहित्याची तक्रार केली जाते तेव्हा आमची टीम अशा साहित्यावर अंतिम कारवाई करते.
💖 आम्ही आमच्या लेखकांना विविध प्रकारचे परिपक्व विषय एक्सप्लोर करण्यासाठी प्रोत्साहित करतो ज्यात बलात्कार, क्रूरता किंवा अत्यंत हिंसाचाराचे स्पष्ट वर्णन लिहिणे समाविष्ट केलेले नाही. ध्यानात घ्या, तुमची सर्जनशीलता वाचकांच्या आयुष्यात अकल्पित चमत्कार घडवू शकते. तेव्हा, चला अधिक जबाबदारीने आणि मर्यादेत राहून सर्जनशीलतेचा साक्षात्कार घडवू या!
सादर,
टीम प्रतिलिपि