pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
← All articles मिळवा अधिक वाचक

प्रतिलिपिची रिकमेंडेशन सिस्टीम वाचकांसाठी कशी काम करते

प्रतिलिपिची रिकमेंडेशन सिस्टीम वाचकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, त्यांना आवडतील आणि खिळवून ठेवतील अशाच कथा सुचवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करते. हे अगदी तसंच काम करतं, जसं युट्यूब दर्शकांच्या आवडीनुसार त्यांच्या होमपेजवर व्हिडिओ सुचवतं.

  1. 1

    होमपेजचे रहस्य: प्रतिलिपिचे होमपेज!

  2. 2

    वाचकांना नवीन कथा कशा दिसतात याचा एक छोटासा आढावा खालीलप्रमाणे

    वाचकांचा प्रतिसाद वाचक कोणत्या कथा वाचत आहेत, त्यांनी किती कथा पूर्ण वाचल्या आहेत किंवा त्यांनी इतर कशा प्रकारे कथेवर आपला प्रतिसाद दिला आहे, या सर्व गोष्टींचे प्रतिलिपि विश्लेषण करते.

    कथांमधील समानता: वाचकाने यापूर्वी वाचलेल्या कथांशी साधर्म्य असणाऱ्या इतर कथा ही सिस्टीम शोधून काढते. यामध्ये सारखे साहित्य प्रकार, विषय, वाचनाचा वेळ किंवा सारखे लेखक असणाऱ्या कथांचा समावेश होतो.

    लोकप्रिय आणि ट्रेंडिंग: इतर वाचकांमध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या किंवा ट्रेंडिंग असणाऱ्या कथाही प्रतिलिपि वाचकांना सुचवू शकते. या कथांचे वाचन संख्या समीक्षा आणि वाचकांचा प्रतिसाद खूप जास्त असतो.

    वैयक्तिकीकरण: ही रिकमेंडेशन सिस्टीम वाचकांच्या आवडीनुसार प्रत्येकाला एक वैयक्तिकृत होमपेज देते. तसेच, वाचक कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत हे पाहून ही सिस्टीम काळानुरूप स्वतःमध्ये सतत सुधारणा करत राहते. वाचक सुचवलेल्या कथांना कसा प्रतिसाद देतात, यावरून ती आपले सजेशन बदलत राहते.

    एकंदरीत, प्रतिलिपिची रिकमेंडेशन सिस्टीम वाचकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार नवीन आणि रंजक कथा शोधण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केली आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवरील त्यांचा वाचनाचा अनुभव आणखीनच सुंदर व समृद्ध बनतो.

    लिहीत रहा ! वाचत रहा !

Happy writing!

— Team Pratilipi

हे उपयुक्त वाटले? मिळवा अधिक वाचक मध्ये आणखी लेख वाचा. आणखी लेख