pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुपर लेखक अवॉर्ड्स - 6।| निकाल

24 ਫਰਵਰੀ 2024

प्रिय लेखकांनो,

 

प्रतीक्षा संपली आहे!

‘सुपर लेखक अवॉर्ड्स - 6’ चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विजेत्या लेखकांचे नाव उघड करण्यापूर्वी, काही शब्द आहेत जे आम्ही तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. या पर्वाने लेखकांचा स्पर्धेमधील सहभाग संख्येच्या बाबतीत मागील सर्व विक्रम मोडले आहेत. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 60 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे.

 

'सुपर लेखक अवॉर्ड्स' हा देशातील सर्वात लोकप्रिय साहित्य पुरस्कारांपैकी एक कसा बनला आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. १२ भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे! उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व ‘सुपर लेखकांचे’ मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्‍हाला प्राप्त झालेल्या असंख्य कथांमधून तुमच्या कथा निखरून समोर आल्या आणि तुमच्‍या या यशाबद्दल आम्‍हाला अत्यंत आनंद झाला आहे.

 

सर्व सहभागी लेखकांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही हिरीरीने दाखवलेल्या सहभागाबद्दल आणि ही स्पर्धा उत्तुंग यशस्वी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमची लेखनाची आवड आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आमच्या व्यासपीठावर एवढी लेखन प्रतिभा असल्याचा आम्हाला अभिमान आहे!

 

तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या थरारक कथा, शरीर गोठवणाऱ्या भयकथा, जबरदस्त प्रेमकथा, भक्कम संदेशांसह सामाजिक कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा - आम्ही या सर्व शैलींमधील साहित्य या स्पर्धेमध्ये लिहिले गेलेले पाहिले आहे! या स्पर्धेत आमच्या लेखकांनी प्रकाशित केलेल्या कथांचा दर्जा उल्लेखनीय आहे! आम्ही प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, प्रत्येक कथेने आमच्या हृदयाला स्पर्श केला आहे आणि काही कथा कायम आमच्या हृदयाजवळ राहतील.

 

मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत. 

 

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! भविष्यात तुम्ही असे उत्तम लेखन कराल अशी आम्ही आशा करतो.


 

 परीक्षकांची निवड

टॉप 10  विजेत्या कथामालिका: 7,000 रोख रक्कम  + प्रतिलिपितर्फे खास डिझाइन व फ्रेम केलेले प्रमाणपत्र प्राप्त होईल. 

आमचे परीक्षकांचे विशेष पॅनलने कथानकाचे वेगळेपण, कथानकाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची क्षमता, पात्रांची मांडणी, कथानकातील वर्णन आणि संवाद लेखन, कथानकातील अनपेक्षित वळणे या निकषांनुसार खालील विजेते निवडले आहेत

 

  1. blankyyy-🖤 - अपरिहार्य 🌸 

  2. cfi - टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)

  3. प्रभाकर-पवार - व्हल्यू सेवनटीन सीआर

  4. sarika-kandalgaonkar - योद्धा.. the Warrior

  5. jyoti-kiratkudve - प्रथा

  6. dr-aniket-manepatil - सायलेंट किलर'

  7. ambrosia - 💞👶सरोगेट फादर👶 💞

  8. सी - ऋण फिटता फिटेना…

  9. gauri-dhankawade - नजराणा - कथा तीच्या संघर्षाची भाग 1

  10. Dr. Sonali🩺 - स्वप्नांतिका..


वाचकांची पसंती

टॉप 10  विजेत्या कथामालिका: 7,000 रोख रक्कम  + प्रतिलिपितर्फे खास डिझाइन व फ्रेम केलेले प्रमाणपत्र प्राप्त होईल. 

सर्व सहभागी कथांमधून  आम्ही लेखकाच्या अनुयायांच्या संख्येच्या तुलनेत एकूण वाचकसंख्या आणि सर्वोच्च प्रतिबद्धता (एंगेजमेंट) स्कोअर. म्हणजे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती टक्के वाचकांनी कथा वाचून पूर्ण केली या निकषांनुसार आधारित खलील टॉप 10 कथांची यादी तयार केली आहे 

  1. Sarvesh Naik - सिल्विया...द कॉल गर्ल

  2. 💞💞Poonam Yadav💞💞- हळुवार बहरेल प्रीत ही आपली 💜❤️

  3. Archana 💕 - तुम देना साथ मेरा...1

  4. Urmila S.P - ♟️उत्तराधिकारी... { १ }

  5. चेतन सकपाळ - अतृप्त सवाष्ण ! | सुवासिनी ची अतृप्त आस | भयपट कथामलिका | विचारांची_Journey

  6. प्रियंका विघ्ने - ❤️दास्तान - ए - इश्क❤️ …

  7. सावी ♥️✨♥️ - 💓 Warm wedding 💓

  8. Shine✨✨ - लव्ह💞मेट्स... अ सुपरनॅचरल लव्ह स्टोरी... ट्रेलर

  9. डॉ सुप्रिया दिघे - समर्पण- एक प्रेमकथा

  10. Dr.Shalaka Londhe - शापित सौंदर्य

 


वरील विजेत्या सर्व लेखकांनी त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.कृपया खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमचे तपशील भरा:

 

प्रमाणपत्र तपशील - https://forms.gle/VNkXHQkt7UWLjYd39

बँक तपशील - https://forms.gle/F3vSnYVS1XCprTMg9

तुम्ही तुमची माहिती [email protected] वर देखील पाठवू शकता. कृपया दुसऱ्या कोणत्या ही ई-मेलवर ही माहिती पाठवू नये.

 

ई-मेल मध्ये विजेत्या कथामालिकेचं नाव आणि तुमच्या प्रतिलिपि प्रोफाईलवरचं नाव नमूद करावे आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.

Full Name in Marathi & English (for certificate)- 

Address:

Phone number:

Bank Account Holder's Name:

Bank Account Number:

IFSC:

Bank Name:

Branch Name:

Pan Card No:

 


 

खाली दिलेल्या कथांचा विशेष उल्लेख न केल्यास अन्याय होईल. आम्ही या लेखकांना पुढच्या वेळी वरील सुपर लेखक यादीत पाहण्याची आशा करतो. काही उत्तम कथामालिका इथे नमूद करत आहोत-

vrishali-patil - प्रारब्ध
जयश्री-अंकुश-जाधव - चंद्रिका एक संघर्षमय कथा
pramod-naikwade - DETECTIVE "D"
jyoti-jadhav - पारंब्यांना🌳 ओढ मातीची - काया 🧚‍♀️
dr-दिपज्योती - दशमहाविद्या
nitin-ahirrao - " बीज अंकुरे अंकुरे " भाग 1
अनिकेत-मस्के - होळकरशाही झंझावात
maddy😘 - झुंज - नवे पर्व
dr-vrunda-f - प्रीतबंध.
नरेश-धोटकर - नजर
संतोष-देशपांडे - परचित्तकाया प्रवेश :-१
वंदना-सोरते - प्रेमाच्या पानांतरी
sharakha - ती तेव्हा तशी ..
priyanka-patil - आत्मसन्मान
rameshwari-kanade - अशीच का ग तू ?.......
jyoti-patil💖 - मी स्वतःसाठी खंबीर आहे......!!
aarti-wagh - Connected By Heart ❤️
नीता-❤️❤️ - खुशी: जगण्याचे कारण तू...!
❤️स्नेहा❤️ - शिविका - एक अनोखे बंधन..
क्षमा-राऊत - डिअर स्ट्रेंजर... ❣️

 


 

यशस्वी पदार्पण अवॉर्ड्सचे विजेते आणि 80 भागांचे चॅलेंजचे विजेते पुढील 15 दिवसांत प्रकाशित केले जातील, आम्ही तुम्हाला त्यानुसार सहकार्य करण्याची विनंती करतो.

आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या ‘सुपर लेखक अवॉर्ड - 7’ मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event/c5p8ohgajk

 

तुम्हाला कथामालिका लिहून दर महिन्याला पैसे कमवायचे आहेत का? तुमच्या कथामालिकेतून दरमहा किमान Rs.10,000 कमावण्याच्या टिप्स जाणून घ्या प्रतिलिपि प्रथमच ‘प्रतिलिपि क्रिएटर्स प्रोग्राम’ आयोजित करत आहे, जो लेखकांसाठी उच्च स्तरीय (कमाईवर केंद्रित) 6-दिवसीय फ्री लाईव्ह ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र प्रोग्राम आहे. हा विशेष ट्रेनिंग प्रोग्राम 26 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म आजच भरा आणि आमच्या अधिकृत WhatsApp कम्युनिटीमध्ये सामील व्हा-https://marathi.pratilipi.com/event/m396czspef

 

अनेक शुभेच्छा,

प्रतिलिपि इव्हेंट्स टीम