pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जिवन संध्या

0

अगदी बालपणापासून ते वयाची सत्तरी ओलांडली तरी त्या दोघांची दोस्ती घट्ट होती .दोरीला न कळत बसलेल्या निरगाठी सारखी .आयुष्य म्हणजे कोपऱ्यात उभ्या केलेल्या केरसुणी सारखं झालं होतं खरं !सारी साफ सफाई ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
ANIL KULKARNI

ती गेली ! आज सकाळी सात वाजता ती मुक्त होउन बरोबर पंचवीस वर्षे झाली.सारी बंधने सोडवून जाणे सोपे झाले असेल का तिला ? तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाशी सहजतेने ,अत्यंत शुद्ध मनाने , निरपेक्षतेने जोडलेले प्रेमळ घनिष्ट बंधन होते ते ! आणि तेही किती जणांशी ?भाऊ बहिण ,आई वडील ,सासू सासरे ,दीर भावजया ,सूना, स्वतः ची आणि इतरांचीही मुले ,नातवंडं ,शेजार पाजार सार्यांशी ! आता वाटते तिला माहित असावे आपल्या आयुष्याची दोरी किती लांब आहे ! नक्कीच ! तीनं एकदाच मला आपला हात दाखवला होता.मी काही तज्ञ नव्हतो आणि नाही . तिच्या विस्कळीत जीवनरेखे बद्दल सोडून बाकी सारं सांगितलं आणि गडबडीने तिचा हात सोडला होता .मन सैरभैर झालं होतं पण सारे विचार क्षष्णात झटकुन टाकले होते .पण आजही तो हात आणि ती मधेच तुटलेली आयुष्यरेखा डोळ्यापुढे स्वच्छ वेडावते आहे !आज अचानक ढीगभर साऱ्या आठवणीत ती तुटलेली रेखा का उभी रहावी ? आज अत्यंत वाईट वाटते ते म्हणजे मंगल माझ्यासाठी जगली पण मी ?माझे फॅक्टरी जीवन ,ते अत्युच्च व्हावं ,कुटुंबाचा जीवनस्तर उंचच उंच व्हावा म्हणून केलेल्या धडपडीच्याच नादात , तिचं आयुष्य मी कोरडे केले का ? माझ्या तरुण तरुणींना हात जोडून विनवणी करावी वाटते की त्या साऱ्या सुखसोयी मिळवत असताना आपल्या घट्ट मुठीत धरलेली वाळू हळुहळु ,नकळत निसटून जाती आहे या कडे बारीक लक्ष ठेवा. दहा वर्षे रोह्यात राहून ही तिला रायगड दाखवायचे राहून गेले !रिटायर झाल्यावर,मुलांच्या साऱ्या जबाबदाऱ्या संपवून रिटायर झाल्यावर, सारे जग आपण दोघेच फिरू या माझ्या आश्वासनाची तिने हळूच केलेली नाजूक चेष्टाही ,ती अगोदर एकटीच मला सोडून ,तिच्या प्रवासाला निघून गेल्याने, आता मला तीव्रतेने टोचती आहे ! राहून राहून मुठीतून सुटून गेलेल्या वाळूची जाणीव करून देते ! शेवटी प्रत्येकाचे आयुष्य जोडीदाराशी कितीही घट्ट जोडले असेल तरी किती भिन्न असते हे पंचवीस वर्षापूर्वी अमुक वाजून अमुक सेकंदाने ,मला नियतीने लीलया दाखवून दिले. असो साऱ्या फक्त गोड आठवणीतच उर्वरित आयुष्य मुलं, नातवंड पंतवंड यांच्यात काढायची तरी इस्टेट मी बाळगून आहे !हे ही नसे थोडके! नऊ डिसेंबर ला साऱ्यांनीच आपल्या आठवणी जागवल्याच आहेत.नेमका त्याच दिवशी अभिजितचा वाढदिवस असतो हा एक दुर्दैवी योगायोग!म्हणून मार्गशीर्ष कृ.षष्ठी , मोरया गोसावी या पुण्यतिथी दिवशी, मन मोकळं करत आहे एवढच ! अनिल.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.