pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रतिलिपि सुपर लेखक अवॉर्ड्स: तुमची 60 भागांची कथामालिका लिहिण्यासाठी खास तुमच्यासाठी 6 विशेष टिपा

22 ऑगस्ट 2023

प्रिय लेखक,

 

भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन कथा लेखन स्पर्धा ‘प्रतिलिपि सुपर लेखक अवॉर्ड्स’ आता पुन्हा सुरू झाली आहे. या स्पर्धेत फक्त 60 भागांची कथामालिका लिहून तुम्ही प्रतिलिपिमध्ये एक प्रतिष्ठित ‘सुपर लेखक’ बनण्याची आणि आकर्षक बक्षिसे व इतर सन्मान जिंकण्याची सुवर्ण संधी मिळवू शकता!

 

60 भागांची बेस्टसेलर कथामालिका तुम्ही सहजपणे कशी तयार करू शकता आणि लिहू शकता याबद्दल येथे खास 6 टिपा देत आहेत.

 

1 एका ओळीमध्ये कथानकाची कल्पना - रिक्त पानावर तुमच्या कथानकाची मूलभूत कल्पना केवळ 1 ओळीत लिहा. हे कथानक दैनंदिन जीवनातील कोणत्याही घटना/वृत्तपत्रातील लेख/टीव्ही बातम्या/कोणत्याही सोशल मीडिया पोस्ट/प्रतिलिपिच्या वाचकांच्या समीक्षा आणि तुमच्या कल्पना इत्यादींमधून प्रेरित झालेले असू शकते.

 

2. तुमच्या कथेचा अर्ध्या पानाचा सारांश तयार करा - वरील 1 ओळीच्या कथानकावर आधारित, तुमच्या कथेची एक छोटी मूलभूत रचना (फ्रेमवर्क) तयार करण्याचा प्रयत्न करा. कथा कुठे सुरू होते आणि कुठे संपते ते लिहा. तुम्हाला तुमच्या कथेत आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पात्रांचा विचार करा व संक्षिप्त नोट्स लिहा.

 

3. तुमच्या कथेतील मुख्य पात्रांची रचना करा - तुमच्या मुख्य पात्रांबद्दल विचार करा. ते कुठे राहतात? त्यांच्या आयुष्यात कोणती आव्हाने आहेत? त्यांचे व्यक्तिमत्व कसे आहे? तुम्हाला तुमच्या कथेत आवश्यक असलेली इतर पात्रे कोणती आहेत? याबाबत 4-5 ओळींमध्ये संक्षिप्त नोट्स लिहा.

 

4. सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या प्रमुख घटनांची नोंद करा - एक रिक्त पान घ्या. वरील अर्ध्या पानाचा सारांश आणि पात्रांवर आधारित आता तुमच्या कथेत घडणाऱ्या संभाव्य प्रमुख घटनांचा विचार करा आणि त्याबाबत लिहा.

 

कथेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुद्देसूद व क्रमिक घटना लिहिण्यासाठी 1,2,3,4 क्रमांक देऊन घटना लिहा. प्रत्येकी 1 ओळ लिहा.

 

5. तुमची कथा भागांमध्ये विभाजित करा - आता स्पर्धेसाठी तुमच्या 60 भागांच्या कथेची योजना करण्याची वेळ आली आहे. एकूण सहा विभाग करा आणि प्रत्येक विभागात प्रमुख कथा घटनांचे वितरण करा. -

1-10 भाग

11-20 भाग

21-30 भाग

31-40 भाग

41-50 भाग

51-60 भाग

 

या प्रत्येक विभागातील कथेत काय घडते? तुम्ही काय लिहाल यावर तुमची कल्पना १-२ ओळींमध्ये लिहा.

 

6. प्रत्येक भागावर नोट्स लिहा - तुम्ही तुमची कथा लिहायला जवळजवळ आता तयार आहेत! प्रत्येक 10 भागांच्या विभागासाठी तुम्ही तुमची कल्पना लिहिलेली आहेच. आता आपल्याला प्रत्येक कथेच्या भागाचे नियोजन करावे लागेल.

 

कथेच्या प्रत्येक भागामध्ये काय असेल याबद्दल 1 ओळीची ढोबळ कल्पना लिहा. उदाहरणार्थ,

भाग 1-

भाग 2-

भाग 3-

भाग 4-

आणि असेच पुढे…



*******************************

 

या संपूर्ण नियोजनाला किमान २-३ दिवस लागतात. परंतु, तुम्ही तुमची कथामालिका लिहिण्यास प्रारंभ करण्यापूर्वी हे खरोखर महत्वाचे आहे. जेव्हा तुम्‍ही तुमची कथामालिका प्रतिलिपि सुपर लेखक अ‍ॅवॉर्ड-7 मध्‍ये प्रकाशित करण्‍यास प्रारंभ कराल, तेव्हा हे नियोजन तुम्‍हाला कथेचा प्रत्‍येक भाग कोणत्याही अडथळ्याविना  अस्खलितपणे लिहिण्‍यास खूप मदत करेल. तुम्ही आधीपासून सर्व गोष्टींचे नियोजन केल्यामुळे तुम्हाला कल्पनांची कमतरता भासणार नाही. यामुळे, या स्पर्धेतील इतर सहभागींपेक्षा तुम्ही आधीच पुढे असाल.

 

टीम प्रतिलिपिने सामायिक केलेली ही विशेष युक्ती जरूर वापरून पहा! संपूर्ण कथामालिका लिहिण्याची प्रक्रिया तुमच्यासाठी किती सोपी होते ते तुम्हाला दिसेल. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही 60 भागांची कथामालिका सहज लिहू आणि पूर्ण करू शकाल.

 

'सुपर लेखक अवॉर्ड्स - 6' चे संपूर्ण तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा



आजच लिहायला सुरुवात करा!

 

शुभेच्छा,

प्रतिलिपि स्पर्धा विभाग