pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आता प्रतिलिपिसह तुमचे पुस्तक प्रकाशित करा - अर्ली बर्ड ऑफर

20 ഫെബ്രുവരി 2024

आता, तुमची कादंबरी पेपरबॅकमध्ये फक्त रु. ५०००/-  मध्ये प्रकाशित करा! तुमच्यापैकी अनेकांना त्यांची कथा छापील पुस्तक म्हणून प्रकाशित करायची आहे आणि यासाठी आम्ही ते प्रत्यक्षात घडवून आणत आहोत. तेव्हा, कमीत कमी किमतीत तुमचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी या मर्यादित ऑफरचा अवश्य लाभ घ्या! तुम्हाला स्वारस्य असल्यास, [email protected] वर आम्हाला संपर्क साधा. 

 

*बेसिक पॅकेज प्लॅन:*

40,000 शब्दांसाठी 5,000 INR + 18% GST. 40,000 शब्दांपेक्षा जास्त शब्द असल्यास, शुल्क वाढेल किंवा पुस्तकाच्या प्रती कमी असतील. तुम्हाला त्याबद्दल अधिक तपशील हवे असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

*पॅकेजमध्ये समावेश असलेल्या गोष्टी:*

  • पुस्तकाच्या 20 प्रती (पेपरबॅक)

  • शिपिंग शुल्क पॅकेजमध्ये समाविष्ट आहे

  • कव्हर इमेज डिझाइन प्रतिलिपिद्वारे केले जाईल

  • तुमच्या पुस्तकाचा ISBN क्रमांक

  • प्रिंट पेपर - बेसिक क्वालिटी

  • फक्त मूलभूत टाइपसेटिंग  (फॉरमॅटिंग)

*या पॅकेजमध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी:* 

  • साहित्याचे प्रूफरिडींग

*इतर महत्वाचे तपशील:* 

  • करारावर स्वाक्षरी होताच त्वरित पेमेंट करावे. संपूर्ण पेमेंट एकाचवेळी करावे. 

  • प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी लेखकाने करारावर स्वाक्षरी करावी.

  • लेखकांना कल्पना देण्यासाठी सॅम्पल पुस्तकाचा विडिओ पाठवला जाईल. (टीप - हे तुमचे पुस्तक नसेल. या प्रकल्पासाठी छापलेल्या नमुना पुस्तकाचा विडिओ तुम्हाला पाठवला जाईल.)

  • लेखकाला त्यांच्या पुस्तकात बदल करण्यासाठी 7-10 दिवस मिळतील. या विहित कालावधीमध्ये लेखकाने प्रूफरीडिंग आणि टाइपसेटिंग करावे.

  • संपादित साहित्य आमच्याकडे सबमिट केल्यानंतर, मुद्रित प्रती पाठवण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त 30 दिवस लागतील.

  • कव्हर इमेज प्रतिलिपि टीमद्वारे डिजाईन आणि नियोजित केली जाईल. लेखक नमुना इमेज आम्हाला देऊ शकतात मात्र याबाबत अंतिम निर्णय आमच्या टीमद्वारे घेतला जाईल. एका पुस्तकासाठी फक्त एक कव्हर इमेज डिझाइन केली जाईल.

  • साहित्याचा कॉपीराइट लेखकाचा असेल - प्रतिलिपिकडे कॉपीराइट नसेल तरच.

  • पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा कॉपीराइट प्रतिलिपिकडे असेल. करारातही याचा उल्लेख असेल.

  • पुस्तक छपाईसाठी पाठवण्याआधी, प्रतिलिपि लेखकाला त्यांच्या अभ्यासासाठी एक पीडीएफ फाईल पाठवेल.

*टाइपसेटिंग/प्रूफरिडींगसाठी गाईडलाईन्स:* 

  • अंतिम साहित्यामध्ये कोणतेही इमोजी वापरू नयेत.

  • ओळींमध्ये अतिरिक्त स्पेस नसावी.

  • कोणतेही अतिरिक्त पूर्णविराम, स्वल्पविराम इत्यादी असू नयेत.

 

*सतत विचारले जाणारे प्रश्न:*

 

1. मला या योजनेत सहभागी होण्याची इच्छा आहे. पुढे मी काय करू?

पुस्तक छापण्याची तुमची इच्छा असल्यास कृपया [email protected] वर आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मेलमध्ये तुमचा मोबाइल नंबर जोडा.

 

2. या प्रक्रियेमध्ये कोणते टप्पे समाविष्ट आहेत?

तुम्ही आम्हाला मेल पाठवल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमच्या पुस्तकाचा तपशील मिळवू. यानंतर आम्ही स्पॉट ड्राफ्ट आणि प्रतिलिपि बँक खात्याच्या तपशीलासह तुम्हाला स्वाक्षरी करण्यासाठी करार पाठवू. एकदा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आणि करारावर तुमची स्वाक्षरी झाल्यानंतर, पुस्तकाबद्दल इतर सर्व तपशील गोळा करण्यासाठी एक गुगल-फॉर्म मेलद्वारे तुमच्याशी सामायिक केला जाईल. यासोबत आम्ही पुस्तकाची एडिटेबल डॉक्युमेंट फाईल देखील अंतिम संपादनासाठी पाठवू. एकदा तुम्ही पुस्तकाचा तपशील भरला आणि संपादित डॉक्युमेंट फाईल आम्हाला पाठवली की, आम्ही प्रकाशन आणि इतर सर्व नमूद केलेल्या गोष्टींवर काम सुरू करू.

 

3. पुस्तकाचा प्रकाशक कोण असेल?

प्रतिलिपि पेपरबॅक

 

4. मी माझे पुस्तक प्रकाशनासाठी प्रतिलिपिकडे कसे पाठवू?

तुमचे पुस्तक प्रतिलिपि ॲपमध्ये उपलब्ध असल्यास, आम्ही ते प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करू. जर लेखकाला संपादित प्रत पाठवायची असेल तर त्यांनी ती एमएस वर्ड (MS Word) फाइलमध्ये आम्हाला पाठवावी.

 

5. मला प्रतिलिपिवर प्रकाशित नसलेली पुस्तके प्रकाशित करू शकतो का? मी पुढील प्रक्रिया कशी करावी?

होय, आम्ही प्रतिलिपि बाहेरील पुस्तके देखील प्रकाशित करतो. पुस्तकाची प्रत एमएस वर्ड (MS Word) फाइलमध्ये आम्हाला पाठवावी.

 

6. मी पेमेंट कोणत्या बँक खात्यावर पाठवावे?

तुम्ही सर्व अटी समजून घेतल्यावर आणि प्रकाशनासाठी पुढे जाण्यास सहमत झाल्यानंतर आम्ही बँक तपशील तुमच्यासोबत शेअर करू.

 

7. माझ्या पुस्तकाची विक्री किंमत किती असेल?

प्रतिलिपि आणि लेखक या दोहोंमधील चर्चेनंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल (पुस्तकांच्या किमतीच्या बाबतीत काही घटक विचारात घेतले जातात).

 

8. तुम्ही माझे पुस्तक ऑनलाइन वेबसाइटवर विकाल का? उदा- अमेझॉन 

होय. आम्ही अमेझॉन मध्ये तुमच्या पुस्तकाची ऑनलाईन लिस्टिंग कारण्यासाठी मदत करू. ऑनलाईन लिस्टिंग कारण्यासाठी अतिरिक्त किंमत आकारली जाईल. 

 

9. पुस्तकाचा आकार किती आहे?

8.5 x 5.5 इंच

  

टीम प्रतिलिपि