प्रिय वाचक
मी प्रणाली देशमुख ....
थोडा परिचय ...
1लोकमत मैत्र पुरवणी , ऑक्सिजन पुरवणी मध्ये ,
सकाळ युवा , सकाळ सकाळ टुडे ,मनमोराचा पिसारा पुरवणीत लेख , देशोन्न विरंगुळा पुरवणी , अशा अनेक वृत्तपत्रासाठी
सामाजिक , कौटुंबिक 2001 पासून 2021 पर्यंत लेख कविता लिखाण प्रकाशित झालय .
2) विविध दिवाळी अंकात कथा प्रकाशित .हृदय स्पंदन , शब्दकार , नाती , अशा अनेक मासिकात कथा लेख प्रकाशित
3) मराठी सिनेमा कलाकार सुबोध भावे यांनी " पृथ्वीराज संयोगिता " कथेचं अभिवाचन केलंय .
4)इंडियन भारत लिखाण स्पर्धेत जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे , अरविंद जगताप , यांनी महाराष्ट्रातून 25 विजेते निवडले ,त्यामध्ये प्रणाली देशमुख यांचा " माझ्या गावातील कलंदर व्यक्तिमत्व ह्या लेखाची निवड झाली . पुण्याच्या पत्रकार भवनात सन्मान करण्यात आला .
5) अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक ( कुसुमाग्रज नगरी )2021 ला निमंत्रितांच्या कवी कट्ट्यासाठी आमंत्रित करण्यात आलं .
6) स्थानिक कविसंमेलनात सक्रिय सहभाग .
7) कलाजागर संस्थेतर्फे 2021 चा कविरत्न पुरस्कार जाहीर .
8) मानवसेवा संघातर्फे सावित्रीबाई स्त्रीभूषण पुरस्कार प्राप्त
9) प्रतिलिपी मराठी महाकथा स्पर्धेत चाळिशीनंतरच प्रेम कथेचा पहिला क्रमांक आला 30000 हजार रोख बक्षीस मिळालं .
10) प्रतिलिपी मराठी प्रेम कथा स्पर्धेत " तू अशी जवळी राहा " कथेचा पहिला क्रमांक 10000 रु धनराशी .
11) प्रतिलिपी मराठी भयकथा स्पर्धेत ' भुताटकी 'कथेला चौथा क्रमांक मिळाला रोख 50000 धनराशी मिळाली .
12) प्रतिलिपी मराठी सिनेरंग कथास्पर्धेत विवाह कथेचा पहिलं पारितोषिक मिळालं
13) प्रतिलिपी मराठी कथा स्पर्धा मध्ये विश्वास ह्या कथेला दुसरं पारितोषिक मिळालं .
14) 2020 प्रतिलिपी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित .
आईला लिखाण खूप आवडायचं ....तिची कामं आटोपली कि .... ती अगदी सहज बंगळीत बसून तिथल्या तिथे कविता रचायची आणि आम्ही भावंडं तिच्या पाठोपाठ म्हणायचो .... कदाचित तिच्यामुळे मी पण लिहायला लागले ....हा वारसा तिच्याकडूनच आलाय ....इयत्ता चौथीत असतांना पहिली
कविता लिहली ....मग माझी आवड आपोआप वृद्धिंगत झाली ....शाळेत निबंध स्पर्धेत माझं बक्षीस अगदी हक्काचं असायचं .लोकमत मधील मैत्र या पुरवणीत बरेच लेख प्रसिद्ध झालेत ....युवा सकाळ ,विरंगुळा या सकाळ आणि देशोन्नती मधील पुरवण्यातही लिखाण प्रकाशित झाले आहे .माझं शिक्षण एम .ए .बी .एड .वाचनाची आणि गाण्याची आवड ...आवड म्हणता येणार नाही .इट्स माय पॅशन .....कॉलेजमध्ये असताना अभिनयही करून बघितला .....एक दोन एकांकिकाही लिहल्या ....
जीवनातील अनुभवातून ....सहज सुचलेल्या मनाला भिडणाऱ्या कथा किंवा कविता .....आपल्याच जीवनाचा भाग असतात .जीवन हे कडू गोड अनुभवातून .....रुचकर बनतं .....येणाऱ्या परिस्थितीचा कसा सामना करायचा हे नकळत समजावून जातं ......येणारं सुखदुःख अलगद वेचायचं असतं " लाईफ हे असच असतं "
[email protected]
प्रणाली ~
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा