-
भाग शेड्युल करणे म्हणजे काय?
आता तुम्ही तुमच्या “कथामालिकेच्या भागाला’’ भविष्यात कोणत्याही दिवशी आणि वेळेला आटोमॅटिकली प्रकाशीत होण्यासाठी शेड्युल करता येईल. ह्यालाच शेड्युल असे म्हणतात.
-
मी माझ्या कथामालिकेचा पुढील भाग शेड्यूल कसा करू?
तुमच्या कथामालिकेच्या ड्राफ्ट विभागात, तुम्हाला प्रत्येक ड्राफ्ट वरती ‘प्रकाशन शेड्युल करा’ चा पर्याय
या पर्यायावर क्लिक करून, दिवस आणि वेळेची निवड करून तुम्ही शेड्युल करू शकता.
-
मला ज्या कथेत भाग नसतील त्या साहित्यालाही शेड्युल करता येऊ शकते का?
नाही, हा पर्याय फक्त कथामालिकेला उपलब्ध आहे(ज्यात जास्त भाग आहेत) आणि सिंगल कथेला शेड्युल करू शकत नाहीत.
-
मला शेड्यूलिंग मधून भाग काढता येईल का?
होय, तुम्ही केव्हाही काढू शकता.
-
शेड्युल चा दिवस आणि वेळ मला बदलता येईल का ?
होय, दिवस व वेळ बदलण्यासाठी ‘शेड्युल ची वेळ अपडेट करा’ ह्या पर्यायावर क्लिक करा.
-
शेड्युल केलेल्या कोणत्याही भागाला संपादित करता येईल का ?
होय, असे करत येईल, परंतु लक्षात घ्या : इंटरनेटविना तुम्हाला संपादित करता येणार नाही. त्यासाठी इंटरनेट सुरु असणे आवश्यक आहे. ज्या वेळेला भाग शेड्युल केलेला आहे, त्याच्या ३० मिनिटांअगोदर तुम्ही संपादित करू शकत नाहीत.
-
जर शेड्युल केलेल्या वेळेच्या ३० मिनिटे अगोदर(३० मिनिटे च्या दरम्यान) ड्राफ्ट संपादित करायचा असेल तर कसे करावे ?
तुम्ही अशावेळी शेड्युल केलेल्या वेळेत बदल करा किंवा ड्राफ्ट ला शेड्युलमधून काढून टाकावे आणि संपादित करून त्या ड्राफ्ट ला पुन्हा शेड्युल करायचा
-
कथामालिकेला किती भागांमध्ये शेड्युल करता येईल ?
ह्याला मर्यादा नाहीये, तुम्हाला जितके हवे तितके भाग शेड्युल करता येतील
9. जर एखाद्या भागाला शेड्युल केलेल्या वेळेअगोदरच प्रकाशित केले तर काय होईल ?
काही होणार नाही, भाग प्रकाशित होऊन जाईल.
10. एकाच दिवशी मला एक पेक्षा जास्त भाग शेड्युल करता येतील का ?
होय, तुम्ही करू शकता.
11. शेड्युलनुसार भाग प्रकाशित होण्यासाठी मोबाईल अँप सुरु असणे गरजेचे आहे का ?
नाही, मोबाईल बंद असेल तरी काही समस्या नाहीये, शेड्युल ऑटोमॅटिक ठरलेल्या दिवशी व वेळेला प्रकाशित होईल.
12. शेड्युल केलेल्या दिवशी प्रतिलिपि अँप उघडणे आवश्यक आहे का ?
नाही, तशी आवश्यकता नाही.
13. भागांना किती किती वेळेपर्यंत शेड्युल करता येईल ?
पुढच्या ६ महिन्याच्या दरम्यान तुम्ही भाग शेड्युल करू शकता.