प्रिय लेखकांनो,
प्रतीक्षा संपली आहे!
‘सुपर लेखक अवॉर्ड्स - 7’ चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विजेत्या लेखकांचे नाव उघड करण्यापूर्वी, काही शब्द आहेत जे आम्ही तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. या पर्वाने लेखकांचा स्पर्धेमधील सहभाग संख्येच्या बाबतीत मागील सर्व विक्रम मोडले आहेत. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 60 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे.
'सुपर लेखक अवॉर्ड्स' हा देशातील सर्वात लोकप्रिय साहित्य पुरस्कारांपैकी एक कसा बनला आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. १२ भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे! उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व ‘सुपर लेखकांचे’ मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्हाला प्राप्त झालेल्या असंख्य कथांमधून तुमच्या कथा निखरून समोर आल्या आणि तुमच्या या यशाबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे.
सर्व सहभागी लेखकांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही हिरीरीने दाखवलेल्या सहभागाबद्दल आणि ही स्पर्धा उत्तुंग यशस्वी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमची लेखनाची आवड आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आमच्या व्यासपीठावर एवढी लेखन प्रतिभा असल्याचा आम्हाला अभिमान आहे!
मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! भविष्यात तुम्ही असे उत्तम लेखन कराल अशी आम्ही आशा करतो.
सूचना : खालील विजेत्यांना पुढील 48 तासांत [email protected] वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल.
************************
(सुपर 7 लेखकांना ₹5000 रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र घरपोच मिळेल)
************************
(सुपर 7 लेखकांना ₹5000 रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र घरपोच मिळेल)
************************
सूचना : सर्व डिजिटल प्रमाणपत्रे आणि राजपत्रे लेखकांसह [email protected] द्वारे पाठविली जातील आणि सर्व कथामालिका एका आठवड्याच्या आत प्रतिलिपि ॲपच्या होमपेज बॅनरवर उपलब्ध होतील.
आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या ‘सुपर लेखक अवॉर्ड - 8’ आणि प्रतिलिपि क्रिएटर्स लेखन चॅलेंज 2.0 मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!