pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
← All articles उत्पन्न आणि सुरक्षा

लेखक नियम व मार्गदर्शक तत्त्वे

आम्ही प्रत्येक लेखकाला प्रतिलिपि हे स्वतःचे व्यासपीठ मानण्यासाठी आणि आमच्या साहित्य नियम, कॉपीराईट पॉलिसी व टॅगिंग पॉलिसीचे उल्लंघन करणाऱ्या साहित्यापासून/माहितीपासून या वेबसाईट/ॲपचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देतो. कृपया खालील गोष्टी लक्षात ठेवा:

तुमच्या मालकीचे नसलेले किंवा ज्यांच्या प्रकाशनाची तुमच्याकडे वैध परवानगी नाही, असे साहित्य प्रकाशित करू नका. यामध्ये ज्यांचे कॉपीराईट संपले आहेत (उदा. पब्लिक डोमेन मधील जुन्या प्रसिद्ध कादंबऱ्या) किंवा इंटरनेटवर मोकळेपणाने उपलब्ध असलेल्या साहित्याचाही समावेश होतो.

  1. 1

    लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे साहित्य प्रकाशित करू नका.

    तुमचे साहित्य आमच्या साहित्य नियम, कॉपीराईट पॉलिसी आणि टॅगिंग नियमांनुसारच असले पाहिजे. तसेच ते एका मोठ्या वाचकवर्गासाठी वाचनीय व योग्य असेल याची काळजी लेखकाने घ्यावी.

    वेबसाईट/ॲपचा गैरवापर करणे टाळा; जसे की कोणाची बदनामी करणारे, द्वेष पसरवणारे, संमतीशिवाय कोणाची खाजगी माहिती उघड करणारे किंवा आमच्या साहित्य नियमांमध्ये प्रतिबंधित केलेले इतर कोणतेही साहित्य प्रकाशित करू नका.

  2. 2

    कंपनीकडून वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या सर्व पॉलिसी आणि नियमांचे नेहमी पालन करा.

    वेबसाईट/ॲपवर कोणतीही कृती करताना इतर युजर्सशी नेहमी आदराने वागा. यामध्ये तुमच्या साहित्यावर इतर युजर्सनी दिलेल्या समीक्षेला उत्तर देणे किंवा आमच्या कम्युनिकेशन नियमांनुसार ॲपवरील चॅटरूम्समध्ये इतर युजर्सशी संवाद साधणे समाविष्ट आहे.

    कोणत्याही धर्मादाय किंवा इतर कारणांसाठी इतर युजर्सकडून पैसे गोळा करण्यासाठी या वेबसाईट/ॲपचा वापर करू नका. अशा कोणत्याही व्यवहारांच्या परिणामांना कंपनी जबाबदार असणार नाही.

    आमच्या नियमांचे उल्लंघन करणारे साहित्य किंवा माहिती काढून टाकण्याचा हक्क आम्ही राखून ठेवतो. तुमच्या साहित्याबद्दल काही तक्रार आल्यास आम्ही तुम्हाला तसे कळवू आणि कोणतीही कडक कारवाई टाळण्यासाठी तुम्ही स्वतःहून त्या समस्येचे निवारण करावे यासाठी प्रोत्साहन देऊ.

    एकाच वेळी एकापेक्षा जास्त युझर प्रोफाईल तयार करू नका. तसेच, जर तुमचे एखादे प्रोफाईल कोणत्याही कारणास्तव निलंबित किंवा बॅन केले गेले असेल, तर दुसऱ्या प्रोफाईलवरून लॉगइन करू नका.

    खोटी माहिती वापरून बनावट प्रोफाईल तयार करू नका किंवा आमच्या साईटवर दुसऱ्याचे नाव, फोटो वापरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीचे रूप धारण करण्याचा (तोतयागिरी करण्याचा) प्रयत्न करू नका.

  3. 3

    आमचे पाठीराखे बना आणि आमच्या नियमांचे उल्लंघन करणारे कोणतेही साहित्य किंवा माहिती आढळल्यास त्वरित त्याची रिपोर्ट करा.

    कोणत्याही साहित्याचे कॉपीराईट हे त्याच्या मूळ लेखकाचे असतात आणि ते कायद्यानुसार आपोआपच त्यांच्याकडे राहतात. तुम्ही लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या मूळ साहित्याचे कॉपीराईट मालक तुम्हीच राहता.

    जर कोणत्याही तिसऱ्या पक्षाने तुमच्या साहित्याच्या हक्कांसाठी तुमच्याशी संपर्क साधला, तर आम्ही तुम्हाला त्यांच्या अटी व शर्तींचा काळजीपूर्वक विचार करण्याचा आणि व्यावसायिक कायदेशीर सल्ला घेण्याचा सल्ला देतो. तुम्ही अशा कोणत्याही तिसऱ्या पक्षासोबत केलेल्या करारांना आम्ही जबाबदार असणार नाही.

    कंपनी वेळोवेळी वेबसाईट/ॲपवर कमाईची अनेक फीचर्स आणि योजना आणू शकते, ज्यासाठी तुमच्या साहित्याची निवड केली जाऊ शकते. कृपया अशा कोणत्याही फीचर्स किंवा योजनांमध्ये सहभागी होण्यापूर्वी संबंधित प्रश्नोत्तरे काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्या. आमच्या वेबसाईट/ॲपवरील लेखकांना त्यांच्या साहित्यातून योग्य कमाई करण्याची संधी देऊन, त्यांच्या लिहिण्याच्या आवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

    आम्ही वेबसाईट/ॲपवर तुमच्या साहित्याचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू, परंतु ही मदत वेबसाईट/ॲपच्या बाहेर लागू होणार नाही आणि अशी कोणतीही मदत करणे पूर्णपणे कंपनीच्या अधिकारात असेल.

    प्रत्येक लेखकाने आपल्या प्रकाशित साहित्याची सुरक्षित प्रत वेबसाईट/ॲप व्यतिरिक्त इतर कोणत्याही योग्य ठिकाणी स्वतःकडे जतन करून ठेवणे ही त्याची स्वतःची जबाबदारी असेल.

    लिहीत रहा ! वाचत रहा !

Happy writing!

— Team Pratilipi

हे उपयुक्त वाटले? उत्पन्न आणि सुरक्षा मध्ये आणखी लेख वाचा. आणखी लेख