प्रिय लेखकांनो,
प्रतीक्षा संपली आहे!
‘सुपर लेखक अवॉर्ड्स - 5’ चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विजेत्या लेखकांचे नाव उघड करण्यापूर्वी, काही शब्द आहेत जे आम्ही तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. या पर्वाने लेखकांचा स्पर्धेमधील सहभाग संख्येच्या बाबतीत मागील सर्व विक्रम मोडले आहेत. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 60 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे.
'सुपर लेखक अवॉर्ड्स' हा देशातील सर्वात लोकप्रिय साहित्य पुरस्कारांपैकी एक कसा बनला आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. १२ भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे!
उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व ‘सुपर लेखकांचे’ मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्हाला प्राप्त झालेल्या असंख्य कथांमधून तुमच्या कथा निखरून समोर आल्या आणि तुमच्या या यशाबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे.
सर्व सहभागी लेखकांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही हिरीरीने दाखवलेल्या सहभागाबद्दल आणि ही स्पर्धा उत्तुंग यशस्वी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमची लेखनाची आवड आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आमच्या व्यासपीठावर एवढी लेखन प्रतिभा असल्याचा आम्हाला अभिमान आहे!
तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या थरारक कथा, शरीर गोठवणाऱ्या भयकथा, जबरदस्त प्रेमकथा, भक्कम संदेशांसह सामाजिक कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा - आम्ही या सर्व शैलींमधील साहित्य या स्पर्धेमध्ये लिहिले गेलेले पाहिले आहे! या स्पर्धेत आमच्या लेखकांनी प्रकाशित केलेल्या कथांचा दर्जा उल्लेखनीय आहे! आम्ही प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, प्रत्येक कथेने आमच्या हृदयाला स्पर्श केला आहे आणि काही कथा कायम आमच्या हृदयाजवळ राहतील.
मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! भविष्यात तुम्ही असे उत्तम लेखन कराल अशी आम्ही आशा करतो.
लेखकांची रँक | नाव | कथामालिका | बक्षिसे |
1 | sumedha | 💕💕लग्नाचा करार💕💕 | (Rs.15,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
2 | 🎓Adv Ketaki 🎓 | कैसे मुझे तुम मिल गए। | (Rs.11,000/- रोख पारितोषिक +विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
3 | माधुरी गायकवाड - क्षिरसागर✒️📝 | झुंज - जगण्याची नवी आशा | (Rs.7,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
4 | aarti-randive🦋 | अरुंधती... a intense love story of spirit. | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
5 | वैशाली | मी तुझी स्वामिनी ♥️ | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
6 | sunil-jawale | डेअर डेव्हिल | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
7 | sarita-sao | प्रतिशोध | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
8 | संतोष-देशपांडे | यवाक्ष पर्व-३ मोहिनी (एक स्त्री संमंध)-१ | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
9 | ashwini-kamble | अल्लड प्रेमाची हुल्लड कथा 😉 | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
10 | spring-day | वाबी - साबी ! | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
11 | sanjay-prabhakar-patil | अ गर्ल इन लव..!१ ( कादंबरी ) | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
12 | वंदना-सोरते | कलंक तुझ्या प्रेमाचा | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
13 | नरेंद्र-कुलकर्णी | शोध .... चांगल्या नशिबाचा . | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
14 | sunny | शोध अस्तित्वाचा : प्रेम गाथा | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
15 | ऋतुजा-कुलकर्णी | करार प्रेमाचा (पर्व २) : कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ते प्रेमाचा प्रवास | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
16 | डॉ-सुप्रिया-दिघे | रेशीमबंध | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
17 | सुरेखा-ठाणेकर | रणांगण | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
18 | मनकवडी-💜 | आरंभ🔥 (केतन पर्व २) | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
19 | jyoti-jadhav | सांग कधी कळणार तुला?💞तळमळ दोन जिवांची. | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
20 | dr-shalaka-londhe | वेड लागे जीवाला... | (Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + .प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश + मोफत ऑनलाइन लेखन प्रशिक्षण) |
वरील विजेत्या सर्व लेखकांनी त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.
या [email protected] ई-मेलवर माहिती पाठवावी. कृपया दुसऱ्या कोणत्या ही ई-मेलवर ही माहिती पाठवू नये.
कृपया IFSC बरोबर आहे की नाही हे तपासून बघावे.
ई-मेल मध्ये विजेत्या कथामालिकेचं नाव आणि तुमच्या प्रतिलिपि प्रोफाईलवरचं नाव नमूद करावे आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.
Full Name in Marathi & English (for certificate)-
Address-
Phone number-
Bank Account Holder's Name:
Bank Account Number:
IFSC:
Bank Name:
Pan Card No:
खाली दिलेल्या कथांचा विशेष उल्लेख न केल्यास अन्याय होईल. आम्ही या लेखकांना पुढच्या वेळी वरील सुपर लेखक यादीत पाहण्याची आशा करतो. काही उत्तम कथामालिका इथे नमूद करत आहोत-
कृपया नोंद घ्या, काही दिवसात, आम्ही या स्पर्धेत 100+ भाग कथामालिका प्रकाशित केलेल्या सर्व यशस्वी लेखकांची यादी प्रकाशित करू आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिलिपिकडून हमखास बक्षिसे मिळतील. त्यांचे यश आम्ही संपूर्ण प्रतिलिपि परिवारासोबत साजरे करू. तोपर्यंत प्रतिलिपि ब्लॉग तपासत राहा!
आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या ‘सुपर लेखक अवॉर्ड - 6’ मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. सहभागी होण्यासाठी तुम्हाला 25 डिसेंबर, 2023 च्या आत 60 भागांची कथामालिका प्रकाशित करायची आहे. विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event/6z4bt2yiw5
अनेक शुभेच्छा,
प्रतिलिपि इव्हेंट्स टीम