प्रिय लेखक,
तुम्हाला तुमचे भाग थेट प्लॅटफॉर्मवर लिहिण्यासाठी, जतन करण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रतिलिपि अतिशय सोपी टूल्स देते. या टूल्सचा योग्य वापर समजून घेतल्यास तुम्हाला तुमचे साहित्य अगदी सुटसुटीत आणि आत्मविश्वासाने प्रकाशित करण्यास मदत होईल.
- 1
थेट एडिटरमध्ये लिहा
तुम्ही तुमच्या कथेचा भाग थेट प्रतिलिपि एडिटरमध्ये टाईप करू शकता. यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी लेखन, संपादन आणि कथेचे व्यवस्थापन करणे खूप सोपे जाते.
- 2
बेसिक फॉरमॅटिंगचा वापर करा
महत्त्वाच्या ओळी किंवा संवाद हायलाईट करण्यासाठी बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईनचा वापर करा. स्वच्छ आणि व्यवस्थित फॉरमॅटिंगमुळे तुमचा भाग वाचणे अधिक सोपे आणि आनंददायी होते.
- 3
आवश्यक असेल तेव्हाच लिंक्स किंवा इमेजेस जोडा
जर तुमच्या वाचकांना खरोखरच मदत होणार असेल, तरच कथेत लिंक्स किंवा इमेजेसचा वापर करा. खूप जास्त चित्रे किंवा व्हिज्युअल्स वापरणे टाळा; कारण वाचकांचे मुख्य लक्ष केवळ तुमच्या कथेवरच असायला हवे.
- 4
तुमचा ड्राफ्ट सुरक्षितपणे जतन करा
'जतन करा' (Save) या बटनामुळे तुमचा भाग जोपर्यंत तुम्ही तो प्रकाशित करत नाही, तोपर्यंत खाजगी राहतो. कोणत्याही घाईगडबडीशिवाय तुम्ही तुमच्या ड्राफ्टमध्ये कधीही बदल करून तो अधिक उत्तम बनवू शकता.
- 5
प्रकाशित करण्यापूर्वी प्रिव्ह्यू (Preview) नक्की पहा
प्रिव्ह्यूमुळे तुमचा भाग वाचकांना कसा दिसणार आहे, हे तुम्हाला आधीच पाहता येते. त्यामुळे साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी ओळींमधील अंतर, परिच्छेद, संवाद आणि फॉरमॅटिंग एकदा नीट तपासून घ्या.
- 6
आत्मविश्वासाने प्रकाशित करा
तुमचा भाग पूर्णपणे तपासून झाल्यानंतरच 'प्रकाशित करा' (Publish) वर क्लिक करा. विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक प्रकाशित केल्याने तुमच्या कथेला अधिक सुबक आणि प्रोफेशनल स्वरूप मिळते.
- 7
तुमचे भाग शेड्युल करा
तुम्ही तुमचे येणारे भाग भविष्यातील कोणत्याही तारखेसाठी आणि वेळेसाठी शेड्युल करून ठेवू शकता. नियमितपणे मिळणाऱ्या अपडेट्समुळे वाचकांना तुमच्या कथेवर पुन्हा-पुन्हा येण्याची एक सवय लागते.
लेखनासाठी खूप-खूप शुभेच्छा!
Happy writing!
— Team Pratilipi
