1. सुपरफॅन सब्सक्रिप्शन म्हणजे काय?
-
वाचक त्याच्या आवडत्या लेखकाला २५ रुपये सब्सक्रिप्शन फी देऊन त्या लेखकाचे सुपरफॅन बनू शकतो. यालाच सुपरफॅन सब्सक्रिप्शन असे म्हणतात.
-
प्रत्येक महिन्यासाठी सब्सक्रिप्शन फी २५ रुपये असेल.
-
वाचक त्यांचं सब्सक्रिप्शन कधीही सुरु किंवा बंद करू शकतात.
2. वाचकांना सुपरफॅन सब्सक्रिप्शनचे काय फायदे मिळतील?
-
लेखकाच्या कथा मालिकेचा पुढचा नवीन भाग, सुपरफॅन्सला इतरांच्या पाच दिवस अगोदर वाचायला मिळेल
-
वाचकाने सब्सक्रिप्शन घेतल्यावर त्याला सुपरफॅनचा बॅज मिळेल. वाचकाच्या नावापुढे सुपरफॅनचा बॅज झळकेल.
-
लेखकाच्या प्रोफाईलवर त्यांच्या सुपरफॅन्सची यादी असेल.
-
सर्व सुपरफॅन्सला एक स्वतंत्र चॅट रूम मिळेल. तिथे ते लेखकाच्या साहित्याबद्दल, कथेतील पात्रांबद्दल चर्चा शकतात आणि लेखकाशी संवाद साधू शकतात.
-
सुपरफॅन चॅटरूम ही सुविधा अजून सुरु झालेली नाही. ही सुविधा लवकरच सुरु होईल.
3. सुपरफॅन्स सब्सक्रिप्शन योजनेत लेखक कसे सहभागी होऊ शकतात?
-
ही सुविधा पहिल्यांदा काही निवडक लेखकांना देण्यात येईल, त्यांनतर या योजनेत योग्य ते बदल करून सर्व लेखक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
-
लेखकांना प्रतिलिपि अॅप अपडेट करावे लागेल
-
लेखकाला सब्सक्रिप्शन योजनेत सहभागी झाल्याची सूचना त्यांच्या प्रोफाईलवर मिळेल
-
सब्सक्रिप्शन योजनेत सहभागी झाल्यावर लेखकाच्या प्रोफाईलवर सब्सक्रिप्शन बॅज दिसेल
4. सब्सक्रिप्शन योजनेत कोणते लेखक सहभागी होऊ शकतात?
-
सब्सक्रिप्शन योजनेत सहभागी होण्यासाठी लेखकाचे कमीत कमी २०० अनुयायी असावेत
-
मागच्या तीस दिवसात लेखकाने किमान ५ साहित्य प्रकाशित केले असावे
5. जर लेखकाकडून ३० दिवसात ५ साहित्य प्रकाशित झाले नाही तर लेखक या योजनेतून बाहेर जाईल का?
नाही. एकदा लेखक सब्सक्रिप्शन योजनेत सहभागी झाला की, लेखक कायमस्वरूपी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
6. ही सब्सक्रिप्शन योजना प्रतिलिपिच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे का?
सब्सक्रिप्शन योजना प्रतिलिपि अॅपवर उपलब्ध आहे. पण वाचक वेबसाईटवरून लेखकांना सब्सक्राइब करू शकतात.
7. लेखक सब्सक्राइबर्स कसे वाढवू शकतो?
-
नियमित लेखन
-
कथामालिकांचे भाग वेळेवर प्रकाशित करून लेखकसब्सक्राइबर्स (सुपरफॅन्स) वाढवता येतील
8. लेखक त्यांचे सब्सक्राइबर्स कसे टिकवून ठेवू शकतो?
लेखक नियमित दर्जेदार लेखन करून, त्याच्या सब्सक्राइबर्सचा विश्वास टिकवून ठेवू शकतो
9. वाचकांना सुपरफॅन सब्सक्रिप्शनचे काय फायदे मिळतील?
-
लेखकाच्या कथा मालिकेचा पुढचा नवीन भाग सुपरफॅन्सला पाच दिवस आधीच वाचायला मिळेल
-
वाचकाने सब्सक्रिप्शन घेतल्यावर त्याला सुपरफॅनचा बॅज मिळेल. वाचकाच्या नावापुढे सुपरफॅनचा बॅज झळकेल
-
सर्व सुपरफॅन्सला एक स्वतंत्र चॅट रूम मिळेल. तिथे ते लेखकाच्या साहित्याबद्दल, कथेतील पात्रांबद्दल चर्चा शकतात आणि लेखकाशी संवाद साधू शकतात
-
सुपरफॅन चॅट रूम ही सुविधा अजून सुरु झालेली नाही. ही सुविधा लवकरच सुरु होईल.
10. सब्सक्राइबर्स (सुपरफॅन्स) साठी कोणती कथामालिका उपलब्ध करून देता येईल?
-
लेखकाने ज्या कथामालिकेचा भाग मागच्या ३० दिवसात प्रकाशित केला असेल
-
लेखकाने कथामालिका संपल्याचे जाहीर केले नसेल, तर अशी कथामालिका लेखकाला सब्सक्रिप्शन योजेनमध्ये समाविष्ट करता येईल
11. लेखकाला सब्सक्रिप्शन योजनेतून कथामालिका बाहेर काढता येईल का?
हो, लेखक सब्सक्रिप्शन योजनेतून कथामालिका बाहेर काढू शकतो. पण यामुळे लेखकाच्या सुपरफॅन्सचा हिरमोड होऊ शकतो आणि सुपरफॅन लेखकाला अनसब्सक्राइब करू शकतात
12. मी माझ्या कथामालिकांचे लेखन काही महिन्यांपासून थांबवले आहे. ही कथा मालिका सब्सक्रिप्शन योजनेचा भाग होऊ शकते का?
हो. जर तुमची कथामालिका अपूर्ण असेल आणि कथामालिका संपली असं जाहीर केलं नसेल तर ती कथा मालिका सब्सक्रिप्शन योजनेचा भाग होऊ शकते
13. सब्सक्रिप्शन योजनेच्या कथामालिका लेखकाने योजनेतून बाहेर काढून टाकल्या तर काय होईल?
लेखकाने असे केल्यावर सुपरफॅन्सचा (सब्सक्राइबर्सचा) हिरमोड होऊ शकतो आणि सुपरफॅन्स लेखकाला अनसब्सक्राइब करू शकतात
14. माझ्या इतर वाचकांना (जे सुपर फॅन नाहीत) त्यांना माझ्या कथामालिकेचे भाग कधी वाचायला मिळतील?
इतर वाचकांना (जे सुपर फॅन नाहीत) ५ दिवसानंतर कथामालिकेचे भाग वाचायला मिळेल
15. सुपरफॅन बॅज म्हणजे काय?
-
वाचकाने आवडत्या लेखकाचे सब्सक्रिप्शन घेतल्यावर, त्या वाचकाला सुपरफॅन बॅज मिळेल
-
त्या लेखकाच्या साहित्यावर प्रतिक्रिया देताना हा बॅज वाचकाच्या नावापुढे झळकेल
16. सुपरफॅन चॅट रूम म्हणजे काय?
-
सर्व सुपरफॅन्सला एक स्वतंत्र चॅट रूम मिळेल. तिथे ते लेखकाच्या साहित्याबद्दल, कथेतील पात्रांबद्दल चर्चा शकतात आणि लेखकाशी संवाद साधू शकतात
-
सुपरफॅन चॅट रूम ही सुविधा अजून सुरु झालेली नाही. ही सुविधा लवकरच सुरु होईल
17. प्रतिलिपि अॅपच्या होमपेजवर "सब्सक्रिप्शन योजनेतील लोकप्रिय लेखक" या यादीत लेखकाचे नाव येण्यासाठी काय करावे लागेल?
-
यासाठी लेखकाने नियमित दर्जेदार लेखन करने आवश्यक आहे
-
लेखकाने वाचकांशी नियमित संवाद साधने आवश्यक आहे
-
ज्या लेखकांना वाचकांचा नियमित उत्तम प्रतिसाद मिळेल, त्या लेखकांची नावे होमपेजवरील "सब्सक्रिप्शन योजनेतील लोकप्रिय लेखक" या यादीत नमूद केली जातील
18. लेखकाला सब्सक्रिप्शन योजनेतून काय मानधन मिळेल?
वाचकांसाठी सब्सक्रिप्शन फी २५ रुपये आहे. या सब्सक्रिप्शन फी ची विभागणी खालील प्रकारे होईल.
-
यातील ४२ टक्के भाग लेखकांसाठी असेल
-
३० टक्के फी गूगलकडे जाईल (थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म फी)
-
२८ टक्के भाग प्रतिलिपिकडे जाईल
19. सब्सक्रिप्शन योजनेमध्ये अजून काही सुविधा समाविष्ट होणार आहेत का?
हो. सब्सक्रिप्शन योजनेमध्ये भविष्यात नवीन सुविधा समाविष्ट करण्यात येतील.
20. लेखकाला/लेखिकेला सब्सक्रिप्शन योजनेत सहभागी व्हायचं नसेल तर काय करावं लागेल?
-
लेखक स्वतःहून सब्सक्रिप्शन योजनेतून बाहेर येऊ शकत नाही
-
लेखकाला जर सब्सक्रिप्शन योजनेतून बाहेर यायचे असेल तर योग्य कारण द्यावे लागेल
-
लेखक सब्सक्रिप्शन योजनेतून बाहेर आल्यावर त्याला परत योजनेत सहभागी होता येणार नाही
21. लेखकाला कसे कळेल की, कोणत्या वाचकाने त्याला सब्सक्राइब केले आहे?
-
वाचकाने सब्सक्रिप्शन घेतल्यावर लेखकाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल
-
लेखकाला त्याची सुपरफॅन्सची यादी बघून खात्री करून घेता येईल
22. लेखकाला जर इतर काही समस्या असेल तर काय करावे?
कृपया आमच्याशी संपर्क साधा., लेखकाची समस्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रतिलिपि टीम प्रयत्न करेल.