प्लॅटफॉर्म नीट समजून घ्या:
प्रतिलिपि अॅपचा सखोल वापर करून तुम्हाला हे व्यासपीठ नेमके कसे काम करते, वाचक साहित्याशी कसे जोडले जातात आणि कोणत्या प्रकारचे साहित्य येथे जास्त चालते, याची उत्तम माहिती मिळेल.यामुळे तुम्हाला प्रतिलिपि वरील वाचकवर्गाच्या आवडीनुसार तुमचे लेखन अधिक प्रभावीपणे मांडता येईल.अॅपमधील प्रत्येक फीचर, बटण आणि प्रत्येक कोपरा आवर्जून तपासून पहा!
- 1
इतर लेखक आणि वाचकांना फॉलो करा
प्रतिलिपिच्या या मोठ्या कुटुंबाचा एक भाग बनणे अत्यंत महत्त्वाचे आहे.वेगवेगळ्या लेखकांच्या प्रोफाईलला भेट द्या आणि 'फॉलो' बटणावर क्लिक करा. प्लॅटफॉर्मवर इतर लेखक आणि वाचकांना फॉलो केल्याने तुमची विजिबिलिटी वाढण्यास मदत होते.
- 2
स्वतः एक वाचक बना
वेगवेगळ्या कथांवर तुम्ही दिलेले अभ्यासपूर्ण अभिप्राय हे वाचकांसाठी तुमचे प्रोफाईल आणि तुमची सिरीज शोधण्याचे एक उत्तम माध्यम बनू शकतात.त्यामुळे नियमितपणे स्वतःचे, प्रामाणिक, विचारपूर्वक आणि खिळवून ठेवणारे समीक्षा लिहिण्याची सवय ठेवा.वेगवेगळ्या कथा वाचल्याने तुम्हाला स्वतःला एक उत्तम लेखक बनण्यासही मदत होईल.
- 3
स्वतःचे प्रमोशन करा
एक नवीन लेखक म्हणून, तुम्ही प्रतिलिपि वर सक्रिय आहात हे लोकांना माहीत असणे गरजेचे आहे.तुमच्या साहित्याची लिंक व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमच्या कुटुंबीयांना व मित्रांना शेअर करा आणि त्यांना प्रतिलिपि वर तुम्हाला फॉलो करण्यासाठी प्रोत्साहित करा.एक लेखक म्हणून, तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना वाचनाची गोडी लावणे हे केव्हाही उत्तमच!
- 4
फॉलो, रेटिंग आणि समीक्षेसाठी विचारा
कथेच्या शेवटी तुम्ही वाचकांना तुम्हाला फॉलो करण्याची तसेच कथेला रेटिंग आणि समीक्षेचा अभिप्राय देण्याची विनंती करू शकता.जसे एखादा युट्युबर व्हिडिओच्या शेवटी दर्शकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगतो, तसेच हे काम करते. यामुळे वाचक तुम्हाला नक्की फॉलो करतील.
- 5
तुमच्या वाचकांशी संवाद साधा
वाचकांशी जिव्हाळ्याचे नाते तयार करण्यासाठी आणि त्यांना विशेष वाटण्यासाठी त्यांच्याशी नेहमी जोडलेले राहा. सर्व समीक्षेला आणि मेसेजेसना उत्तरे द्या, तसेच तुमच्या पाठींब्याबद्दल वाचकांचे आभार मानण्यासाठी प्रोफाईलवर एखादी छोटी पोस्ट नक्की टाका.तुमच्या उत्तरांमुळे वाचकांना आणखी कमेंट्स करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या अभिप्रायाला तुम्ही महत्त्व देता हे त्यांना समजेल.अॅपमधील विविध फीचर्स जसे की पोस्ट्स, रिव्ह्यूज, मेसेजेस याद्वारे सतत सक्रिय राहिल्याने तुमची विजिबिलिटी वाढेल आणि अधिक वाचक तुमच्याकडे आकर्षित होतील.
- 6
नम्र राहा आणि टिकेचा स्वीकार करा
वाचकांनी दिलेल्या अभिप्रायांना उत्तर देताना नेहमी नम्र आणि प्रेमळ राहण्याचा प्रयत्न करा, यामुळे त्यांना आनंद होईल. जे लेखक नेहमी संवाद साधतात, ते वाचकांना खूप आवडतात.हे लक्षात ठेवा की वाचकांना कथेच्या आवडीनुसार रेटिंग आणि समीक्षेचा अभिप्राय देण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर वाचकांनी तुमच्या लेखनावर टीका केली, तर तुमचे मत सकारात्मक पद्धतीने मांडा; वादविवाद किंवा एकमेकांची थट्टा उडवणे पूर्णपणे टाळा.
- 7
मोठ्या सिरीजचा बोलबाला
दीर्घसिरीज हा वाचकांचा सर्वात आवडता साहित्य प्रकार आहे. लांब सिरीज वाचकांना कथेमध्ये सर्वात जास्त खिळवून ठेवतात, कारण त्यातून वाचकांच्या आवडीनुसार एकापाठोपाठ एक सलग भाग मिळत राहतात. वाचक वाढवण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार कथानक, पात्रांचा उत्तम विकास आणि खिळवून ठेवणाऱ्या मांडणीसह उच्च दर्जाच्या सिरीज लिहिण्यावर भर द्या.
- 8
सिरीज का ठरतात खास?
लघुकथा आणि कविता यांसारख्या इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत सिरीज वाचकांमध्ये खूप जास्त लोकप्रिय असतात, कारण त्या वाचकांना दीर्घकाळासाठी कथेमध्ये गुंतवून ठेवतात. वाचकांचे लक्ष वेधून घेण्याच्या या क्षमतेमुळेच प्रतिलिपि लेखकांना लांब सिरीज लिहिण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देते.
लिहीत रहा ! वाचत रहा !
Happy writing!
— Team Pratilipi
