
प्रतिलिपिप्रिय लेखक मित्रांनो,
तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे!
'सुपर लेखक अवॉर्ड्स - 10' या आपल्या सर्वांच्या आवडत्या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. या पर्वात अनेक नवीन लेखकांनी 'गोल्डन बॅज' मिळवत स्पर्धेत यशस्वी पदार्पण केले आणि तब्बल 80 भागांच्या दर्जेदार कथामालिका प्रकाशित केल्या, हे पाहून मनस्वी आनंद झाला.
संपूर्ण भारतातील 12 भाषांमधील हजारो लोकप्रिय तसेच नवोदित लेखक या स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यांनी अनेक बेस्टसेलर कथांची निर्मिती केली. या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने आपल्या देशात दडलेल्या अफाट प्रतिभेला एक भव्य व्यासपीठ मिळवून दिले आहे. उत्कृष्ट साहित्याच्या निर्मितीबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व 'सुपर लेखकांचे' मनःपूर्वक अभिनंदन करतो.
अर्थात, स्पर्धेचे नियम आणि स्वरूपानुसार विजेत्यांची निवड करणे अनिवार्य आहे. म्हणूनच, हजारो उत्तमोत्तम साहित्यांमधून सर्वोत्कृष्ट लेखकांची निवड करण्याचे आव्हानात्मक कार्य आमच्या परीक्षक मंडळाने मोठ्या परिश्रमानंतर पूर्ण केले आहे.
महत्त्वाची सूचना: खालील सर्व विजेत्यांना पुरस्काराच्या तपशीलासंबंधीची माहिती देण्यासाठी, पुढील 4-5 दिवसांत [email protected] या ईमेल आयडीवरून संपर्क साधण्यात येईल.
(1 ते 3 क्रमांकाचे वेजेते: ₹5000 रोख बक्षीस + विशेष पुरस्कार + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + प्रतिलिपि टीमकडून विशेष पत्र )
(4 ते 6 क्रमांकाचे वेजेते: ₹3000 रोख बक्षीस +विशेष पुरस्कार + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + प्रतिलिपि टीमकडून विशेष पत्र ) |
|
(7 ते 10 क्रमांकाचे वेजेते: ₹2000 रोख बक्षीस +विशेष पुरस्कार + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + प्रतिलिपि टीमकडून विशेष पत्र ) |
|
(11 ते 25 क्रमांकाचे वेजेते: ₹1000 रोख बक्षीस + विशेष फ्रेम पुरस्कार + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + प्रतिलिपि टीमकडून विशेष पत्र ) |
(ईमेलद्वारे प्रतिलिपिकडून 'साहित्य सन्मान पत्र')
(ईमेलद्वारे प्रतिष्ठित 'प्रशंसा पत्र')
विजेत्यांसोबतच, या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक लेखक आमच्यासाठी सन्माननीय आहे. प्रत्येक सहभागी लेखकाला ईमेलद्वारे 'विशेष सहभाग प्रमाणपत्र' पाठवले जाईल. इतकेच नाही, तर स्पर्धेतील सर्व कथामालिकांना आमच्या फेसबुक पेजवर आणि प्रतिलिपिच्या होमपेज बॅनरवर विशेष प्रसिद्धी दिली जाईल. यासोबतच, लेखनाचे मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या 'व्हर्च्युअल गाईड' चा आजीवन विनामूल्य प्रवेशही सर्वांना मिळेल!
या स्पर्धेशी संबंधित तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तुम्ही आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर थेट लिहू शकता. आमची टीम 24 तासांच्या आत प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट ठेवते.
प्रतिलिपि हजारो लेखकांसोबत रोज काम करत आहे आणि त्यांची स्वप्ने सत्यात उतरवत आहे. आम्ही तुमच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार करत आहोत. तुमच्याकडे प्रतिभा असल्यास, तुम्ही लेखन श्रेत्रात करिअर करू शकता. तुमच्या लेखनातून दरमहा कमाई करू शकता. सहभागी होऊ शकता आणि बेस्ट सेलर लेखक होऊ शकता. चला तर मग लिहायला सुरुवात करूया.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
प्रतिलिपि इव्हेंट्स टीम