pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

स्वयंप्रकाशन मार्गदर्शक सूची

१. प्रतिलिपिवर प्रकाशन कोण करू शकते?

ज्यांना लिहिण्याची व आपल्या भावना मांडण्याची इच्छा आहे, असे सर्वजण प्रतिलिपिवर आपले साहित्य प्रकाशित करू शकतात. आपण कोणत्याही प्रकारचे साहित्य लिहू शकता- काल्पनिक, सत्यघटना अथवा कविता. प्रतिलिपिवर लिहिण्याकरता व्यावसायिक लेखकच असावयास हवे, अशी कोणतीही अट नाही.

२. मी प्रतिलिपिवर कसे लिहू शकते/शकतो?

i. रायटर टॅब मध्ये सर्वात वर असलेल्या लाल "नवीन साहित्य लिहा" या बटनावर क्लिक करताच रायटर पॅनल सुरु होईल.
ii. या स्क्रिन मध्ये आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या भारतीय भाषिक कीबोर्डद्वारे आपले साहित्य लिहू शकता.
iii. आपले साहित्य लिहून झाल्यावर कृपया "अपलोड" च्या बटनावर क्लिक करून साहित्य प्रकाशित करा अथवा सर्वात वर उजव्या बाजूला असलेल्या मेनूवर क्लिक करून आपले साहित्य जतन करून ठेवा. (जतन केलेले साहित्य केवळ आपल्यालाच पाहता येईल.)

३. साहित्य प्रकाशित कसे करावे?

i. आपले साहित्य लिहून झाल्यावर कृपया "अपलोड" च्या बटनावर क्लिक करा.
ii. आपल्या साहित्याचा तपशील जसे की शीर्षक व सारांश (वैकल्पिक) लिहा.
iii. आपल्या साहित्यास साजेशी कव्हर इमेज जोडा. ही इमेज तुमच्या स्वतःच्या मालकी हक्काची अथवा पब्लिक डोमेन (जसे की http://pixabay.com) येथून घेतलेली असावी. कृपया गुगलवरून डाउनलोड केलेल्या इमेज टाकू नये, याने कॉपीराईट धोरणाचे उल्लंघन होते.
iv. अखेर, आपल्या साहित्याशी निगडित श्रेणी निवडा आणि "प्रकाशित करा" या बटनावर क्लिक करा.

 

४. आता आपण प्रतिलिपिवर कथामालिका प्रकाशित करू शकता. 

१. आपण जी कथामालिका वेगवेगळ्या भागांमध्ये प्रकाशित केलेली आहे, त्या सर्व भागांना एकत्र करून एक कथामालिका साहित्य तयार करू शकता.
२. आपण नवीन साहित्य प्रकाशित करत आहात  जे प्रकाशित कथामालिकेचा पुढील भाग आहे. तर हा पुढील भाग आपण थेट त्या कथामालिकेमध्ये जोडू शकता.                                       ३.  ३. आपण जर नवीन कथामालिकेचा पहिला भाग लिहीत आहात तर आपण नवीन कथामालिका साहित्य तयार करू शकता.

 

. मी माझे साहित्य कोठे पाहू शकते/शकतो?

एप्लिकेशनमध्ये विविधठिकाणी आपले साहित्य आपण पाहू शकता

i. रायटर विभागामध्ये (अर्थात लेखणीच्या चिन्हावर), आपले जतन केलेले व प्रकाशित केलेले साहित्य वेगवेगळ्या विभागात आपल्याला पाहावयाला मिळेल.

ii. आपल्या प्रोफाइलमध्येही आपण आपले प्रकाशित केलेले साहित्य पाहू शकता.

 

६. माझे प्रकाशन असफल झाले तर?

असे एखाद्या क्षणिक तांत्रिक अडचणीमुळे घडू शकते. कृपया पुन्हा एकदा साहित्य प्रकाशन करण्याचा प्रयत्न करा, तरीही आपणास अडचण आली, कृपया आमच्याशी संपर्क साधा