टीप:-मला सामाजिक विषयांवर ,वैचारिक विषयांवर लेख लिहायला आवडतं.. आणि मला एक महत्वाच सांगायच आहे एखाद्या व्यक्तीला judge करताना किंवा वाईट ठरवताना त्या व्यक्तीच्या जागेवर जर तुम्ही असता किंवा तुम्ही जर तसे असता तुम्हाला तश्या feeling आहेत अस समजा किंवा थोडक्यात तुम्ही जर समलैंगिक असला तर तुम्हाला काय वाटलं असतं किंवा तुम्ही काय केलं असत हे just imagine करून पाहा आणि मग Action घ्या. आता मुद्यावर येऊ आपल्या भारतीय समाजात काही घटकांना मुद्दामून दुर्लक्षित केले जाते, थोडक्यात त्यांना अनैतिक ठरवलं जातं पण मी माझ्यापरीने त्या घटकांना न्याय मिळावा थोडक्यात समाजमान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे..मला लोकांना हे पटवून द्यायचं आहे की ह्या प्रकारच्या सर्व लैंगिक भावना नैसर्गिक आहेत.हे सर्व नैसर्गिक आहे.आणि लैंगिक भावना वगळता ते सर्व तुमच्या आमच्या सारखे सर्वसामान्य माणसेच आहेत.लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा कारण ते सुद्धा माणसंच आहेत त्यांनासुद्धा स्वतंत्र पणे जगण्याचा अधिकार आहे.समाजाने त्यांना ते जसे आहेत तस स्वीकारावं त्यांनासुद्धा सर्वसामान्य माणसाप्रमाणेच वागणूक द्यावी हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना..🙏😊
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा