pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
← All articles मिळवा अधिक वाचक

तुमच्या सिरीजची दृश्यमानता कशी वाढवावी

होमपेज, प्रीमियम होमपेज आणि कॅटेगरी विभागातील काही विशिष्ट साहित्य प्रकारांचे बॉक्सेस तुमच्या साहित्याला मोठी दृश्यमानता मिळवून देतात. एकदा का तुमच्या सिरीजला चांगल्या संख्येने वाचक व समीक्षकांचे अभिप्राय मिळाले आणि वाचकांचा त्यातील रस वाढला, की ती आपोआपच रिकमेंडेशनचा भाग बनते.

  1. 1

    (1) तुमच्या सिरीजचे प्रमोशन करा

    वाचकांना तुमच्या सिरीजच्या प्रत्येक भागाला रेटिंग देण्याची आणि त्यावर समीक्षा देण्याची विनंती करा.सिरीजची दृश्यमानता वाढवण्यासाठी किमान ५० समीक्षा मिळवण्याचे ध्येय ठेवा.प्रतिलिपि पोस्टचा वापर करून नियमितपणे कथेतील ओळी, खिळवून ठेवणारे संवाद (Hooks) आणि पोस्टर्स शेअर करा. सिरीजचे प्रमोशन करण्याचे अनेक मार्ग आहेत, तिथे तुमची कल्पनाशक्ती वापरा.

    दृश्यमानता वाढवण्यासाठी आणि नवीन वाचक मिळवण्यासाठी तुमची सिरीज सोशल मीडियावर शेअर करा. मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी संबंधित हॅशटॅग किंवा ग्रुप्सचा वापर करा.अशा बाहेरील प्रमोशनमुळे तुमच्या प्रतिलिपि प्रोफाईलवर येणाऱ्या वाचकांची संख्या वाढू शकते आणि तुमच्या सिरीजचा प्रतिसादही सुधारू शकतो.

    प्रमोशनसाठी फोटो तयार करण्यासाठी तुम्ही एआय टूल्सची मदत घेऊ शकता. याद्वारे तुम्ही कथेतील पात्रे आणि प्रसंगांचे फोटो तयार करू शकता; याबद्दल इंटरनेटवर माहिती शोधा.उदाहरणार्थ, कथेतील एखाद्या प्रसंगात जर मुख्य जोडपे नदीकिनारी फिरत आहे आणि कोणीतरी लपून त्यांच्यावर पाळत ठेवत आहे, तर तुम्ही एआयला असाच तपशील देऊन त्यासारखा हुबेहूब फोटो तयार करण्यास सांगू शकता.

  2. 2

    (2) तुमच्या सिरीजसाठी योग्य कॅटेगरी निवडा

    योग्य कॅटेगरी निवडल्यामुळे, तशाच प्रकारच्या साहित्यात रस असणाऱ्या वाचकांच्या सर्च रिझल्ट्स आणि रिकमेंडेशनमध्ये तुमची सिरीज दिसण्यास मदत होते.

  3. 3

    (3) कव्हर फोटो आणि नाव (Title)

    तुमच्या सिरीजचा कव्हर फोटो आणि नाव या दोनच गोष्टी वाचक सर्वात आधी पाहतात.वाचकांचे लक्ष वेधून घेणारे आकर्षक कव्हर फोटो आणि कथेचे अचूक प्रतिनिधित्व करणारी लहान व प्रभावी नावे तयार करा.कव्हर फोटो तयार करण्यासाठी देखील तुम्ही एआय इमेज क्रिएटरचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला कव्हरसाठी विविध पर्याय मिळण्यास मदत होईल.

  4. 4

    (4) तुमचे प्रोफाईल व्यवस्थित ठेवा

    अधिक वाचकांना आकर्षित करण्यासाठी तुमच्या प्रोफाईलला एक योग्य नाव, प्रोफाईल फोटो आणि स्वतःबद्दल थोडी माहिती नक्की जोडा. आमच्या माहितीनुसार अॅपमधील सर्च बार लेखकांच्या प्रगतीमध्ये १०% योगदान देतो. कथा वारंवार ड्राफ्टमध्ये टाकणे, प्रोफाईलचे नाव आणि फोटो खूप लवकर बदलणे, निष्क्रिय होणे,साहित्य प्रकाशित न करणे आणि वाचकांना उत्तरे न देणे या गोष्टी टाळा; कारण यामुळे तुमचे वाचक गोंधळात पडू शकतात.

    प्रोफाईलवर केवळ सिरीज, कथा किंवा प्रतिलिपि मधील तुमच्या यशाबद्दलचेच साहित्य प्रकाशित करा. यामुळे वाचकांना तुमच्या प्रोफाईलवर केवळ वाचण्यासारखे योग्य साहित्य शोधणे सोपे जाईल. अनावश्यक माहिती किंवा लेखकांचे जुने नोट्स काढून टाका!

    लिहीत रहा ! वाचत रहा !

Happy writing!

— Team Pratilipi

हे उपयुक्त वाटले? मिळवा अधिक वाचक मध्ये आणखी लेख वाचा. आणखी लेख