pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
← All articles लेखनाची सुरुवात

लेखकांसाठी महत्त्वाचे संपर्क आणि सपोर्टबद्दल माहिती

प्रिय लेखक,

प्रतिलिपि सोबतीचा तुमचा हा प्रवास जसजसा पुढे जाईल, तसतशी तुम्हाला स्पर्धा, तुमची कमाई, आयपी (IP - बौद्धिक संपदा) किंवा तांत्रिक गोष्टींसाठी मदतीची गरज भासू शकते. तुमचा हा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा बनवण्यासाठी, तुम्ही संपर्क साधू शकता असे अधिकृत सपोर्ट चॅनेल्स खालीलप्रमाणे आहेत:

  1. 1

    लेखन स्पर्धा आणि इव्हेंट्ससाठी

    विविध स्पर्धा, त्यांमध्ये भाग घेणे, स्पर्धेचे नियम किंवा बक्षिसांविषयी कोणत्याही शंकेसाठी येथे मेल करा: events@pratilipi.com

  2. 2

    कथेचे IP, रुपांतरण (Adaptations) आणि हक्कांच्या (Rights) चर्चेसाठी

    कथेचे दुसऱ्या माध्यमात रुपांतर करणे, ऑडिओ, पुस्तके, कॉमिक्स किंवा कथेच्या हक्कांच्या मंजुरीशी संबंधित प्रश्नांसाठी येथे मेल करा: ipenglish@pratilipi.com

  3. 3

    ॲपमधील अडचणी, कमाईचे प्रश्न आणि सामान्य मदतीसाठी

    साहित्य प्रकाशित करताना येणाऱ्या अडचणी, डॅशबोर्डवरील समस्या, संपादन (Editing) करण्यावरील मर्यादा, पे-आउटचे (Payout) प्रश्न किंवा इतर कोणत्याही सामान्य मदतीसाठी येथे मेल करा: marathi@pratilipi.com

  4. 4

    सपोर्ट टीमशी संपर्क साधण्यापूर्वी

    आमच्या टीमला तुम्हाला लवकरात लवकर मदत करता यावी, यासाठी कृपया तुमच्या निरोपामध्ये खालील तपशील आवर्जून जोडा:

    तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर

    तुमच्या प्रोफाईलची लिंक किंवा युझरनेम

    अडचणीची थोडक्यात माहिती

  5. 5

    आवश्यकतेनुसार स्क्रीनशॉट्स

    या तपशिलांमुळे टीमला तुमची समस्या अचूक समजण्यास मदत होईल आणि ते तुम्हाला जलद गतीने रिप्लाय करू शकतील.

    तुमच्या या लेखक प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. असेच लिहीत राहा, प्रगती करत राहा आणि जेव्हा कधी गरज पडेल, तेव्हा आमच्याशी नक्की संपर्क साधा.

    लेखनासाठी खूप-खूप शुभेच्छा!

Happy writing!

— Team Pratilipi

हे उपयुक्त वाटले? लेखनाची सुरुवात मध्ये आणखी लेख वाचा. आणखी लेख