प्रिय प्रतिलिपि परिवार,
गेल्या काही महिन्यांत, आम्ही लेखकांना सुपरफॅन सबस्क्रिप्शन, प्रतिलिपि प्रीमियम आणि इतर बऱ्याच व्हर्चुअल भेटवस्तूंच्या माध्यमांतून मानधन कमावण्याचे नवनवीन मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचक सुद्धा त्यांच्या आवडत्या लेखकांना प्रोत्साहन देत आहेत.
तुम्हाला कळवण्यास आम्हाला आनंद वाटतो की , प्रतिलिपि वरील लेखकांनी या कार्यक्रमांद्वारे ऑगस्ट २०२१ महिन्यात एकत्रितपणे 10 लाखांहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. प्रतिलिपि वरील दोन लेखक महिन्याला 50 हजार पेक्षा जास्त रुपये कमावतात,16 लेखक दरमहा 10 हजार पेक्षा जास्त रुपये कमावतात,44 लेखक दरमहा 5 हजार पेक्षा जास्त रुपये कमावतात तर तब्बल 240 पेक्षा जास्त लेखक दरमहा 1 हजार पेक्षा जास्त रुपये कमावतात.
आपल्या या महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या लेखिका प्रिती जाधव यांचे खूप खूप अभिनंदन .त्यांनी प्रेम कथा, सामाजिक कथा आणि रोमांचक कथा यावर मालिका आणि लघुकथा लिहून या महिन्यात 1 लाखाहून अधिक रुपयांची कमाई केली आहे .त्यांनी प्रतिलिपिवर वाचक म्हणून सुरुवात केली, पण गेल्यावर्षी अचानक लागलेल्या लॉकडाउनमुळे त्यांना खूप मोठी संधी लाभली. या काळात त्यांनी विविध विषयांवर लेखन करण्यास सुरुवात केली.वाचकांचा उत्साह व प्रतिसाद पाहून त्यांना लेखन करण्यास प्रोत्साहन मिळाले.काही वेळा त्यांना नकारात्मक प्रतिक्रियांचा देखील सामना करावा लागला, पण यामुळे खचून न जाता त्यांनी अजून जोमाने लिहायला सुरुवात केली. त्यांना लेखन क्षेत्रात खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली ती 'विधिलिखित तू फक्त माझी आहेस' या त्यांच्या उत्कृष्ट कथेने.आपल्या सुफरफॅन्सना कायम गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे एक गमक आहे, ते म्हणजे कथा मालिकेचा प्रत्येक भाग हा एका उत्सुकता वाढवणाऱ्या क्षणी संपवून त्या पुढचा भाग वाचण्यास वाचकांना प्रवृत्त करणे. सुंदर युक्ती आहे ना!!!आम्हाला आपल्या या अतिव्यस्त गृहिणी आणि उत्कृष्ट लेखिकेसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.प्रतिलिपीच्या माध्यमातून यशस्वी होऊ पाहणाऱ्यांसाठी त्यांनी मोलाचा सल्ला दिला. "तुमच्या कल्पनेला पंख द्या.कायम लिहीत रहा.नकारात्मक टिप्पण्या सकारात्मकपणे घ्या कारण यामुळे तुम्हाला तुमच्या लिखाणाबद्दल स्पष्टता येत जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे भरपूर वाचन करा.माझ्यामध्ये दडलेल्या लेखिकेला वाव दिल्याबद्दल मी प्रतिलिपिचे खूप खूप आभार मानते.खऱ्या अर्थाने असं म्हणता येईल की प्रतिलिपि हे असं व्यासपीठ आहे जिथे आपण आपल्या कल्पनांना शब्दांत मांडू शकतो"- प्रिती जाधव
आपले दोन कार्यक्रम,सुपरफॅन सबस्क्रिप्शन आणि प्रतिलिपि प्रीमियम हे तुमच्या लिखानाद्वारे कमाईचे शाश्वत माध्यम बनवणारे दोन मार्ग आहेत. हे कार्यक्रम आपल्या वाचकांना तुमच्या कथामालिका वाचण्यासाठी इतर अनेक फायद्यांसोबत प्रीमियम किंमतीत प्रवेश मिळवून देण्यासाठी बनवलेले आहेत.आपण या कार्यक्रमांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास,कृपया खालील लिंकवर क्लिक करा..
प्रतिलिपि प्रीमिअम सिरीज (माहिती)
प्रतिलिपि सुपरफॅन सब्सक्रिप्शन बद्दल माहिती
आपल्या प्रतिलिपी लेखिका आणि अधिवक्ता केतकी यांच्याकडून या कार्यक्रमांचा लाभ कसा घ्यावा? हे नक्कीच शिकण्यासारखे आहे. व्यवसायाने वकील असणाऱ्या, लिखाणाची आवड असणाऱ्या लेखिका केतकी यांनी त्यांच्या लिखाणातील जादूने एका महिन्यात 80 हजार पेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. त्यांच्या मते लिखाणात असणारं सातत्य ही महत्वाची अशी एक गोष्ट आहे, ज्या माध्यमातून तुम्ही वाचकांना तुमच्या लिखानाकडे आकर्षित करून तुमचे अनुसरण करण्यास भाग पाडू शकता. त्यांनी आतापर्यंत प्रेम आणि सामाजिक विषयांवर भरपूर लिखाण केले आहे आणि त्यांना असं वाटतं की लेखक म्हणून आपण निरनिराळ्या विषयांवर लिहीत राहिलं पाहिजे, त्यांच्या मते वाचकांना हेच हवं असतं. त्यांच्यासोबत संभाषणात त्या पुढे म्हणतात "तुमच्या लिखाणाचा आनंद घ्या.जरी तुम्हाला जास्त वाचक मिळत नसतील तरी खचून जाऊ नका.एक दिवस नक्की तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल"
या महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत माधवी चौधरी.त्या एक गृहिणी व लेखिका आहेत.त्या प्रेम,कल्पनारम्य,कुटुंब,स्त्री,जीवन आणि रहस्य अशा विविध विषयांवर लिखाण करतात.त्यांच्या सुपरफॅन्सना गुंतवून ठेवण्याचा त्यांचा मंत्र सोपा आहे.वाचकांना अपडेट ठेवा.तुमच्या कल्पकतेला वाव द्या आणि वाचकांना अचंबित करून टाकेल अशा पद्धतीने तुमच्या कथांचा शेवट करा.माधवीचा आपल्या सर्व वाचकांसाठी खूप सुंदर संदेश आहे."मी गेल्या दोन वर्षांपासून प्रतिलिपीवर लिहीत इथपर्यंत पोहचले आहे. माझ्या यशाचे सर्व श्रेय मी माझ्या वाचकांना देऊ इच्छिते. त्यांनी वेळोवेळी माझ्या कामाचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले ज्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली"
आम्हाला खात्री आहे,जर तुम्ही नवीन लेखक असाल आणि हे वाचत असाल ,तर तुम्हाला बरेच प्रश्न पडू शकतात.जसे की ,मी नवीन आहे,लोक माझे सदस्यत्व का घेतील, मला इतके वाचक कसे मिळतील जेणेकरून मी प्रतिलिपीवर कमाई सुरू करेन.पण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपण टप्प्याटप्प्याने याची सुरुवात करू शकतो.सुपरफॅन सबस्क्रिप्शन आणि प्रतिलिपी प्रीमियम याव्यतिरिक्त देखील बरेच मार्ग आहेत ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.हुर्रे!!!!
जर तुम्ही सातत्याने लिहीत राहिलात आणि आपल्या वाचकांच्या पसंतीस उतरलात तर ते तुमच्या प्रोफाइलला भेट देऊ शकतात आणि उपलब्ध असलेल्या व्हर्चुअल भेटवस्तूंपैकी एक निवडून ज्या भेटवस्तूंना आर्थिक मूल्य असेल(प्रतिलिपी नाण्यांच्या माध्यमातून) तुम्हाला व तुमच्या लिखाणाला पाठिंबा देऊ शकतात.आजपर्यंत आपल्या वाचकांनी आपल्या लेखकांना 3 कोटी किंमतीच्या व्हर्चुअल भेटवस्तू दिल्या आहेत.हे वाचून लिखाणाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल!
आपल्याकडे जमा झालेल्या कॉईन्सची संख्या,आपली रुपयांमध्ये झालेली कमाई,आपली कमाई काढून घेण्यासाठी पात्रता निकष आणि आपली मानधन कसे मिळवावे, काढून घेण्याची प्रक्रिया कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडीओ पहावा
https://www.youtube.com/watch?v=OKCbe7VAkZU
मग, आता तुम्हीपण लिहायला सुरुवात करताय ना?
जर तुम्हाला सुपरफॅन सबस्क्रिप्शन प्रोग्राम, प्रतिलिपि प्रीमियम किंवा व्हर्चुअल भेटवस्तू यांच्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला [email protected] वर विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरे देऊ.
लिखाणासाठी शुभेच्छा
टीम प्रतिलिपि