नमस्कार वाचक मित्रांनो,
मी सहज सुलभ भाषेत सुचेल तसं लेखन करत आहे, मला माहित नाही माझ्या रचना कविता आहेत की नाहीत मात्र या माझ्या मनातील संचारी भावना आहेत.
मला विश्वास वाटतो की आपण ही सहजतेने घ्याल. मी अस मुळीच म्हणणार नाही की आपण मला लाईक करा, फाईव स्टार द्या. मी एवढच म्हणेन तुम्ही मला सूचना करा.
माझ्या मनातील संचारी भावना वाचून आपल्याला काय वाटल ते मात्र परखड प्रांजल सांगा.माझे साहित्य हे स्वांत: सुखाय आहे, ते बहुजन हिताय होईल की नाही ते जो तो ठरवेल. मी मात्र लिहित राहीन असच भले ही असेल ते फुटकळ काव्य.
आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद.