pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निकाल तयार करण्याची प्रक्रिया

25 ऑगस्ट 2025

1. सहभागी सर्व कथामालिकांमधून पात्र असलेल्या कथामालिकांची निवड प्रक्रिया: 

निवडीचे नियम:

→ प्रकाशन तारीख: कथामालिका स्पर्धेच्या अधिकृत कालावधीतच प्रकाशित झालेली असावी.

→ किमान भागसंख्या: स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तेवढे भाग प्रकाशित केलेले असावेत.

→ प्रत्येक भागातील शब्दसंख्या: प्रत्येक भागासाठी निश्चित केलेली किमान शब्दसंख्या पूर्ण झालेली असावी.

→ स्पष्ट मजकूर धोरण (Explicit Content Policy): कथा प्रतिलिपिच्या Explicit Content Guidelines प्रमाणे असावी. नियमबाह्य मजकूर असलेली कथामालिका अपात्र ठरेल. (सविस्तर धोरणासाठी इथे क्लिक करा)

→ डुप्लिकेट किंवा कॉपी/प्लॅजिअरिझ्ड साहित्य: अशा नोंदी अपात्र ठरवल्या जातील.

 

2. परीक्षण प्रक्रिया:

निवड केलेल्या कथामालिका त्या भाषेतील तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीकडून तपासल्या जातात. कथा गुणांकन करताना खालील मुद्दे विचारात घेतले जातात:

  1. कथनशैलीची गुणवत्ता: लेखकाने कथा किती रंजक आणि प्रभावीपणे सांगितली आहे, वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे का हे तपासले जाते.

  2. मौलिकता: नवनवीन व अनोख्या कल्पना, ज्या सामान्य वा वारंवार येणाऱ्या कथांपेक्षा उठून दिसतात.

  3. वाचकांवर परिणाम: कथेने निर्माण केलेले भावनिक नाते जे वाचून झाल्यानंतरही वाचकाच्या मनात राहते. (हे वाचकांच्या कमेंट्समधूनही दिसून येते.)

  4. प्लॉट ट्विस्ट्स: कथेतले अनपेक्षित वळण, ज्यामुळे पुढे काय होईल याची उत्कंठा वाढते.

  5. कथेची गती: प्रसंगांचा प्रवाह न अति धीमा न अति वेगवान, पण वाचकाची रुची कायम ठेवणारा.

  6. ट्विस्ट्स आणि टर्न्स: अचानक घडणाऱ्या घडामोडी ज्यामुळे थरार आणि उत्सुकता जिवंत राहते.

  7. पात्रनिर्मिती: पात्रे किती जिवंत वाटतात आणि कथानकात विकसित होतात, ज्यामुळे वाचक त्यांच्याशी नाते जोडतात.



टीप: प्रत्येक परीक्षक स्वतंत्रपणे गुणांकन करतो. नंतर सर्व गुणांचे सरासरी काढून अंतिम रँक निश्चित केली जाते.

3. डबल-चेक प्रक्रिया

गुणांकन झाल्यानंतर कथामलिकांची पडताळणी दोन सदस्यांच्या अंतर्गत भाषा टीमकडून केली जाते. यामध्ये नियमांचे पालन झाले आहे का आणि न्याय्य गुणांकन झाले आहे का हे पाहिले जाते. त्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम विजेत्यांची यादी तयार करून पुन्हा एकदा अचूकतेसाठी तपासली जाते.

 

4. निकाल जाहीर करणे

निकाल प्रतिलिपिच्या अधिकृत ब्लॉग विभागामध्ये प्रकाशित केले जातात. विजेत्यांना वैयक्तिकरित्या अॅप नोटिफिकेशन किंवा ई-मेलद्वारे माहिती दिली जाते.

आम्हाला ठाऊक आहे की लेखन व त्याचे परीक्षण ही व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया आहे. एका व्यक्तीला आवडलेली कथा दुसऱ्याला आवडेलच असे नाही. पण आमची मूल्यांकन प्रक्रिया सर्वांसाठी न्याय्य, सुसंगत आणि निष्पक्ष राहील अशी रचना केलेली आहे.

 

शुभेच्छा,

टीम प्रतिलिपि