pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निकाल - कुसुमाग्रज करंडक

21 जुन 2019

नमस्कार नाटककारमित्रहो,

मराठी भाषादिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुसुमाग्रज करंडक नाटक आणि एकांकिका लेखन स्पर्धेला गेले साडे तीन महिने आपण जो उदंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन ! नाटक आणि एकांकिका मिळून संपूर्ण जगभरातून या स्पर्धेमध्ये एकूण २९२ संहिता सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेला मिळालेल्या या भरघोस प्रतिसादामुळे निकालाचे काम आव्हानात्मक होते. यामुळेच स्पर्धेचा निकाल १० दिवस पुढे ढकलण्यात आला. झालेल्या दिरंगाईबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आज आपल्यासमोर हा निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.

कुसुमाग्रज करंडक स्पर्धेमध्ये सहभागी एकांकिकांचेच पारडे संख्येने अधिक जड राहिले. त्या तुलनेत नाटकांचे प्रमाण नगण्य म्हणावे इतके कमी होते. संकल्पना, नाटकाच्या तंत्राची मांडणी , संवाद रचना, पात्ररचना आणि एकंदर प्रायोगिक परिणाम या निकषांवर आपल्या संहितांचे परीक्षण करण्यात आले आहे. गिरीष केमकर आणि मिलिंद शिंत्रे या दोन मान्यवरांनी परीक्षणाचे आव्हानात्मक काम परिश्रमपूर्वक पार पाडले आहे. त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. त्याचबरोबर कलोपासकचे चिटणीस राजन ठाकूरदेसाई तसेच योगेश सोमण यांनी या स्पर्धेच्या संयोजनांमध्ये पावलोपावली दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही विशेष आभार ! शिवाय मानाचि तसेच सम्यक कलांश या संस्थांनी स्पर्धेच्या प्रसारणासाठी केलेले प्रयत्न स्तुत्यच आहेत. या स्पर्धेला अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे, त्या सर्वांचेही आभार ! 

नाटक हे मुख्यतः प्रयोग डोळ्यासमोर ठेवून लिहिले जाते, त्यामुळे त्याचे प्रायोगिक मूल्य हीच लेखनाची महत्त्वाची बाजू ठरते. सहभागी संहितांमध्ये विषयाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण विषय वाचायला मिळाले. मांडणीच्या दृष्टीने मात्र नाटक आणि एकांकिका लेखनाची तंत्रे आत्मसात करण्यासाठी अधिक परिश्रम करण्यास अजूनही वाव आहे, असे आवर्जून सांगावेसे वाटते. या तुमच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी प्रतिलिपि यापुढेही आपल्यासोबत सदैव राहील. परीक्षकांनी दिलेल्या निर्णयानंतर स्पर्धेच्या निकालाचा टीम प्रतिलिपिने घेतलेला अंतिम निर्णय हा बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी. 

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि सर्व सहभागी लेखकांना प्रतिलिपितर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिलिपिवरील तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे, अशी आम्ही आशा बाळगतो. 

प्रतिलिपि आयोजित 'कुसुमाग्रज करंडक' स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: 
 
एकांकिकेच्या पारितोषिकांचे मानकरी :
 
द्वितीय क्रमांक
 
 
ऑस्कर
 

तृतीय क्रमांक:

 दोन पंथी

गंधर्व-गुळवेलकर-शुभम-गिजे

दोन पंथी

 
नाटकांच्या पारितोषिकांचे मानकरी :

प्रथम क्रमांक:

 

अनाघ्रात

विनय दहिवाळ

द्वितीय क्रमांक:

पसाऱ्याचे यमक

मृदगंधा दिक्षीत

पसाऱ्याचे यमक

तृतीय क्रमांक:

 निष्पर्ण झाले गाणे

राम-कुलकर्णी

निष्पर्ण झाले गाणे

  

उत्तेजनार्थ पारितोषिके खालीलप्रमाणे आहेत:

एकांकिकांमध्ये उत्तेजनार्थ :

तो 

ऋग्वेद-सोमण

तो

 

केमिकल लोचा

साईनाथ टांककर

केमिकल लोचा

बेवारीस शवाची जात

कुलदीप आपटे

बेवारीस शवाची जात

 

नाटकांमध्ये उत्तेजनार्थ :

बाळघुटी 

बागेश्री सराफ

बाळघुटी

नो किडस् नो किचन

डॉ. प्रतिभा भिडे

नो किडस् नो किचन

घोटाळा झालाच नाही 

भालचंद्र देशमुख

घोटाळा झालाच नाही !

 

आकाशवाणीवर अभिवाचनासाठी खालील दोन एकांकिकांना संधी देण्यात येत आहे:

फक्त एकदा - नंदकिशोर जळगावकर 

खेळताड  - जगदीश-पवार

 

ऑनलाईन टॉप ५० संहितांचा चार्ट - : परीक्षकांची पसंती आणि प्रतिलिपि टीम यांनी निश्चित केलेला आहे. यामध्ये क्रमांक न ठरवता सदर टॉप ५० विजेत्यांची नावे ही (A to Z) वर्णमालेच्या अनुक्रमानुसार खाली दिलेली आहेत.

Form Author Name Content Name
Ekankika Aakash Banasode मसनातलं सोनं
Ekankika Abhaykmar Kulkarni मुक्ती
Ekankika Bageshri Saraf सरोगिटा
Ekankika Chitra Mehendale करोडपती बाबा
Ekankika Dnyaneshwar-jadhawar द लॉस्ट बेट
Ekankika Dr. Pramod Bankhele भासकृत उरुभंगम
Ekankika Dr. Smita Datar व्हेयर देअर इज ए विल
Ekankika Gandharv Glawelkar and Shubham Gije दोन पंथी
Ekankika Ganesh Shinde चूक एका लग्नाची एकांकिका
Ekankika Govind Kadam एक अनोखे वळण
Ekankika Jagdish Pawar खेळताड
Ekankika Jayesh Shatrughn Mestri विकृत
Ekankika Kiran Waghmare बायोमॅट्रिक
Ekankika Kuldip Aapate बेवारीस शवाची जात
Ekankika Mukta ऑस्कर
Ekankika Mukta खेळ
Ekankika Nandini Deshmukh आज अचानक
Ekankika Nandkishor K Jalgaonkar फक्त एकदा
Ekankika Ninad Shetye उपवासाची इंग्लिश भाजी
Ekankika Nitin Patil शांतता खून झाला आहे
Ekankika Omkar Prakash Rege आफ्टर द डायरी
Ekankika Omkar Prakash Rege ऑनलाईन बिनलाईन
Ekankika Omkar Prakash Rege वेटिंग फॉर सुपरमॅन
Ekankika Omkar Prakash Rege फेअरीटेल
Ekankika Prasad Anant Khanolkar शेवटची पाच माणसं एकांकिका
Ekankika Prem Jadav धानोरा
Ekankika Rajashri Barve त्या रात्री
Ekankika Rugved Soman तो
Ekankika Sadhana Patil मळभ
Ekankika Sainath Tankkar केमिकल लोचा
Ekankika Sampada Rajesh Deshpande गुंतागुंत
Ekankika Sanjay Pande मसन्याऊद
Ekankika Sanjay Pande मसन्याऊद
Ekankika Sneha Rane लाँग जम्प
Ekankika Tejas शेतकरी बितकरी
Ekankika Uttam Bhivasan Labade बट बिफोर लिव्ह
Natak Abhaykmar Kulkarni जस्ट फॉर फन
Natak Bageshri Saraf बाळघुटी
Natak Bhalachandra Deshmukh घोटाळा झालाच नाही
Natak Chetak Ghegadmal चौपट अध्याय
Natak Chetak Ghegadmal काळेनिळे
Natak Dr. Pratibha Bhide नो किडस् नो किचन
Natak Mrudgandha Dikshit पसाऱ्याचे यमक
Natak Nandkishor K Jalgaonkar मुक्ती
Natak Nitin Bagwadkar मुक्त श्वास
Natak Ram Kulkarni निष्पर्ण झाले गाणे
Natak Ram Kulkarni क्विन्स चेंबर
Natak Saty Sharanam सत्य शरणम
Natak Vinay Dahiwal अनाघ्रात
Natak Vinay Dahiwal मॉलिस स्कुपम

 

सर्व विजेत्यांना कळवण्यात येते की, आकाशवाणीवर अभिवाचनाची तारीख, टॉप ५० विजेत्यांच्या संहितांचे ई-बुक प्रकाशन तसेच डिजिटल सर्टिफिकेट देण्याची दिनांक आपल्याला मेलद्वारे तसेच वेबसाइटवर लवकरच कळवण्यात येईल. 

तसेच १२ विजेत्यांच्या पारितोषिकाची रक्कम पुढील १५ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा.

तसेच विजेत्यांनी आपला संपर्क क्रमांक आपल्या अकाउंटमध्ये अपडेट करावा, ही विनंती. जेणेकरून निकालाबाबत संवाद साधावयाचा असल्यास ते सुलभ होईल. 

 

पुन्हा एकदा विजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे टीम प्रतिलिपितर्फे मनापासून अभिनंदन !

***********