pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

General

अकाउंटविषयी पूर्ण माहिती

 

प्रतिलिपि सुरु करण्याबाबत

 

प्रतिलिपि - तुम्ही ह्या ठिकाणी तुमचे आवडीचे साहित्य कथा, कविता, लेख वाचू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला साईन अप करून तुमचे स्वतःचे अकाउंट तयार करावे लागेल. वाचण्यापलीकडे तुम्ही येथे स्वतःचे साहित्य लिहू शकता. तुमच्या विचारांना, तुमच्या मनात असलेल्या कल्पनांना तुम्ही येथे शब्दबद्ध करू शकतात. लोकप्रिय लेखक ह्यांना फॉलो करून तुमच्या आवडीच्या साहित्यावर कमेंट करा. येथे तुम्ही वाचनालयामध्ये आवडीचे साहित्य सेव्ह करून कधीही वाचा. सोबत ऑडिओ साहित्य ऐकणे असे बरेच काही प्रतिलिपिवर आहे.  

 

डाउनलोड अँप

तुम्ही प्रतिलिपि अँप ह्या येथून डाउनलोड करा - Google Play store (https://play.google.com/store/apps/details?id=com.pratilipi.mobile.android&hl=en)

लॉगिन करण्याबाबत

प्रतिलिपिवरती साईन-इन आणि साईन-अप 

तुमच्या इमेल ने तुम्ही प्रतिलिपी वर साईन-इन करू शकता. 

 

जर प्रतिलिपिचे अकाउंट लॉगिन होत नसेल तर

साईन-इन पेजवर जा

i) अगोदर लॉगिन केलेला मेल आयडी टाका आणि पुढे जाण्यासाठी क्लिक करा. 

ii) आता तुम्हाला खाली "Forgot Password" असे दिसेल त्यावर क्लिक करा

iii) मेल तपासून "Send link" ह्या लिंकवर क्लिक करा

iv) आता तुमच्या मेलवर प्रतिलिपिचा मेल आला असेल

v) प्रतिलिपिचा आलेला मेल वर क्लिक करून नवीन पासवर्ड सेट करा. 

vi) आता प्रतिलिपिवर जाऊन लॉगिन करण्यासाठी मेल टाका सोबत नवीन सेट केलेला पासवर्ड टाका. आणि तुम्ही प्रतिलिपिमध्ये असाल. 

 

अकाउंटला साईन आउट करणेबाबत

प्रतिलिपिच्या अँपवरआणि वेबसाईटवर

i) तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा

ii) सेटींग्ज मध्ये जा

iii)  साईन आउट बटनावर क्लिक करा

 

तुमचे अकाउंट डिलीट करण्याबाबत

कृपया [email protected] ह्यावर मेल करून आम्हाला सांगा अकाउंट डिलीट करण्याविषयी. आम्ही तुम्हाला मदत करू.    

अकाउंट सेटिंग्ज

माझी प्रोफाईल 

तुमच्या प्रोफाईलची सारी माहिती तुमच्या अकाउंटवर मिळेल. तुमचे सारे लिहलेले साहित्य, वाचलेले साहित्य तुमचा चर्चेतला सहभाग तेव्हा प्रोफाईलवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. 

 

नोटिफिकेशन बाबत

 

तुम्हाला कथांचे नोटिफिकेशन पाहिजे असतील जसे की, नोटिफिकेशन चे प्रकार, दिवसातून किती नोटिफिकेशन पाहिज, नोटिफिकेशन थांबवायचे असतील तेव्हा प्रतिलिपि अँप च्या नोटिफिकेशन विभागात जाऊन खाली दिलेल्या माहितीनुसार बदल करू शकता.

i) तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा 

ii) सेटिंग्जमध्ये जा

iii) नोटिफिकेशन मध्ये जा

iv) तुम्हाला जे बदल हवे असतील ते करा. 

 

इमेल संग्रह 

 

तुम्ही कथांच्या मेल संग्रहामध्ये नोटिफिकेशन च्या सेटिंग्जमध्ये जाऊन बदल करू शकता. जर तुम्हाला कथांचा मेल हवा नसेल तर तुम्ही  "Unsubscribe Link" ह्या लिंक वर जाऊन क्लिक करून बंद करू शकता. (ही लिंक तुम्हाला मेल आलेल्या कथांच्या खाली मिळेल). 

 

पासवर्ड बदला

प्रतिलिपिच्या अँपवर

i) तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा 

ii)  सेटिंग्ज मध्ये जा

iii) तुमच्या अकाउंटवर जा

iv) पासवर्ड बदल करण्याच्या पर्यायावर क्लिक करा

v) तुमचा जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड घ्या.

 

संकीर्ण

 फिचरविषयी सांगा किंवा नवीन सुचवा

प्रतिलिपिच्या अँपवर

i) तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा

ii)सेटिंग्जमध्ये जा 

iii) सपोर्ट मध्ये जा

iv) तुम्हाला जो बदल सांगायचा असेल त्याविभागानुसार सांगू शकता

 

तुमच्या समस्या किंवा अभिप्रायविषयी तुमचे सदैव स्वागत आहे 

कृपया आमच्याशी संपर्क साधा