pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
← All articles मिळवा अधिक वाचक

प्रतिलिपिवरील तुमच्या लेखनातून तुम्ही कमाई कशी सुरू करू शकता?

"गोल्डन बॅज लेखक" ही प्रतिलिपिमध्ये नेहमीच एक खास ओळख आहे. इतकेच नाही तर आता तुम्ही थेट प्रीमियम अंतर्गत तुमची कथामालिका लिहू शकता आणि कमाई देखील करू शकता!

  1. 1

    गोल्डन बॅज मिळाल्यानंतर,१५+ भाग असलेल्या तुमच्या जुन्या व चालू कथामालिका प्रीमियम मध्ये जोडू शकता आणि आपली कमाई सुरू करू शकता.

  2. 2

    आता, प्रतिलिपिवरील तुमच्या लेखनातून तुम्ही कमाई कशी सुरू करू शकता यावरील 8 मुद्द्यांवर चर्चा करू या.

    1. दीर्घ कथामालिका लिहा: तुम्हाला कविता आणि लघुकथा लिहिण्याची आवड असेल, परंतु दुर्दैवाने तुम्ही प्रतिलिपिमध्ये त्या साहित्याद्वारे कमाई करू शकत नाही. प्रतिलिपिवर कमाईचा अपरिहार्य नियम म्हणजे 60+ भागांसह दीर्घ कथामालिका लिहिणे सुरू करणे हा आहे. दीर्घ कथामालिका लिहिणे हा एक लेखक म्हणून तुम्ही कमाईच्या मार्गावर आहात याची खात्री करण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण याच मार्गाने तुम्ही तुमचे साहित्य सब्सक्रिप्शनमध्ये ठेवू शकता.

    2. तुमच्या वाचकांना सब्सक्रिप्शन घेण्यासाठी आवाहन करा: जर तुम्ही दीर्घ कथामालिका लिहिण्यासाठी कठोर परिश्रम घेत असाल, तर तुम्ही वाचकांना लॉक भाग वाचण्यासाठी सब्सक्रिप्शन घेण्याचे आवाहन करावे. हे तुम्हाला तुमच्या लेखनातून अधिक कमाई मिळवण्यात मदत करेल. तुमची कथामालिका प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये ठेवून, तुम्ही तुमच्या वाचकांना दोन पर्याय देता.

    (1) सुपरफॅन सब्सक्रिप्शन: हे लेखक-स्तरीय सब्सक्रिप्शनआहे जिथे वाचक त्यांच्या आवडत्या लेखकाच्या प्रोफाइलचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात आणि अनन्य लाभांचा आनंद घेऊ शकतात. एक लेखक म्हणून, तुम्ही प्रत्येक सुपरफॅन सदस्यासाठी प्रतिलिपि कॉईन्स मिळवाल. तुमचे सुपरफॅन्स तुमच्या प्रोफाइलवरील सर्व लॉक भाग अनलॉक करण्यात सक्षम असतील आणि तुमच्या चॅटरूमचे ते सदस्य बनू शकतील.

    (२) प्रीमियम सब्सक्रिप्शन: हे ॲप-स्तरीय सब्सक्रिप्शन आहे जेथे वाचक प्रतिलिपिचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात आणि विशेष फायदे घेऊ शकतात. एक लेखक म्हणून, प्रीमियम सदस्यांनी तुमचे लॉक केलेले भाग किती वेळा वाचले यावर आधारित तुम्ही प्रतिलिपि कॉईन्स मिळवाल. प्रीमियम वाचक ॲपमधील सर्व लॉक भाग अनलॉक करण्यास सक्षम असतील तसेच कोणत्याही लेखकाच्या चॅटरूममध्ये ते प्रवेश करू शकतात.

    3. एकही वाचक गमावणार नाही: तुमच्या साहित्याचे लॉक भाग अनलॉक करण्यासाठी वाचक कॉईन्स वापरू शकतात (ज्यामध्ये तुम्हाला रॉयल्टी शेअर देखील मिळेल) किंवा ते लॉक केलेले भाग वाचण्यासाठी सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. तसेच, विनामूल्य वाचणारे वाचक त्यांच्यासाठी तो भाग कधी अनलॉक केला जाईल याबद्दल सूचित राहतील. त्यामुळे, तुम्ही एकही वाचक गमावणार नाही आणि तुमची कथामालिका प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये ठेवून तुम्ही उत्पन्न मिळवाल.

    4. स्पर्धांमध्ये भाग घ्या: प्रतिलिपि केवळ 'गोल्डन बॅज' लेखकांसाठी खास स्पर्धा आयोजित करते. या विशेष स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तुमची लेखन कारकीर्द वाढवण्याची ही उत्तम संधी आहे. तेव्हा, या संधीचा जरूर लाभ घ्या!

    5. ही महत्वाची सवय लावा: किमान 30 भागांची एक दीर्घ कथामालिका लिहिण्यास प्रारंभ करा. यांनतर, 40 भागाची कथामालिका लिहून पहा आणि असेच भागांची संख्या वाढवत जा. ही युक्ती तुम्हाला नियमितपणे अधिक भाग लिहिण्यास मदत करेल. अशा प्रकारे, तुम्ही भविष्यात 60+, 100+ भागांची दीर्घ कथामालिका सहज लिहू शकाल कारण लोकप्रिय लेखक हे लिहित आहेत आणि कमाई देखील करत आहेत!

  3. 3

    2-3 लहान कथामालिकांऐवजी, 60+ भागांसह एक दीर्घ कथामालिका लिहा: अधिक वाचकांना आकर्षित करू शकतील अशा प्रतिलिपिवरील लोकप्रिय विषय/श्रेणी घेऊन कथा लिहा.

    (१) प्रेम/नाते/कौटुंबिक/नाटक (ड्रामा)/रहस्य: विवाहावर आधारित कौटुंबिक नाट्यमय कथा, इतर कौटुंबिक नाट्यमय कथा, ऑफिस/कॉलेज प्रेमकथा (मुख्य पात्रांचे वयोगट: 20-35), बदला आणि प्रेम, भूतकाळातील आघात, अपहरण इ.

    (२) भयपट/कौटुंबिक/ड्रामा/रहस्य: स्त्री-भूत, मनुष्य-व्हॅम्पायर, प्राचीन/भूतकाळातील रहस्य, राक्षस, इ.

  4. 4

    (३) क्राईम-थ्रिलर/रहस्य: सीरियल किलिंग, मर्डर मिस्ट्री, क्राईम मिस्ट्री, रिव्हेंज इ.

  5. 5

    कृपया वरील शैलींबाबतचे मुद्दे हलक्यात घेऊ नका, अनेक लेखक त्यांचे पालन करूनच हजारो रुपये नियमितपणे कमावत आहेत!!!

    7. वाचकांच्या किमान 50 समीक्षा मिळवा: वाचकांच्या समीक्षेमुळे तुमच्या कथामालिकेचा प्रचार होतो आणि कथामालिका अधिक वाचकांपर्यंत पोहचते. तुमच्या वाचकांना तुमच्या कथामालिकेच्या प्रत्येक भागाला पाच स्टार आणि समीक्षा देण्यास सांगा. प्रतिलिपि अ‍ॅपवर तुमची कथामालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वाचकांच्या किमान 50 समीक्षा मिळवा.

    8. तुमच्या वाचकांशी संवाद साधा: तुमच्या वाचकांशी नाते निर्माण करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधा. सर्व समीक्षा आणि वाचकांच्या संदेशांना उत्तर द्या. तुमच्या वाचकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार माना. पोस्टद्वारे सुद्धा आभार मानू शकता. तुमचे प्रतिसाद तुमच्या वाचकांना समीक्षा देण्यास प्रवृत्त करतील आणि वाचकांचे फीडबॅक सुद्धा समजून घ्या, त्यांच्याशी वाद घालू नका.

    पोस्ट, समीक्षा, संदेश इत्यादीसारख्या विविध वैशिष्ट्यांचा वापर करून प्रतिलिपि अ‍ॅपमध्ये तुमच्या वाचकांशी संवाद साधा, यामुळे तुमची कथामालिका जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचेल आणि अधिक वाचकांना आकर्षित करेल.

    तुमचे वाचनीय साहित्य पाहण्यासाठी प्रतीक्षा करणे आम्हाला अवघड आहे! लिहीत रहा!

    लेखनासाठी मनापासून शुभेच्छा!

Happy writing!

— Team Pratilipi

हे उपयुक्त वाटले? मिळवा अधिक वाचक मध्ये आणखी लेख वाचा. आणखी लेख