संपूर्ण नांव : सुरेश दत्तात्रेय म्हात्रे .पण ...1965 पासून गेली 50 हून
आधिक वर्षे मी मराठी साहित्य लेखनाच्या सर्वच क्षेत्रांत सर्वच
प्रकारचे विपुल प्रमाणात लेखन केले आहे .त्यामध्ये प्रामुख्याने
कथा -कादंबरी -कविता , तसेच ललित , समीक्षा व नाट्य लेखन हि
केले असून आजवर मी 10 कादंबऱ्या , 3कथा संग्रह , 3 कविता
संग्रहांचे लेखन पूर्व प्रकाशित झाले असून अनेक मराठी दिवाळी
अंकांमधून माझे साहित्य लेखन आजहि सुरु असते .माझ्या प्रकाशित पुस्तकांना कविवर्य मंगेश पाडगावकर , कवीश्रेष्ठ
नारायण सुर्वे , ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे
माजी अध्यक्ष मा .मधु मंगेश कर्णिक , ज्येष्ठ साहित्य समीक्षक
प्राचार्य वि .शं .चौगुले इत्यांदीनी आवर्जून प्रस्तावना लिहिल्या
असून 1975 पासून गेली सुमारे 40 वर्षे -- मी " कथा -कादंबरी -
कविते " ला वाहिलेल्या " क -का -क " या माझ्या स्वतःच्या
दिवाळी अंकाचे संपादन करीत असून ....त्याचे प्रमुख वितरक
मुंबई ची बी .डी .बागवे आणि कंपनी , हे राहिले असून माझा हा
वाचकप्रिय आणि महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला आहे .या ' ककाक '
च्या व माझ्या पुस्तकांचे मुखपृष्ठ सोबत.