नमस्कार मंडळी...🙏
कोरोना काळात लागलेला लेखनाचा छंद व त्यातून विविध विषयावरचे ललित लेख, कथा व कविता मिळून आजवर संख्या 136 झाली आहें.... नुकतीच प्रतिलिपी ह्या अँपवरील माझ्या लिखाणाची वाचक संख्या पन्नास हजार पार झाली व सध्या 58 K आहें. मला प्रतिलिपीने खास *गोल्डन बॅच सर्टिफिकेट* देऊन सन्मान केला व त्यांच्या अव्वल लेखकांच्या पंक्तीत मला स्थान बहाल केले.
प्रतिलिपी ह्या अँपवर गेली 3 वर्ष मी सातत्याने लिहीत आहें. लेखक व वाचकांसाठी असलेल्या ह्या अँपची माहिती तुम्हांला असेल. हे App प्ले स्टोर वर जाऊन फ्रीमध्ये download करता येते. अनेकानेक नवोदित लेखकांचे विविध भाषेतील विविध विषयातील लेखन तुम्हाला तिथे वाचायला मिळते.
आपण वाचकांनी मला वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले. असेच कायम पाठीशी रहा व मला उत्तमोत्तम लेखनासाठी प्रोत्साहित करत रहा... प्रतिसाद देत रहा.. वाचकांचे मनापासून धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपला कृपाभिलाषी,
मंगेश जनार्दन-जयश्री सावंत.